ते म्हणाले

Submitted by अविनाश राजे on 12 September, 2020 - 23:44

ते म्हणाले घे, हे पौष्टीक व विशिष्ट आहे
मज कळले नाही कि ते त्यांचे उच्छिष्ट आहे

भाषा आहे एक खास, देव संपर्कासाठी
पण एकच आहे, ती मरणाची क्लिष्ट आहे

क्वचितच, नाईलाजानेच बलात्कार करतो
राजा आमचा खूप सज्जन आणि शिष्ट आहे

नवोन्मीलीत मेंदू अर्पावेत नैवेद्याला
पूजन संहितेत म्हणे तसे निर्दिष्ट आहे

बारकाव्यासहित समजून घ्यावी देहबोली
बोलल्या शब्दांसोबत ते एक परिशिष्ट आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपरोध.
नमोन्मीलित मेंदू अर्पावेत नैवेद्याला
पूजन संहितेत म्हणे तसे निर्दिष्ट आहे..
खूप आवडले हे शब्द.