शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले

Submitted by मृण_मयी on 8 May, 2009 - 02:23

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले
दे अर्थ आता जगण्यास; पुष्कळ झुलवून झाले

तुजवीण हाती काही न उरले माझे म्हणाया
बाकी जगावर केव्हाच पाणी सोडून झाले

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

अद्याप आहे अंतर जरासे, तृष्णा जरासी
अद्याप कोठे लज्जित कळीचे उमलून झाले?

नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...

गुलमोहर: 

भन्नाट! सगळेच शेर आवडले.

जीव ओवाळून टाकावा अशी गझल. पर्यायला तर... पर्यायच नाही. सब एक तरफ और माशाल्ला ये गझल एक तरफ!
............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" झन्नाट! "

क्या बात है.
अत्यंन्त सुंदर गझल.

बहोत खूब... मृण्मयी!
पर्याय आणि समजून उमजून.... अगदी आरपार आहेत!
क्या बात है.... खरोखरच सुंदर गजल

सुंदर गझल!
पर्याय, यौवन आणि दोष हे शेर तर फार आवडले!!

सुंदर गझल

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

क्लास गझल आहे...

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले>>> सुरेख!!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

सारे तूझे हे शेर आता वाचून झाले,
काळजाच्या आत थोडे टोचून गेले.

वाटले ते सांगावयाला शब्द नाही
पापणीतील अश्रूही वाहून गेले.

*************************************************
मला शत्रूंची गरज नाही. माझे मित्रच त्यासाठी पूरेसे आहेत.

एकदा वाचली आहे पण आधी सगळ्या लक्षवेधी कविता वचुन पुन्हा येतो..

वा!
जबरदस्त!!...
प्रेमात वेडा माणूसच अशी गझल करु शकतो..
मस्त! शब्दच नाही!

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले

अद्याप आहे अंतर जरासे, तृष्णा जरासी
अद्याप कोठे लज्जित कळीचे उमलून झाले?

नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले... >>> पार पार चेंदामेंदा.... चक्काचुर केलास.. हीच ह्या महिन्यातली सर्वोत्तम कविता आहे, that's it !!!!!

व्वा !!! भयंकर मस्तयं...

क्या बात है!
_______________________________
"शापादपि शरादपि"

पर्याय... वेडं वय.. उमजणं.. >> केवळ !!!
अहाहा .. गझल!

सगळीच गझल मस्तच! पण....

शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले
दे अर्थ आता जगण्यास; पुष्कळ झुलवून झाले

तुजवीण हाती काही न उरले माझे म्हणाया
बाकी जगावर केव्हाच पाणी सोडून झाले

नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले

हे शेर विशेष आवडले.

आणि या सर्व गझलेपेक्षा आपला तो सहीचा शेर म्हणजे अप्रतिमच!

"किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?"

अप्रतिम, अप्रतिम!

-'बेफिकीर'!

पर्याय नाही होकार देण्यावाचून उरला
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले>>>>>>वाह वा !

हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...>>>>>>>>>>क्या बात !

सुंदर गझल.

Pages