शेवटच्या वर्षाची परीक्षा द्यावी का?

Submitted by Athavanitle kahi on 7 September, 2020 - 05:01

परीक्षा पद्धती योग्य का अयोग्य हा विचार सर्वप्रथम मनात आला, परंतु विषय परीक्षा घ्यावी का न घ्यावी असा आहे. Show must go on, जिंदगी कभी रुकती नही. काय होईल? अभ्यासक्रम पूर्ण अभ्यास केला गेला नाहीये तो नीट शिकवता आला नाहीये अगदी बरोबर, पण मी त्या मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करते. काहीही चूक नसताना त्यांचे एखादे वर्ष वाया जात आहे. सहा वेगवेगळ्या प्रकारचे पेपर तयार करून, सोमवार ते शनिवार एकच विषय पण सोशल डिस्टंसिंग ठेवून मुलांचे गट केले तर परीक्षा देणे शक्य आहे. आता सध्याच्या परिस्थितीचा विचार करून, मुलांना किती आणि कसा अभ्यासक्रम शिकवला गेला असेल हा विचार करून पेपर सेट करता येतील. नैसर्गिक संकटांशी सामना करताना आपण जगणं सोडून देऊ शकत नाही ना? आता आठवीपर्यंतच्या मुलांना पुढल्या वर्गात ढकलले गेले, तरी चालण्यासारखे आहे, परंतु फायनल इयर म्हणजे त्या मुलांचं भवितव्य आणि ती मुलं उद्या जिथे कुठे करियर करतील त्या व्यवसायांच भवितव्यही त्यांच्या हातामध्ये असणार आहे. मग त्यांची परीक्षा नको का व्हायला. हा, त्या पेपर सेटिंग मध्ये सध्याच्या परिस्थितीचा विचार जरूर करावा, पण परीक्षा न घेता त्यांना डिग्री देणे किंवा एक वर्ष त्यांचे वाया घालविणे हे दोन्ही पर्याय चिंतेचे आहेत. ही फायनल इयरची मुलं उद्या नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडणारच आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

परिक्षा व्हायला हव्यात. पण तुम्ही म्हणताय तसं अभ्यास झालाय का, सगळं शिकवलं गेलय का हे बघावे लागेल.

अजुन ६ महिन्याने मागील वर्षीच्या बॅच सोबत फायनल परिक्षा दिली तर निदान "कोरोना बॅच" अशी हेटाळणी भविष्यात होणार नाही. मागे एका बॅच ला "जळके बी.ए." अशी बिरुदावली जन्मभर भळभळत्या जखमेसारखी मिरवावी लागली होती.

Online पध्दतीने नियोजन करता येऊ शकेल. अवघड आहे पण अशक्य नाही.परकीय भाषा शिकण्याकरिता प्रवेश परिक्षा नुकत्याच online पध्दतीने सुरळीत पार पडल्या.

मागे खुप वर्षांपुर्वी.. पुणे विद्यापीठात बी.ए. परिक्षा झाल्यानंतर त्या उत्तरपत्रीका जिथे डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी जमा केल्या होत्या त्या काही अभ्यास न करणार्‍या विद्यार्थ्यांनी कपटकारस्थानाने जाळल्या. आता उत्तरपत्रीका जळाल्यानंतर त्या तपासायच्या कशा..! मग सरसकट सर्वांना बी.ए. डीग्री देऊन सन्मानीत करण्यात आले.... त्या वर्षी जे जे लोक बी.ए. झाले त्या त्या सर्वांना "जळके बी.ए." असे संबोधुन अक्षरशः हेटाळले जायचे.. नोकरीकरता जागा निघाल्यातरी जाहिरातीत "जळक्या बी.एं.नी अप्लाय करु नये..!" अ शी तळाटीप असायची Proud

परीक्षा तर घ्यावी कारण शेवटचे वर्षा आहे आणि तस ही Fy, sy, ty. ला सूट दिली आहे. आणि करोन मुळे किती दिवस अस राहणार ना बाकी तर center gov च्या सगळा exam होत आहेत मग राज्य सरकार का असे करत आहेत? राज्याकडे पैसे कमी आहेत आणि आर्थिक मंदी म्हणून परीक्षा नको मग ती कोणतीही असेना हे बरोबर नाहीय.

हे वर्ष असेही कित्येकांचे वाया गेलेय. चाकरदारांना ईंक्रीमेंट नाही मिळालेय तर धंदेवाईकांना सेटबॅक बसलाय, तर कित्येक जण दोनचार वर्षे मागे ढकलले गेले आहेत. एखादा विराट कोहली जो सचिनचे कैक रेकॉर्ड मोडायची ईच्छा बाळगून असेल त्याच्याही कारकिर्दीतले एक वर्षे वाया गेले आहे. फार दूर कश्याला जा, माझा अडीच वर्षाचा मुलगा ज्याचे हे घराबाहेर पडत दुनिया बघायचे वय आहे तो अजूनही बाल्कनीतून बस बस विमान विमान करताना बघून त्याचेही एक महत्वाचे वर्ष वाया जातेय याची खंत वाटते...
त्यामुळे कोणीतरी महापुरुषाने म्हटल्याप्रमाणे हे वर्ष जिंवत राहायचे आहे.. पुढच्या चार वर्षात ते करा जे तुम्ही पाच वर्षात करणार होता

त्यामुळे कोणीतरी महापुरुषाने म्हटल्याप्रमाणे हे वर्ष जिंवत राहायचे आहे.. पुढच्या चार वर्षात ते करा जे तुम्ही पाच वर्षात करणार होता बराबर आहे हा मुदा ऋन्मेऽऽष तस ही आपण राहिले तर सगळे आहे नाही तर काहीच नाही. पण हे वर्ष गेली आहे घरात बसून हे पण तितके खरे

अनेक स्पर्धा परीक्षा,सर्टिफिकेशन ऑनलाईन आधीपासूनच घेतली जातात करोना हा शब्द आपल्याला कळण्यापूर्वी.त्यासाठी सॉफ्टवेअर चांगली विकसित केली जातात.डेस्कवर दुसरे काहीही उघडले की परीक्षा अबोर्ट, किंवा ठराविक वेळेत उत्तर नाही दिले/लक्ष दुसरीकडे असले की परीक्षा अबोर्ट.बऱ्याच कंपनी वेबकॅम चालू ठेवून ऑनलाईन टेस्ट द्यायला लावतात.यात लॅपटॉप चालू ठेवून खाली फोनवर गुगल/समोर उत्तर सांगणारा माणूस इतके मार्जिनच नसते.
अशी मॉडेल आणि सॉफ्टवेअर नीट बनवून/विकत घेऊन ऑनलाईन परीक्षांना वापरता येईल.खेडेगावात 5 जण एकावेळी असे एक कॉम्प्युटर केंद्र वापरून परीक्षा घेता येतील.फार कठीण नाही.

ही फायनल इयरची मुलं उद्या नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडणारच आहेत.>>>>> बरेचसे जण पडलेत बाहेर
मलाच पुण्यात येऊन महिना झाला.

बऱ्याच कंपनी वेबकॅम चालू ठेवून ऑनलाईन टेस्ट द्यायला लावतात.यात लॅपटॉप चालू ठेवून खाली फोनवर गुगल/समोर उत्तर सांगणारा माणूस इतके मार्जिनच नसते.>>>> अपवाद आहेत यातपण

चमचागोटीच्या स्पर्धेत जिंकायचे असेल तर नुसते वेगात चालून फायदा नसतो तर शेवटपर्यंत गोटीही शाबूत राहायला हवी. या
कोरोनाच्या वादळात ती पडू नये म्हणून वेग थोडासा मंद करावा लागला तर जरूर करा. अगदी थांबावे लागले तरी जरूर थांबा. कारण एकदा गोटी पडली की तुम्ही स्पर्धेतूनच बाहेर पडाल. त्यामुळे हे २०२० वर्षे आपापली गोटी सांभाळायचे आहे !

mi_anu+1
आमची SPPU परकीय भाषा entrance अशीच घेतली.

मुलाच्या शाळेत परिक्षा पेपर दिले आणि घरी प्नामाणिकपणे सोडवून मुलांनी अपलोड केले.