पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - टोकरी/कटोरी चाट

Submitted by Aaradhya on 4 September, 2020 - 06:32

लागणारे जिन्नस
टोकरीसाठी मैदा, जिरे, ओवा आणि गरम तेल पाणी
रगडा पॅटिस साठी
पांढरे वाटणे (भिजवलेला), बटाटा, लाल तिखट, जिरे पूड, धने पूड, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, २ कांदे, २ टोमॅटो, पोहे व तांदूळ वाटून,
चटणी साठी
पुदिना, कोथिंबीर, मिरची, लिंबू, चिंच, खजूर, गूळ,
मीठ, चाट मसाला, फरसाण, पापडी, शेव, दही
क्रमवार पाककृती
रगडा
पांढरे वाटाणे आणि बटाटे कूकरमध्ये शिजवून घ्यावे. मी ४ शिट्ट्या झाल्या की बटाटा काढून घेतला आणि वाटाणा हळद आणि मीठ घालून अजून ४ शिट्ट्या होइपर्यंत शिजू दिला. आता फोडणी साठी बारीक चिरलेला कांदा कढईत कढईत २-३ चमचे तेल गरम करा. चिरलेला कांदा तेलात परतून घ्या. त्यात अद्रक लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, लाल तिखट आणि टोमॅटो टाकले. त्यात शिजवलेले वाटाणे घालावे. ७ ते ८ मिनिटे शिजवून घ्या.
पॅटिस
पॅटिस साठी शिजवलेला बटाटा मॅश करून घेतला. क्रिस्पीपणा साठी पोहे आणि तांदूळ वाटून त्यात मिक्स करून घेतले. मिश्रणात अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरे पूड, धने पूड, लाल तिखट आणि चवी नुसार मीठ टाकून त्याचे पॅटिस बनवून घेतले.
IMG-20200904-WA0003.jpg
पुदिना चटणी :- १/२ कप पुदीना पाने, १/२ कप कोथिंबीर, १/४ फुटाणे डाळ, २ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १/४ जिरा पावडर, १/२ टिस्पून लिंबाचा रस, चवीपुरते मिठ हे सर्व मिक्सर मध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्या. गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाका.
IMG-20200904-WA0006.jpg
गोड चटणी
खजूर आणि चिंच थोडा वेळ भिजत घालावे. मग एका भांड्यात गूळ, चिंच आणि खजूर थोडं पाणी टाकून मंद आचेवर उकळावे. चिंचेचा कलर कमी झाला की ते गाळून दुसऱ्या भांड्यात काढा. चिंचेचा कलर बदले पर्यंत रिपीट टेलीकास्ट करत राहा. आता तयार चटणी मध्ये लाल तिखट आणि जिरे पूड टाकून घ्या. चटणी तयार.
एवढा करायचा कंटाळा असल्यास बाजारात खजूर इमली चटणी मिळते. १ वाटी साखरेच्या पाकात १ ते २ चमचे ही चटणी टाकायची. मग त्यात जिरे पूड आणि लाल तिखट टाकलं की रेडी.
टोकरी/कटोरी
मैद्यात जिरे, ओवा आणि गरम तेल टाकून मळून घ्या. मळताना गरज वाटेल तसं पाणी टाका. आता एक पातळ चपाती लाटून घ्या. त्याला काटा चमचा ने छिद्र करा. एक साधारण मध्यम आकाराची वाटी घ्या. त्याला बाहेरून तेल लावून ती चपाती लावून घ्या.
Screenshot_20200904_112316.png
आणि वाटी तेलात सोडा.
Screenshot_20200904_112337.png
एकदा कटोरी भाजू लागली की वाटी आपोआप बाहेर येईल ती चिमट्याने काढून घ्या. नंतर कटोरी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
Screenshot_20200904_112401.png
आता कटोरित पॅटिस चुरून टाका. त्यावर रगडा टाका. मग फरसाण, पापडी, चिरलेला कांदा, टोमॅटो टाका. मग चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ टाका. मग पुदिना चटणी, गोड चटणी आणि फेटलेल दही टाकून घ्या. वरून शेव टाका. कटोरी चाट रेडी.
Screenshot_20200904_113224.png
फोटो काढायला जरा उशीरच झाला. रगडा तर संपला होता. चटण्या थोड्या थोड्या होत्या त्या टाकल्यात.
ह्याला बनवायला खूप वेळ लागतो पण खाऊन ५ मिनिटात होतो Lol

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येऊ का खायला? >> ये गं Happy विचारायचे काय त्यात! धन्यवाद !!

धन्यवाद वावे, वर्णिता Happy

Pages