पाककृति स्पर्धा क्रमांक ३ - मटार-पनीर चंपाकळी

Submitted by सहेली on 1 September, 2020 - 11:51

साहित्य –

सारण - पनीर, मटार, धने-जिरे पूड, मीठ, लिंबू, लाल मिरची पावडर, कोथिंबीर

पारीसाठी - मैदा, मीठ, दोन चमचे तेल, ओवा, मिरेपूड, पाणी.

तळण्यासाठी तेल

एक वाटी मैद्यात मीठ, मिरेपूड, ओवा आणि दोन चमचे गरम तेल घालून घट्ट भिजवून घ्या. कमीत कमी अर्धा तास भिजवून ठेवा.

मटारचे दाणे किंचित मीठ घालून उकडून घ्या. मऊ झालेले दाणे हाताने कुस्करून त्यात पनीर, मीठ, कोथिंबीर, धने-जिरे पूड, लिंबू, लाल तिखट, घालून नीट मिसळून जरासं मळून घ्या. चव बघा. जरा जास्त स्ट्राँग असू द्या. पारीबरोबर खाताना चविष्ट लागलं पाहिजे.

IMG_20200901_181855-1.jpg

मैद्याचा एक छोटा गोळा घेउन लांबट आकारात लाटा. फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याला सुरीने चिरा द्या. सारणाचा लांबट गोळा एका बाजूवर ठेवून चंपाकळी वळून घ्या.

व्यस्थित तापलेल्या तेलात हलक्या हाताने चंपाकळी तळून घ्या. सॉस अथवा आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

IMG-20200901-WA0024.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

होय. मी पारी लांबट लाटली त्यामुळे गुंडाळ्या जास्त झाल्या सारणा भोवती. २ पूर्ण वेढे घातले तरी बास होतात. सारण बाहेर येत नाही आणि नुसताच मैद्याच्या पट्ट्या खाल्ल्या असं पण वाटत नाही.

Pages