पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - रसमलाई मोदक केक - वैष्णवीका

Submitted by वैष्णवीका on 30 August, 2020 - 12:55

साहित्य -
१. बिन अंड्याचा स्पंज केक - १
२. हेवी व्हिप क्रिम - १ वाटी
३. केशर सिरप - ४ चमचे
४. रसमलाई - अर्धी वाटी
५. खाण्याचा पिवळा रंग - २ थेंब
६. ४-५ बदाम पिस्त्याचे काप

IMG-20200830-WA0012.jpg

क्रमवार पाककृती -
१. प्रथम केकचे आडवे एकसारखे ५ तुकडे (स्लाईस) करुन घेतले.
२. इलेक्ट्रिक बिटर ने हेवी व्हिप क्रिम फेटून घेतले.
३. रसमलाई मधील गोळ्याचे लहान काप करुन घेतले.
४. एका वाटीत फेटलेले थोडे क्रिम घेऊन त्यात केशर सिरप घातले.
५. केकचा तुकडा रसमलाई ने ओलसर करुन घेतला.
IMG_20200830_221007.jpg
६. त्यावर केशर सिरप असलेले क्रिम लावले.
७. रसमलाई मधील गोळ्याचे लहान काप आणि बदाम पिस्त्याचे काप लावले.
IMG_20200830_221051.jpg
८. याप्रमाणे सगळे तुकडे एकावर एक रचले.
IMG_20200830_221127.jpg
९. केकला बाहेरील बाजूस क्रिम लावून त्यावर पायपिंग बँग च्या मदतीने नक्षिकाम केले.
IMG_20200830_221302.jpg
१०. सजावटीसाठी वरुन बदाम पिस्त्याचे काप लावले.
IMG_20200830_221027.jpgIMG_20200830_221234.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages