Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 30 August, 2020 - 07:39
पाल्याचे नाव : विजयालक्ष्मी
वय : ३ वर्षे १० महिने
खरंतर बुकमार्क स्पर्धेत भाग घ्यायचा विचार माझा होता. ब गटात. आज फ़ुरसत मिळाली आणि क्राफ्टचा डबा उघडला. पण आई काही करायला लागली की लुडबूड करण्याचा प्रत्येक बाळाचा जन्मसिद्ध हक्क असतो. तेव्हा आधी तिने बनवलेला बुकमार्क दाखवते.
साहित्य
रेडिमेड कपड्यान्चे प्राईस टॅग पुठ्ठे
आईचा जुना कुडता
कात्री
फब्रिक ग्लू
फैब्रिक कलर
भेंडी
हिरवा मार्कर पेन
जूना कुडत्याचे कापड कापून प्राईस टॅग वर चिटकवले. त्यावर फैब्रिक कलरनी भेंडीचे छापे मारले. मार्करने दांड्या रंगवल्या
पालकाची मदत
कापड योग्य आकारात कापून देणे, भेंडी चिरून देणे.
बाकी चिटकवा-चिटकवी, डिझाईन काढणे, रंग संगती तिची.
तल्लीन होऊन काम सुरु आहे
Happiness is...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बूकमार्क आणि बनवणारी दोन्ही
बूकमार्क आणि बनवणारी दोन्ही गोड आहेत.
Pages