जश्या बदलती चंद्र कला

Submitted by डी मृणालिनी on 28 August, 2020 - 11:33

आधुनिकतेचा मुखवटा घालून
केवळ 'मानवाधिकार' गाजवताय
पण स्वत:च्या स्वार्थी धोरणांचा
थोडातरी विचार करताय ??

पूर्वी काळी निश्चिंत जीवनात
किती मज्जा होती सांगु ?
पण आता मात्र प्रश्न पडतो
माझं घरटं कुठे टांगू ?

पंचतारांकित हॉटेल बांधायला
तुम्ही कितीतरी एकर जागा घेतलीत
पण मूळच्या स्वार्थी वृत्तीने
वितभर घरट्यालाच जागा नाही ठेवलीत

ओझोन च्या सुंदर पदरातूनच
तुम्हाला सूर्यकिरण देते
पण आज या फाटलेल्या पदराला
मी अश्रू ढाळत ठिगळ जोडते

पुर्वीसारखाच आजही मी
तुम्हाला गार सावली देतो
पण तुमच्या कुऱ्हाडीचा भीतीने मात्र
जिवंतपणीच मारतो

पण अजूनही कधीकधी
आशा वाटते आम्हाला
बदलेल हा काळ
जश्या बदलती चंद्र कला

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पंचतारांकित हॉटेल बांधायला
तुम्ही कितीतरी एकर जागा घेतलीत
पण मूळच्या स्वार्थी वृत्तीने
वितभर घरट्यालाच जागा नाही ठेवलीत …….

खूपच आवडली

सुंदर आहे कविता.
"माझं घरटं कुठं टांगू?"
अखिल विश्वाची विवंचना .