'हिंदीचा धसका आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा'

Submitted by पूजा जोशी on 25 August, 2020 - 01:29

हिंदीचा धसका

शाळेत हिंदी आमची 3rd language होती. जेव्हा पहिल्यांदा हिंदी भाषा अभ्यासक्रमात आली, मराठी भाषेत माझी चांगलीच प्रगती झाली होती. दोन्ही भाषा देवनागरी लिपीत आहेत हे कळेले आणि इथेच माझा आत्मविश्वास नडला.

मी एक average student होते आणि अभ्यासाचा कंटाळा होताच. त्यामुळे मी shortcut मारायचा प्रयत्न केला. हिंदी text book बाहेर अवांतर हिंदीचे वाचन केले नाही. आत्ता पर्यंत शिकलेल्या मराठीवर माझी भिस्त होती.

हिंदीचा पहिला पेपर होता. मी पुर्णआत्मविश्वासाने पेपरला गेले. पेपर lengthy होता. Script same असलीतरी प्रत्येक वाक्या नंतर द्यावा लागणारा पुर्ण विराम मला irritate करत होता. वेळ कमी होता आणि माझा निबंध लिहायचा बाकी होता. निबंधात तीन विषय दिले जात आणि त्यातून आपल्या आवडीच्या एका विषयावर निबंध लिहायला मुभा होती.

वेळ न दवडता पहिला असेल तो विषय निवडायचा अस मी मनाशी ठरवले. पण त्या दिवशी माझ नशीब मला साथ देत नव्हते.

पहिला विषय होता -' मेरे प्यारे भैय्या'
भैय्या? प्यारा? मला भैय्या म्हटलं की दूधवाला, भाजीवाला आणि रिक्षावाला एवढेच माहित. विशिष्ट तेलाचा वास, लाल रंगाचा मळकट पंचा ह्या विचाराने मला पोटात ढवळून निघाले. प्यारे भैय्याला तिथेच सोडून मी पुढच्या विषयाकडे वळले.
दुसरा विषय होता -' त्यौहार मकर संक्रान्ति का '
आता आली का पंचाईत. दिवाळी, होळी सोडून बाईंनी हा कुठला सण काढला? काळी चंद्रकला, हलव्याचे दागिने, हळदी कुंकू, सुगडाचे वाण लुटणे, गुळाची खमंग पोळी, पतंग मांजा सगळी माहिती होती. पण हे सगळे हिंदीत मांडायचे कसे?
माझ्या वर खर्या अर्थाने संक्रांत आली होती.
'आमचा तिळगूळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका' हयातल्या ' भांडू' ला हिंदी शब्द शोधायची 'झगडा' झगडी केली आणि त्या विषयाचा नाद सोडला.

आता मात्र सगळी मदार तिसर्‍या विषयावर होती.

तिसरा विषय होता -'रेल्वे स्टेशनपर एक घंटा '
माझे वडील, काका आणि आजोबा रेल्वेत नोकरी करत हे बाईंना कळल होत की काय? आमच्या घरी रेल्वे बद्द्ल खूप चर्चा होत असे पण कधी घंटेचा विषय निघालेला आठवेना. शाळेतील घंटा, देवळातील घंटा मला ठाऊक होत्या. पण ही रेल्वे स्थानकातील घंटा आणि त्या निर्जीव वस्तूचे मी मनोगत लिहायचे? घंटा म्हणजे 'एक तास'हा अर्थ, काही केल्या उमजला नाही. डोक्यात घंटानाद होत होता. हताश होऊन गेले. हाताला घाम सुटला. तोंडचे पाणी पळाले. तेवढ्यात पेपर संपल्याची 'घंटा' झाली.

अख्खे 10 मार्क हातातून निसटून गेले. त्या दिवसापासून मी जिद्दीने हिंदी शिकायला सुरूवात केली. .............

'पुढच्यास ठेच मागचा शहाणा'

माझ्या हिंदी निबंध लेखनाचा किस्सा तुम्ही वाचलाच आहे मग माझा मुलगा नील माझ्या चुकांतून नाही शिकला तर काय फायदा? 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा'. आपल्या आईला आलेल्या अनुभवावरून नीलने ठरवले पेपर हातात आला की आधी निबंधाचे विषय वाचून घ्यायचे म्हणजे इतर प्रश्न सोडवून होइस्तोवर आपण कुठल्या विषयावर निबंध लिहायचा हे ठरवून घेवू. Multitasking you know!

मराठीचा पेपर होता. निबंधाचे विषय होते

1. एक अविस्मरणीय दिवस
2. माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर
3. पावसाळा ऋतू

साहेबांनी तिन्ही विषय वाचले आणि विचार चक्र सुरू झाले. पहीला विषय घेतला तर कशी सुरवात करायची. मग मधेच आठवले आपण इंग्लिश मध्ये My Favourite cartoon character ह्या विषयावर लेख वाचला होता. तेवढ्यात मनात आले काल आईने तिच्या लहानपणच्या पावसाळ्यातल्या गमती जमती सांगितल्या होत्या.

आईला कुठल्याच विषयावर निबंध लिहता येत नव्हता तर चिरंजीवांना सगळ्या विषयावर comfort and confidence होता. मग chance सोडतो की काय?

निबंधाची सुरूवात पावसाळ्यातल्या एका उदासवाण्या दिवसाने झाली. बाहेर रिपरिप पाऊस पडत होता आणि आईने घरात बसवून ठेवले होते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. पाहतो तर काय? Spiderman!

मग spiderman चे वर्णन झाले. त्याच्या cobwebs वापरून हाॅल मधे बसल्या बसल्या स्वयंपाक घरातल्या उंच ठेवलेला लाडवांचा डबा कसा आणला ह्याचे रसभरीत वर्णन झाले. दुपारी सोसायटीत शिरलेल्या चोराला spiderman ने कसे पकडले. पावसामुळे ओल्या झालेल्या जमिनीवर चोर कसा आपटला इत्यादी इत्यादी

शेवटच्या दोन ओळीत एक उदास दिवस कसा अविस्मरणीय झाला ह्याचा आनंद व्यक्त केला गेला.

पावसाळा ऋतू, अविस्मरणीय दिवस आणि cartoon character ह्याची सरमिसळ करून निबंध लिहून झाला.

आता परिक्षा बाईंची होती, कोणत्या विषयावर निबंध लिहिला आहे हे ठरवून मार्क द्यायची. .......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच किती विनोदी छान लिहिता तुम्ही. मी तर रोज नील चे नवे किस्से वाचायला उत्सुक असते. हा ही छान आहे. किती मार्क मिळाले मग.

धन्यवाद अमा , मार्क नक्की आठवत नाही पण आता
त्याचे निबंध लेखन खूप सुधारलं आहे. त्याचे निबंध बाई इतर मुलांना वाचून दाखवतात आणि
परीक्षेतल्या गुणांपेक्षाही माझ्यासाठी ही मोठी पावती आहे

किस्से चांगलेत. तुमचं लहानपण कुठे गेले. भैया म्हणजे मोठा भाऊ हे भरपूर मराठी कुटुंबात बोलले जाते.
तुम्हाला माहीत नव्हते म्हणून कुतूहलापोटी विचारतोय.

thank you Mrunalini - tottochan is our favorite too.