सद्गुरूवाचोनी सापडली सोय

Submitted by अनन्त्_यात्री on 24 August, 2020 - 11:11

बालपणीचा काळ सुखाचा
असे जरि कुणी म्हणती
काळ-काम-वेगाच्या गणिते
तेव्हा छळिले किती !

मात्र अता सद्गुरू म्हणती की
"काळ असे हो भास"
ऐकुनी अमृतवाणी, सोडिला
सुटकेचा निश्वास

झंझट "काळा"चे गेले की
"काम-वेग" मग उरे
गणित गहन त्याचे सोडविण्या
रात्रंदिन मी झुरे

काम-वेग गणिताची चर्चा
कशी सदगुरूपाशी?
(अध्यात्माच्या शिखरावर ते!
का भ्रष्टावे त्यांसी?)

बिकट, जटिलसा पेच नवा हा
अहोरात्र मज छळतो
"निवडक" थोडे ग्रंथ उशाशी
घेऊनी सध्या निजतो!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच

छान