ज्येष्ठा गौरी पुजा विधी लिखित स्वरुपात आहे कां?

Submitted by यक्ष on 23 August, 2020 - 12:54

मला ज्येष्ठा गौरी पुजा विधी लिखित स्वरुपात असल्यास हवी आहे. कुणी त्याबद्दल काही सुचवू शकेल काय?

बाप्पांची पूजा 'सम्पूर्ण चातुर्मास' ह्या पुस्तकाचे मदतीने केली. पण मला ज्येष्ठा गौरी पुजा विधी बद्दल लिखित स्वरुपात कुठे मिळाली नाही. षोडषोपचारी पूजेची महिती असल्यास उत्तम.

अँड्रॉइड अँप वगैरे नको.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत उपयुक्त माहितीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद me_rucha! त्याचा सम्दर्भ घेउन लिखित स्वरुपात करतोय!

हीरा, गणपती बाप्पांसाठी चातुर्मास पूजा संग्रहामधुनच षोडचोपचार पूजा केली! त्यात पुरुषसूक्ताप्रमाणे अगदी सविस्तर दिलीय.
गौरी (आमच्या भागात 'महालक्ष्म्या' म्हणतात!) पूजनासाठी 'श्रीसूक्ताप्रमाणे' करायची इच्छा आहे...

यक्ष, आपण माझ्या मदतीची पोचपावती दिलीत हे बघून बरे वाटलं.
बऱ्याचदा मदत स्वीकारली जाते पण त्या बद्दल धन्यवाद दिल्या जातं नाही.

आमच्याकडेही गौरी न म्हणता महालक्ष्म्या म्हणतात.
जेष्ठा कनिष्ठा अश्या 2 आणि त्यांची बाळं.
देशपांड्यांचीं जी पूजा आहे त्यात श्रीसूक्ताचा अभिषेक आहे.

@ यक्ष ----- षोडचोपचार पूजा चातुर्मास पूजा संग्रहामध्ये त्यात पुरुषसूक्ताप्रमाणे अगदी सविस्तर दिलीय. गौरी पूजनासाठी 'श्रीसूक्ताप्रमाणे' करायची इच्छा आहे....... >>>>
म्हणजे काय ते कळलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे षोडचोपचार पूजा सगळ्या देवांसाठी तीच असते.

आचमन + संकल्प, निर्विघ्नतेसाठी गणेश पूजन, कलश-शंख-घंटा-दीप ( समई + नीरांजन) यांची पूजा ;

मुख्य देवता आवाहन, अर्घ्य ( हात धुणे ), पाद्य (पाय धुणे), आचमन ( प्यायला पाणी देणे), स्नान, पंचामृत स्नान, देवतेच्या विशिष्ट स्तोत्राने अभिषेक

वस्त्र (कापसाची + प्रत्यक्ष) अर्पण, हळद-कुंकू, सुगंधी द्रव्ये, सौभाग्य द्रव्ये अर्पण, दागिने + फुला-पानांचा शृंगार; अक्षता / फुलांनी १०८ किंवा सहस्रनाम पूजन

उदबत्ती + नीरांजन ओवाळणे, छोटा नैवेद्य ( लाडू पेढे फुलोरा) अर्पण, आरती - मंत्रपुष्प, प्रदक्षिणा, नमस्कार, महानैवेद्य (जेवणाचा) + भोजन दक्षिणा + तांबूल, अपराध क्षमा मागणे आणि पूजा अर्पण करणे.

हेच क्रमाने असते. फक्त पूजेप्रमाणे / देवाप्रमाणे संकल्पात / प्रत्येक विधीच्या मंत्रात देवाचे नाव बदलते. वार/तिथी/नक्षत्र बदलेल. पार्थिव गणपती, सत्यनारायण, इत्यादि......

इथे आता ज्येष्ठा + कनिष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी म्हणावे लागेल.
महालक्ष्मी प्रीत्यर्थ / महालक्ष्म्यै ***** समर्पयामि, महालक्ष्म्यै पूजयामि असे उच्चारण होईल जसा मंत्र असेल त्यानुसार.....
अभिषेक श्रीसूक्ताने, लक्ष्मी सूक्ताने , इतर स्तोत्राने होईल. देवीची १०८ / १००० नामावली बघावी लागेल.
घरच्या प्रथेनुसार काही अतिरिक्त विधी / पूजा टप्पे अस्तील तर ते करावे लागतील.

षोडचोपचार पूजा मंत्रांचा मूळ ढाचा तोच राहील.
कुठे संस्कृत रूपांतरण नाही जमले तर --- हे महालक्ष्मी, मी आपल्याला ****** अर्पण करत आहे असे मराठीत म्हणायचे. कुठल्याही आईसाठी शुद्ध + समर्पित भाव महत्वाचा, तंत्र पुढेमागे झाले तरी चालते.

बघा तुम्हाला पटतय का....

me_rucha! आपण आवर्जून प्रतिसाद दिला त्याबद्दल माझ्या भावना व्यक्त केल्या!
'बाप्पा' व 'महालक्षुमिबाई' उत्सव हा घरातल्या सर्व आप्तस्वकियांचा असतो व तो इतर उत्सवापेक्षा थोडा वेगळा व कुटंबातील नात्यांच्या विणी अधिक घट्ट करणारा असतो...ज्यास्त जवळचा असतो....!आम्ही सगळे ह्यनिमित्ते चार दिवस का होइना एकत्र असतो!! ती उर्जा मग पुढील वर्षभर पुरते. सगळ्यांच्या बाबतीत असेच असेल ह्याची खात्री आहे.

कारवी, धन्यवाद!
पूजा मंत्रांचा मूळ ढाचा तोच ठेवून 'श्री सूक्ताचा' सन्दर्भ घेतोय.
"...कुठल्याही आईसाठी शुद्ध + समर्पित भाव महत्वाचा, तंत्र पुढेमागे झाले तरी चालते...." हे एकदम मान्य! कारण तिथे 'मातृभाव' आहे! लहानग्याच्या शुद्ध भावनेने केलेली पूजा आई स्वीकारेलच ह्याचा विश्वास आहे...! कारण करवून घेणारी तीच आहे!