प्रथम तुला वंदितो

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 18:27

मंडळी, पुढे तुम्हाला दिलेल्या प्रश्नावरून तुम्हाला गणपतीच्या जागा/नावे ओळखायची आहेत. पाहा बरं श्री गणेशाच्या कृपेने किती ओळखू शकता .. गूगल, याहू, बिंग, सिरी, अ‍ॅलेक्सा, कोर्टाना ने करू शकता Happy

१. नवसाला पावणारा मुंबईमधला सार्वजनिक गणपती.
२. मुंबईमधले, मध्यवर्ती ठिकाणावरचे स्वयंभू गणपतीचे स्थान.
३. जिजाबाईंनी बांधलेले पुण्यातले गणपती मंदिर.
४. मुंबईमधला पहिला सार्वजनिक गणपती (१२९ वर्षे)
५. मुंबईमधल्या ह्या सार्वजनिक गणपती ला यंदा १०१ वर्षे पूर्ण झाली.
६. मुंबईमधला हा सार्वजनिक गणपती नेहमी शाडूचाच असतो नि सोन्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
७. मुंबईमधला हा सार्वजनिक गणपती जो 'नवसाला पावणारा श्रीमंत गणपती' म्हणून ओळखला जातो. ह्या मूर्तीच्या हातापायांची घडण सोन्याची असते.
८. सोन्याचा मुकूट धारण करणारा मुंबईमधला हा सार्वजनिक गणपती.
९. ४० फूट उंचीची गेल्या शताब्दीमधली सर्वात उंच म्हणून मिरवला गेलेला मुंबईमधला सार्वजनिक गणपती.
१०. १०० फूटापेक्षा जास्त उंचीचा गणपती मुंबईत कोणत्या ठिकाणी बसविला जातो?
११. सूर्यरूपात असलेली ६१ फूट उंच गणपती मूर्ती कोठे आहे.
१२. विनायकी स्वरूपात गणेश असलेली महाराष्ट्रातील जागा.
१३. धातू पासून बनविलेला जगातील सर्वात मोठा गणपती.
१४. लोकमान्य टिळकांनी स्थापना केलेला पुण्यातील गणपती (ही मूर्ती अजिबात बदललेली नाही)
१५. पुण्यातील हिंदू आणि मुस्लिम कुटुंबीयांनी एकत्र येऊन सुरू केलेला गणपती.
१६. पुण्यातील पाचवा मानाचा गणपती.
१७. पुण्यातील दुसर्‍या देवाचे नाव मिरवणारा गणपती.
१८. पुण्यात एका स्वातंत्र्यसैनिकाचे नाव असलेल्या ठिकाणचा गणपती.
१९. मोदकाऐवजी बेसन लाडू प्रसाद दिला जातो असा अष्टविनायक.
२०. अष्टविनायक यात्रेची सुरवात ह्या गणपतीपासून होते.
२१. एक प्रदक्षिणा घालायला जास्तीत जास्त वेळ लागतो असा अष्टविनायक गणपती.
२२. भाविक स्वतः पूजा करू शकतात असा अष्टविनायक मधील गणपती.

उत्तरे:
१- लालबागचा राजा
२- प्रभादेवीचा सिद्धिविनायक
३- कसबा गणपती
४- केशवजी नाईक चाळ गिरगाव
५- चिंचपोकळीचा गणपती
६- किंग सर्कल गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाचा गणपती
७- गौड सारस्वत ब्राह्मण समिती गणपती, वडाळा.
८- अंधेरीचा राजा, आझाद नगर समिती
९- खेतवाडीचा गणराज
१०- चिन्मय गणाधिश कोल्हापूर
११- हैदराबाद जवळील खैरताबाद गणेश
१२- नागनाथ परभणी
१३- Khlong Khuean, thailand
१४- तांबडी जोगेश्वरी गणपती
१५- गुरुजी तालीम गणपती
१६- केसरी वाडा गणपती
१७- जिलब्या मारुती गणपती
१८- दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनू चौक
१९- श्री बल्लाळेश्वर, पाली
२०- श्री मयुरेश्वर, मोरगाव
२१- श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक
२२- श्री वरदविनायक, महड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

५. मुंबईमधल्या ह्या सार्वजनिक गणपती ला यंदा १०१ वर्षे पूर्ण झाली.
लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळ, चरई, ठाणे ( स्थापना १९१९)

६. मुंबईमधला हा सार्वजनिक गणपती नेहमी शाडूचाच असतो नि सोन्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.
GSB ( गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळ, माटुंगा / किंग्ज सर्कल

९. ४० फूट उंचीची गेल्या शताब्दीमधली सर्वात उंच म्हणून मिरवला गेलेला मुंबईमधला सार्वजनिक गणपती.
खेतवाडीचा गणराज, १२वी गल्ली, खेतवाडी, गिरगाव

१५. पुण्यातील हिंदू आणि मुस्लिम कुटुंबीयांनी एकत्र येऊन सुरू केलेला गणपती.
गुरूजी तालीम मंडळ गणपती, लक्ष्मी रोड

१६. पुण्यातील पाचवा मानाचा गणपती.
केसरी वाडा गणपती, नारायण पेठ

१७. पुण्यातील दुसर्‍या देवाचे नाव मिरवणारा गणपती.
तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ

९. ४० फूट उंचीची गेल्या शताब्दीमधली सर्वात उंच म्हणून मिरवला गेलेला मुंबईमधला सार्वजनिक गणपती.
१०. १०० फूटापेक्षा जास्त उंचीचा गणपती मुंबईत कोणत्या ठिकाणी बसविला जातो?

@ संयोजक ---
प्रश्न ९ आणि १० एकमेकांशी विसंगत वाटत आहेत. काही बदल आवश्यक आहे का?
की प्रश्न १० मधील गणपती मुंबईतच आहे पण सार्वजनिक नाही?

१९) पाली गावच्या बल्लाळेश्वरास नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू असतात