नानांचा बदला

Submitted by सखा on 21 August, 2020 - 02:29

*नानांचा बदला*

२२ डिसेंबर २०१९ सकाळी १०.३०

नाना किराणा घ्यायला म्हणून दुकाना समोर रांगेत उभे होते. अचानक मागून गल्लीतला गुंड आणि गावातला टुकार नेता बंड्या आला आणि रांग मोडून दुकानात सगळ्यात पुढे जाऊन उभा राहिला.
वयोवृद्ध नानांनी शांतपणे त्याला रांगेत मागे जा म्हणून सांगितलं. तसे रांगेत बरेच तरुण पोर होते पण एकाची हिंमत झाली नाही बंड्याला मागे जा म्हणायची कारण त्याची दहशतच तशी होती.
आपल्याला एक म्हातारा आव्हान देतो याचा बंड्याला प्रचंड राग आला आणि "क्यु बे बुड्ढे बहुत मस्ती हैं क्या?"
असं म्हणत गुंड बंड्याने नानांना ढकलून खाली पाडलं. नाना ना बिचार्‍यांना खरचटलं पण गुंडांच्या कोण नादी लागणार? ते बिचारे तसेच किराणा न घेता लंगडत घरी गेले.

३१ मार्च २०२० सकाळी १०.१५

नानांना घराच्या बाहेर घाईघाईत पडताना बघून त्यांची पत्नी म्हणाली अहो तुम्हाला एवढा खोकला आणि सर्दी झाली आहे बाहेर कुठे जात आहे? नाना म्हणाले आलोच कोपऱ्यावर जाऊन येतो. तू तोपर्यंत गरम गरम गरम आल्याचा चहा टाक.
माननीय नेते बंड्या साहेब गल्लीच्या नाक्यावर आपल्या स्कॉर्पिओ ला टेकून मस्तीत सिगरेट पीत उभे होते.
नाना शांतपणे आपली काठी टेकत टेकत त्याच्याजवळ गेले. जवळ गेल्यावर त्यांनी
हळूच आपला मास्क काढला आणी म्हणाले "नमस्कार नेते साहेब!"
बंड्याने वळून बघितलं तर तोच म्हातारा ज्याला त्यानी अद्दल घडवली होती होती. अचानक बंड्याचे डोळे विस्फारले कारण त्या म्हाताऱ्याने मास्क काढला होता, डोळे बारीक केले, तोंडाचा जबडा मोठा केला आणि नेम धरून सर्वशक्तीनिशी म्हातारा बंड्याच्या तोंडावर जोरदार शिंकला.
नानांच्या शिंकेचे तुषार अचानकच मुखकमलावर येताच माननीय बंडोपंत एखाद्या बेसावध लबाड कुत्र्यावर थंड पाणी ओतावे आणि त्यांनी जीव धरून पळून जावं, तसं बंड्या भीतीने मरणांत वेगाने आपली स्कॉर्पिओ तिथेच सोडून नानांना शिव्याशाप देत सैरावैरा पळून जातानाचा एक व्हिडिओ नंतर काहितासातच व्हायरल झाला.
त्याला तसं घाबरून पळताना पाहून नाना स्वतःशीच मिश्कील हसले आणी म्हणाले:
बेटा, याला म्हणतात करोनाची दहशत आणि नानांचा बदला.

#कोरोना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks Happy

भारीच.
सुरुवात बदला......मग नानांचा बदला.......पुढे पॉझीटिव्ह नानांचा बदला....... नंतर कोरोना पॉझीटिव्ह नानांचा बदला अशी सेरीज काढा.

बदला
बदला
नानांचा बदला

किती घेताय बदलुन बदलून बदला Wink

अनंतनी साहेब तो नकोसा "बदला" कायमचा डिलीट मध्ये बदला असमी ॲडमिन साहेबांना बदल सुचवला आहे. धागा दोनदा सेव झाला आणि डिलीट करण्याचे काही मार्ग मायबोलीने ठेवले नाही त्यामुळे झालेल्या तसदी बद्दल क्षमस्व. आणि त्या निमित्ताने उफाळून आलेला तिरकसपणा याचे स्वागत Wink