हिशोब!!!!

Submitted by 'चंद्र'शेखर पालखे on 18 August, 2020 - 05:27

आयुष्याचं पान सजवीन म्हणतो
काही कडू, काही आंबटगोड आठवणींनी.
काही हरवलेली ,काही गवसलेली नाती
पुन्हा नव्यानं शोधीन म्हणतो
चार तपांची वाळू सरकत राहिली पायाखालून
लाटांवर ठामपणे पुन्हा उभं राहीन म्हणतो
गेलेले दिवस, झाले इतिहासजमा भूतकाळात निश:ब्द होऊन
उरलं सुरलं नव्याने पुन्हा बोलीन म्हणतो
येईल का मांडता इतक्या सहज
आयुष्याचा ताळेबंद?
की जगावे असेच अनिर्बंध
कुठलाही ताळमेळ न ठेवता?
आणि रहावे बिनहिशोबी
हे मागे उरलेले करत राहतील
बेरीज वजाबाकी
गुणाकार भागाकार
आपण कसे जगून गेलो त्याचा?
जाऊदेत आपल्याला काय...
आपली तर सुटका होतेय हळूहळू ...
नंतर काय-
आप मेलो जग बुडाले.

080720

Group content visibility: 
Use group defaults