ओअॅसिस - पान २

Submitted by kanchankarai on 6 May, 2009 - 03:51

शारदाचं जाणं देवदत्तांच्या मनावर खूप मोठा आघात करून गेलं होतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची धूळ्धाण तर उडालीच होती पण सोबतीने त्यांचं व्यावसायिक स्थैर्यही संपुष्टात आलं होतं. परमेश्वराच्या मर्जीपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं. नाहीतर, देवदत्त आणि शारदाच्या सुखी संसाराला अशी दॄष्ट लागण्याचं दुसरं काय कारण असु शकतं? नित्यनियमाने देवपूजेला म्हणून बाहेर पडलेल्या शारदेने घराकडे पाठ फिरवली, ती कायमचीच! एका ट्रक ड्रायव्हरची क्षणाची बेफिकिरी देवदत्तांच्या आयूष्यात केवढी मोठी पोकळी निर्माण करून गेली.

ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

गुलमोहर: