Submitted by निशिकांत on 16 August, 2020 - 13:32
केले तुला वजा तर, का शुन्यही उरेना?
हातात हात नसता पाऊल चालवेना
झाली लिहून सारी, मतला मला सुचेना
गजलेस पूर्ण करण्या जमल्यास तूच येना !
पाहून वाट थकलो फुलता कळी फुलेना
निर्माल्य व्हावयाचा शोकांत तिज रुचेना
हरली प्रकाश किरणे अंधार पेलवेना
आश्चर्य गर्भगृहिचा का दीप पाजळेना
पाहून खूप गर्दी देवासही कळेना
भरतात दानपेट्या, पण भक्त का दिसेना?
मी गुंतलो न मोही मुक्ती तरी मिळेना
पिंडास आज माझ्या का कावळा शिवेना ?
रेखीव मस्त बांधा हे स्वप्न सोडवेना
निष्ठूर माय पान्हा बाळास पाजवेना
"निशिकांत" नाटके ही झाली अता पुरे ना!
श्रीमंत आव, दमडी बटव्यात सापडेना
"निशिकांत" जीवनाची का लालसा सुटेना?
अन् जीर्ण पिंजर्यातुन आत्मा तुझा उडेना
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा