वडापाव

Submitted by स्वस्ति on 6 May, 2009 - 00:23

मल्लिनाथांची 'तिला कविता आवडत नाही ' वाचली आणी मला माझं एक जुनं विडंबन आठवलं.
जुन्या हितगुजवर टाकलं होत , इथे परत लिहितेय.

त्याला वडापाव आवडत नाही , तिला वडापाव आवडतो .
तिने वडापावचा हट्ट धरताच तो solid भडकतो .
असलं अरबट चरबट खाण्यापेक्शा सुकी भेळ का खात नाहीस .
त्याचे असले गोल फडें खरचं तिला कळत नाहीत.

वडापाव is unhealthy ,वडापाव is junk food .
वडापाव is tempting ,वडापाव tastes so good .

वडापाव पोट खराब करतो , तरिही तु त्यासाठी वेडी.
कधी खात तर नाहिस , मग तुला काय कळणार आहे त्यातली गोडी.

वडापाव म्हणजे फुकटचं खाणं , काहितरी आपलं तेलकट उगाच.
मन आणि पोट कसं तृप्त होउन जातं , एक वडापाव पोटात जाताच.

दरवेळी फिरायला गेल्यावर दोघांच हे असं होत.
खाण्यावरुन भांडण होउन वेटर समोर हसं होत.

वडापाव आवडत नसला तरी पाणिपुरी त्याला आवडते .
मग 'पाणिपुरी तरी healthy कशी ?' म्हणून ती ही झगडते.

रुसुन मग ती निघून जाते , फुगुन बसते पुरीसारखं
त्याच तिचं भांडण असं आंबट्-गोड चटणीसारखं

--स्वस्ति
!!!*************************!!!
तुहा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी !

गुलमोहर: 

धम्माल Happy मस्त आहे

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

मस्त Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

.मस्त आहे
.......................................................................
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" तृप्त. "

त्याच तिचं भांडण असं आंबट्-गोड चटणीसारखं
मस्त.
घरोघरी असेच वडापाव आणि पाणीपुरी !

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..