प्रिय मायबोलीकरांनो !

Submitted by डी मृणालिनी on 13 August, 2020 - 10:26

प्रिय मायबोलीकरांनो !
माझा मराठी भाषेतील लेखन प्रवास सुरु होऊन ८-९ वर्ष झाली आजपर्यंत केवळ आवड म्हणून लेखन केलं ,माझ्या अनुभवांवर लेखन केलं ,दुसऱ्यांचे लेख अनुवादित करून दिले , documentries साठी स्क्रिप्ट्स लिहिल्या . पण आता मी १६ वर्षाची झाली आहे. हळूहळू 'स्वावलंबन ' या विषय मनावर घेते आहे. त्यासोबतच BA in journalism करण्याचा विचार आहे. हे सर्व करण्यासाठी मला अनुभव आणि कमवणं या दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत. अजून एक्स्पोजर घ्यायचा आहे. यासाठी मी लोकांचे अनुवादन वगैरे करण्याचे काम घ्यायचा विचार करते आहे. ( कोणताही विषय .) ज्यामुळे माझा लेखन अनुभव वाढेल . मी मराठीत जास्त चांगले करू शकते पण इंग्लिश मध्येही करू शकते . मी काही फार मोठी लेखिका नाही ( कच्चा लिंबू Happy ) त्यामुळे मी इतक्यात तरी पैसे स्वतःहून घेणार नाही . पण वर सांगितल्याप्रमाणे हळूहळू स्वावलंबन च्या दिशेने वाटचाल करायची आहे ( आई -वडिलांचा आदर्श ) म्हणून मी हे सध्या gift culture वर ठेवणार आहे.
मायबोली यात नक्कीच सहकार्य करेल ,मला खात्री आहे. माझा पहिला job Happy मला मा . बो च देईल .. आशा आहे ..
संपर्क :- dmrunalinims@gmail.com ,whatsapp no. 9405632848

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला खूप खूप शुभेच्छा मृणालिनी !! अगदी योग्य मार्गावर आहेस असं वाटतय. All the best dear Happy !

शुभेच्छा तुला!
कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत अनुवाद करु शकतेस ही माहिती पण लेखात ॲड कर.
तू कधी TED talks अनुवादित केले आहेस का? It's a volunteer thing. केले नसशील तर जरूर करून बघ. तुला तुझ्या पोर्ट फोलिओ मध्ये याचा उल्लेख करता येईल.