टि.बी मधून बाहेर पडताना भाग 2

Submitted by Rohini Sable on 11 August, 2020 - 14:04

बाळाला पाजायला घेतले तर चक्कर च आली. डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली.का असे होतेय समजत नव्हते.तशीच पडले खाली. बाळ कधी झोपी गेले काय माहिती. सकाळी जाग आली ती दिवू च्या रडण्याने.तीला जवळ घेतले.पण आता बरे वाटत होते.ताप पण उतरला होता. मग ऊठले.जेवढे होईल तेवढे काम केले.आज अजिबात त्रास होत नव्हता.माझ्या घरातील सर्व जन खुप चांगले आहेत. त्यामुळे काम होईल तेवढे च करते मी.पण दुपारी परत ताप आला. थंडी वाजून आली. दिवू ला जवळ घ्यायची पण भिती वाटत होती. कारण ताप खुपच होता.सासू ने दीवू ला बाहेरून दूध आणले. कसे तरी तिला पाजले. आणि मला डॉक्टर कडे घेऊन गेल्या. डॉक्टर ने परत ताप बघितला. 103 होता.त्या च गोळ्या दिल्या.
असे रोज च होऊ लागले .दिवस भर बरे वाटायचे आणि संध्याकाळ झाली की ताप यायचा.. भीती वाटायला लागली होती रात्रीची. माझी दिवू लांब जायला लागली होती माझ्या पासून. हळूहळू खोकला पण यायला लागला होता.वजन तर झपाट्याने कमी होत होते.जेवण कमी होत होते. अशक्तपणा वाढत चालला होता.छातीत दुखायला लागले होते.खोकला वाढत चालला होता. डॉक्टर कडे जाणे चालू च होते. पण काहीच फरक पडत नव्हता. पाणी सुद्धा कडू लागत होते. हळूहळू ताप मेंदू मध्ये जाऊ लागला.आता मी एकटी च बडबड करायला लागले होते.दिवू फारच कमी वेळ माझ्या पाशी राहायला लागली होती. डॉक्टर ने दिलेल्या गोळ्यांचा उलटा च परिणाम होऊ लागला. आता मला 100% वाटत होते की मी मरणार म्हणून.
मग डॉक्टर ने काही ब्लड टेस्ट करायला सांगितल्या. दुसऱ्या दिवशी सर्व टेस्ट केल्या.संध्याकाळी रिपोर्ट येनार होते.

संध्याकाळी आई रिपोर्ट आनायला गेल्या. मी झोपले होते. ऊठल्यावर आई ला विचारले. रिपोर्ट आनले का ??त्या काहीच नाही बोलल्या. थोड्या वेळाने आशिष (नवरा)घरी आले.त्यांनी मला तयार व्हायला सांगितले. मी विचारले कुठे जायचे य पन काही नाही बोलले.सरळ मला गाडी मध्ये बसायला सांगितले. मी दिवू साठी रडत होते. पन तिला घरीच ठेवले. घरी होते खुप जण तिला पाहायला. मग आम्ही होस्पिटल मध्ये गेलो. तिथे मला लगेच अँँडमिट करून घेतले. मला नव्हते माहिती मला काय झाले य ते. डॉक्टर पन नव्हते सांगत. माझ्या साठी ती वेळ एवढी वाईट होती ना.मी दीवू साठी खुप रडत होते.मला जायचे होते माझ्या बाळाकडे. ती पन खूप रडत होती.आई बोलत होत्या फोनवर. डॉक्टर आले मला बघायला तेव्हा रडत च होते मी.मला विचार रले काय झाले. मी म्हणाले मला घरी जायचे आहे. त्यांनी खुप समजावून सांगितले मला. पण मी ऐकून च नाही घेतले.मग मला रात्री 3वाजता घरी सोडले.पन उद्या परत यावेच लागेल असे सांगितले. घरी गेले माझी दिवू झोप ली होती. तिला कुशीत घेऊन माहिती नाही कीती वेळ रडत होते मी.झोपले च नाही त्या रात्री कोनच.कारण सगळ्यांना माहिती होते मी दिवू ला परत नाही पाहू शकनार.
दुसऱ्या दिवशी सकाळी दिवू ला शेवटचे दूध पाजले.आणि गेले दवाखान्यात. अँडमीट व्हायला. नंतर एक्स-रे काढले, टेस्ट केल्या. दुसर्या दिवशी सकाळी डॉक्टर आले राउंड ला तेव्हा माझ्या बरोबर कोणी नव्हते. तेव्हा मला समजले की मला टि.बी आहे. ऐकून चक्कर च आली मला. कारण लहान असताना मी टि.बी चे पेशंट पाहिले होते. अशा पेशंट जवळ कोणी जात नाही. त्यांची या रोगा मधून बरे होण्याची शक्यता अजिबात नसते.
मला काही च सुचत नव्हते. त्यात अजून एक भयंकर गोष्ट घडली.माझ्या छाती मध्ये दुधाच्या गाठी बनायला सुरुवात झाली होती.जीवघेण्या वेदना होत होत्या. डॉक्टर ला दाखवून पाहिले. ते म्हणाले लौकर दूध काढावे लागेल. नाहीत र ओपरेशन करावे लागेल.
एकावर एक धक्के बसत होते. सगळं विचार करण्याच्या पलिकडे गेले होते. तेवढ्यात आशिष आले. त्यांना पाहून रडूच आवरले नाही. खूप रडले.मग एक सिस्टर आली.तिने सगळे दूध काढले. भयंकर त्रास झाला. असे वाटत होते जीव गेलेला बरा.
थोड्या वेळाने डॉक्टर ने आशिष यांना सांगितले की मला कुपर होस्पिटल ला न्यावे लागेल.तिथेच पुढील उपचार होतील.त्या दिवशी शनिवार होता.मग सोमवारी कुपर होस्पिटल ला जायचे ठरले.मग आजच डिस्चार्ज द्यायचे ठरले.4वाजता मी घरी गेले. पण डॉक्टर ने सांगितले होते. कोणाला जवळ येऊ द्यायचे नाही. बोलायचे नाही. तोंडावर कापड ठेवायचे. बाळाला सुद्धा जवळ घ्यायचे नाही. घरी गेल्यावर अंघोळ केली. आणि बसले एकटी. काय झाले काय माहिती अचानक मी मोठ्या मोठ्या ने रडायला लागले. तोंडावर नखांनी ओरखडा य लागले. सगळे घाबरले होते. असे वाटत होते की कोणीतरी तोंड दाबुन ठेवले माझे. मला खुप त्रास होत होता. मग आशिष ने मला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवत बसले.मला बरे वाटले. त्यांना समजले की मी खुप घाबरलेय मरणाला. मला बोलले की मी तुला काही च नाही होऊ देनार.मी तुला यातून बाहेर काढणार.काही ही झाले तरी मी मरू नाही देणार तुला..तु कमजोर नको ना होऊ.मी आहे ना.मग कशाला घाबरून जाते. तुला लौकर बरे व्हायचे य .माझ्या साठी,आपल्या दिवू साठी.ऊठ.रडायचे नाही.चल पोटभर जेवण कर आता.आणि झोप निवांत.काही नाही झाले तुला.फक्त अशक्तपणा आहे. आणि तो जेवण केले की जातो.
त्यांच्या बोलण्याचा काय परिणाम झाला माझ्या वर .मी उठून तोंड धुऊन आले.आईंने जेवण आणले.काही च चव लागत नव्हती.तरीसुद्धा खाल्ले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची तब्येत आता बरी झाली असावी ही सदिच्छा. या तुमच्या अवघड प्रवासाबद्दल इथे लिहून तुमचे मन हलके होवो.

या लेखमालेत जर शक्य असेल तर टीबी कश्यामुळे झाला, तो टाळता येण्यासाठी काही करणे शक्य होते का (जसे आहार वा व्यायाम वगैरे) तसेच बरे झाल्यावर दीर्घकाळासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत लिहिले तर ती माहिती उपयोगाची ठरेल.

तुमचा हा व आधीचा लेख आरो ग्यम् धनसंपदा https://www.maayboli.com/node/2500 या ग्रुपमध्ये हलवाल का?

त्या ग्रुपचे सदस्यत्व घ्या आणि या लेखावर असलेल्या संपादन टॅबवर क्लिक करून ग्रुप बदला.

तसंच एका वेळी जास्त लिहिणे शक्य नसेल तर आधीचाच लेख एडिट करून त्यात लिहिता येतं

मुंबईत क्षयरोग आजाराचे प्रमाण खूप जास्त आहे. अनेक श्रीमंत लोकांना देखील हा आजार झालेला आहे. मिसळपाववर डॉ. श्रीहास यांचे बरेच लेख आहेत. फक्त फुफ्फुसे नाही तर वेगवेगळ्या अवयवांना देखील होतो.

बापरे.
काळजी घ्या.या रोगाबद्दल फार काही माहिती नसते.मागे विवेक ओबेरॉय ची बलगम की जांच किजीए वाली जाहिरात तितकी आठवतेय.

सर्व लेख एकत्रच लिहिला तर उत्तम. इतके लहान लहान भाग का करताय? सगळी माहिती एकत्र असली की वाचणार्‍यांनाही सोपे आणि त्याखाली बाकीची चर्चाही एकाच ठिकाणी राहील.

लेख इथे च असेल तर सर्व लोकांना वाचायला मिळेल. केवळ sadasyaansaaTheechyaa ग्रूपवर लिहिला तर जनरल पब्लिकला वाचायला मिळेल की कसे याची कल्पना. naahee.

अनुभव वाचते आहे. पुर्वी असे होते की टी बी बरा होत नसे, परंतु आता वेळीच उपचार केल्यास त्यातुन पुर्ण पणे बाहेर पडता येते.

क्षयरोग जनरीक सर्व शरीराचा असतो>
असं नाही अनु, फुफ्फुसांचा कॉमन असला तरी, आतड्याचा, हाडं, glands यांचाही टीबी असतो. ओळखीच्यांचा ऐकला आहे.

फुफ्फुसाचा क्षयरोग
दूषित थुंकी (स्पुटम पॉसिटिव्ह)
अदूषित थुंकी (स्पुटम निगेटिव्ह)
फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा
ग्रंथीचा क्षय्ररोग ( लिम्फ नोड )
हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग
जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग (जनायटो-युरिनरी ट्रॅक्ट )
मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (नर्व्हस सिस्टिम )
आतडयाचा क्षय्ररोग

ओके ओके
माझ्यासाठी ही नवी माहिती आहे
तुमचा प्रश्न व्हॅलीड आहे हेमंत तेहतीस.