निखारे मनातले

Submitted by मुक्ता.... on 5 August, 2020 - 06:44

सहज एका शॉर्टफिल्मवरून ही मुक्तछंदातली रचना सुचली!!

ती...

त्याची आठवण मुद्दाम पुसत ती नाही मनातून!
सतत टोचणी रहावी ती....
निखारे त्याने दिले,तिने घेतले
तेच तर तिने आठवणी म्हणून जपून ठेवलेत...

रोज नित्य आहे हा परिपाठ,
पोथी उलगडून बघते ती.
स्वतःला अधिक अधिक कणखर करतेय ती!!
ती आणखीन पुढे जाते,
आणि तो?
हसते ती मनात मनात,
कारण नाही माहीत तिला, तो काय करतोय...
आणि जाणायचं नाहीच तिला....

आठवणींची ऊर्जा नकारमक आहे
पण ती अंधारवाटेचा दिवा म्हणून वापरतेय,
उजळलेल्या पायवाटा,
आणि तिच्या आत्मविश्वासाचा उजेड!
सकारत्मक सूर्य...तिनेच निवडलं क्षितिज...
तिचं आभाळ नाही....आवडत नाही तिला कोंदटलेलं...
म्हणून तिने सुर्यच निवडला ध्येय म्हणून...

त्याचं काय असेल दिशा शोधत, किंवा चाचपडत असेल नाहीतर त्याचंही असेल नवं क्षितिज...
पण ती, आश्वासनांच्या चांदण्याला भुलत नाही
आणि प्रकाश गवसला तरी...
तरी.....जुना निखारा थंडावू देत नाही....

अहो,
समाजमनाचा भडिमार होतो तिच्यावर...
माहितेय तिला....
ती ती ती म्हणून गतिरोधक यायचेच,
पण ती डोळस आहे.
त्याच्या नावाने खणलेले खड्डे माहित्येय तिला....
आत्मउजळ आहे ती!
निखाऱ्यांच्या रूपाने जळतेय आतून.....
पण ....पोळत नाहीय!!

ती जात राहीलच पुढे,
कुणाची विश्रांती होईल की...
तेव्हा निखारे विसरेल की नाही हे मला माहित नाही...
कदाचित थांबेल तिथवर काही काळ,
आणि नवा हात हातात घेऊन,
आणि कुणाला आत्मविश्वास देईल ती!!

मुक्ता

Group content visibility: 
Use group defaults

आठवणींची ऊर्जा नकारमक आहे
पण ती अंधारवाटेचा दिवा म्हणून वापरतेय,
उजळलेल्या पायवाटा,
आणि तिच्या आत्मविश्वासाचा उजेड!
सकारत्मक सूर्य...तिनेच निवडलं क्षितिज...
तिचं आभाळ नाही....आवडत नाही तिला कोंदटलेलं...
म्हणून तिने सुर्यच निवडला ध्येय म्हणून...>>> वाह..