स्मरे लाजणारे तुझे चांदणे

Submitted by तो मी नव्हेच on 4 August, 2020 - 11:08

तो सागराचा किनाराच होता जेथे तिचे व्हायचे भेटणे
नदीही मिळाली जशी सागराला तसे आमचे व्हायचे भेटणे

आता तसा तो किनारा न उरला आता न येई तशी ती पहाट
आता न राती उद्याची प्रतिक्षा न स्वप्नी उद्याच्या तसे जागणे

आता उराशी झाली जखम जी न चाले तिथे कोणतीही दवा
दुवा घेतसे मी लपेटून त्यावर ह्रदया फकीरी असे झाकणे

परि मी उशाशी उसासे न देतो न देतो कुणाला कसलेच शाप
जरी तेही येती उफाळून वरती शिकलोय दुःखासवे रोखणे

होतीच आहेच आणिक राहील माझ्या मनातील ती भावना
जरी जगरहाटीत विसरेन थोडे स्मरे लाजणारे तुझे चांदणे

- रोहन

Group content visibility: 
Public - accessible to all site users