तू हरवणे संपवत नाही

Submitted by अविनाश राजे on 3 August, 2020 - 09:14

तू हरवणे संपवत नाही
मी शोधणे संपवत नाही

जाणतो तुझे सोंग मी गड्या
मुद्दाम तुला जागवत नाही

बोलण्याची एकही संधी
येथे कोणी गमवत नाही

सोडली सारी व्यसने मी
तुला मात्र सोडवत नाही

मी जिंकू देतो तुला तरी
तू का मजला हरवत नाही?

हिंसा टाळली पूर्ण तरी
कीड कोणीच जगवत नाही

Group content visibility: 
Use group defaults