कारण नसता

Submitted by अविनाश राजे on 3 August, 2020 - 09:10

कारण नसता मी इकडे आलो
कारण नसता मी इथला झालो

बसले सर्व उभा ठेऊन मला
खालमानेने मग मी निघालो

पेला माझा उष्टा होता तरी
तहान अशी कि त्यातूनच प्यालो

अनोळख्याने ओळखले मजला
मी भरदिवसा चांदण्यात न्हालो

सांगितली गीता मी माझी मला
मीच कृष्ण, मीच अर्जुन झालो

Group content visibility: 
Use group defaults