कर्कयाति

Submitted by प्रगल्भ on 2 August, 2020 - 03:27

*कर्कयाति*

भाग - 1
(ऋन्मेष सारांच्या कल्पनेतून आणि प्रेरणेतून Happy )
कर्क रास ही राशिचक्रातील चवथ्या क्रमांकाची रास! “चंद्रमा मनसो जात:।”
राशीस्वामी चंद्र!!

कर्क राशिचं बोधचिन्ह 'खेकडा' हे आहे. मुळात काही लोकांमधे
फार मोठ्या प्रमाणावर असा गैरसमज आहे की 'कर्क' राशीच्या
व्यक्तिला कर्करोग होतो किंवा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे,
कर्क राशिला बोधचिन्ह हे खेकडा लाभलं कारण कर्क राशिच्या व्यक्ति
या अत्यंत चिकाटी असलेल्या, श्रद्धानिष्ठा भक्क्म असलेल्या असतात.
तुम्ही कर्कराशिच्या व्यक्तिंच मत बदलवू शकत नाही. कदाचित
या राशिच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे रोगाला ते नाव दिलं गेलं असेल. कारण
' कॅन्सर' हा शब्द 'क्रॅब' पासून आलेला आहे. तात्पर्य एकाच ओळीत सांगायच
झालं तर ' कर्केची असलेली गोष्टींवरची, विचारांवरची, (ध्येयावरची) पकड ठिसुळ होतं नाही'
(ध्येयावरची कंसात घातलं कारण... मूडनुसार ध्येय बदलली जातात)

'कर्क' रास ही मुळात स्त्री राशी आहे. समजुतदारपणा, हळवेपणा, करारीपणा, वात्सल्य, चिकाटी हे ठासून भरलेलं असत. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने कर्क रास असणार्‍या व्यक्तिंचे मूड्स सतत बदलत असतात. कधी हसतील, क्षणात डोळे भरून येतील, कधी चिडतील धुसफुसतील, तर कधी डायरेक्ट गळ्यात पडतील.

चंद्र मातेचा कारक, वास्तूचा कारक घरादारावर प्रेम करणारी मुलाबाळांकडे वात्सल्याने बघणारी ही रास आहे. वात्सल्य नुसतं डोळ्यांत असून उपयोग नाही ते कृतितही यायला हवं. हे
देखील कर्केच्या व्यक्तिंना खूप चांगल्या प्रकारे जमतं.

कर्क रास ही शरीरातील जठर या भागावर अंमल ठेवते. म्हणून कधीकधी चिडचिड होऊन
कर्केच्या व्यक्तिंना पेप्टिक अल्सर होण्याची संभावना असते.

तसेच कर्क ही रास छातीवर देखील प्रभाव पाडते. त्यामुळे छातीच्या
बाबतीत काळजी घ्यावी.

चंद्र हा मनाचा देखिल कारक असल्याने "मनेव मनुष्यानां कारणम मंत्रमोक्षम"!! मन प्रसन्न ठेवणे बंधनकारक!!

कर्क मुग्ध आहे, कर्क अबोल आहे. 'इंटेलेक्चुअल कंपॅनिअनशिप' ची अपेक्षाच करू नये.
ज्याला अबोल प्रेम कळत असेल, जो त्या प्रेमाचा आदर करत असेल त्याने 'पार्टनर' व्हायला हरकत नाही.

मीन हळवी आणि काहिशी भोळसट रास असल्याने कर्क-मीन जमू शकते.

तूळ नम्र असल्याने नम्र चा अर्थ एकाच ओळीत सांगायचा झाला तर "महापूरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती"
यामुळे तूळ-कर्क यांच देखील चांगलं जमू शकत.

मैत्रीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ज्यांना मानसिक पातळीवर संवाद साधता येतो त्यांच्याशी यांची सुंदर मैत्री होते.
कर्क राशीत पुनर्वसु, पुष्य आणि आश्लेषा ही नक्षत्रे येतात. 27 नक्षत्रांतील श्रेष्ठ नक्षत्र 'पुष्य' नक्षत्र आल्याने कर्क रास कमालीची हळवी झालेली आहे.

लग्नाच्या वेळी कर्केच्या मुला-मुलींना कोणती राशी वर्ज्य आहे ते खालीलप्रमाणे:-
'कर्क X कुंभ' --> कर्केचा हळवेपणा, प्रेमळपणा आणि निरागसता - कुंभेच्या गूढ प्रवृत्तीच्या व्यक्तिंना आवडत नाही, जुळवून घेणं जमत नाही.

'कर्क X धनू' --> प्रितीषडाष्टक!

कर्क राशीत गुरू उच्चीचा, मंगळ नीचेचा आणि चंद्र स्वराशीचा!!

व्यवसाय:- खानपान यासाठीच्या गोष्टी, घरगुती गोष्टी विकणे, पाळणाघर चालवणे - वात्सल्याच्या भावनेपोटी
जल राशी असल्याने जलपातळीवर, पाण्याच्या संबंधीत काम करण्याचा देखील कल असू शकतो.
इमोशन्स च्या बाबतीतले व्यवसाय उदा:-अभिनय, डॉक्टरकी (होमिओपॅथी/आयुर्वेदीक) इ.

कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने आणि चंद्र हा श्री शिवशंकरांनी डोक्यावर धारण केलेला असल्याने
तसेच बोधचिन्हाप्रमाणे खेकडा हा दगडाच्या खाली कुठेतरी जसा एकटाच बिळ करून राहत असल्याने असेल...
त्याप्रमाणे कर्केच्या व्यक्तिंना एकांत प्रिय असतो. अर्थात एकांतवासी म्हणजे एकलकोंडी नाही.

अजूनही काही वैशिष्ट्ये आहेत जेणेकरून कर्क राशीच्या व्यक्ति चट्कन ओळखता येतात.

- फास्ट चालणे.
- फास्ट बोलणे.
- विसराळूपणा ( वस्तूंच्या बाबतीत )
- जोरजोरात हसणे(खळखळून)
- कमी प्रतिकारशक्ती (यामुळे साथीच्या रोंगाना लगेच बळी पडतात)
- जाता येता उगाच विचारपूस करणे
- एकाच वेळी मऊ मनाच्या आणि कणखर मनाच्या हा विरोधाभास फक्त इथेच दिसतो.

हे सगळ राशीनुसार झालं. याचा अर्थ असा नाही की तुमचे ‘हे’ किंवा तुमच्या ‘ह्या’ याच वर्णनात चपखल बसतील. जन्मलग्न कुंडलीतील इतर ग्रहांचा सुद्धा प्रभाव पडत असतो व्यक्तिवर. पण पूर्णच वेगळी व्यक्ति सापडणार नाही.
आता थोडे उदाहरणादाखल सांगतो:

प्रसंग एक:

शाळा नुकतीच सुटलीय. सगळे वर्गातून बाहेर पडत आहेत.
प्रिया: “ए सायली, मी लायब्ररी मधून पुस्तक बदलून येते. तू माझी सीट पकडतेस का प्लीज?”
प्रिया बॅग पॅक करतच ओरडली.

सायली : “होSSS पण लवकर ये हं!”
दारातून मागे प्रिया कडे बघत म्हणाली.

प्रिया आणि सायली या वर्गमैत्रिणी शिवाय एकाच स्कूलबस मध्ये!

प्रिया चार-पाच मिनीटांत लायब्ररीत पोहोचली.
पुस्तक बदलायला जरासा वेळच लागला. कारण तिच्यासमोर दोन मुलं आणि एक मुलगी ओळीत आपले बॉरो-कार्ड शोधत उभी होती.

इकडे स्कुलबस चा चालक दहा मिनीट रूटीनप्रमाणे थांबला आणि अकराव्या मिनीटाला गाडी सुरू केली.

“ओ काका थांबा ना!! प्रिया नाही आली अजून”
पाठीमागच्या कुठल्यातरी सीटवर बसलेली सायली किंचाळली.

बस मध्ये बरीच गर्दी असल्याने कोण ओरडतय कळत नव्ह्तं. तरी बस चालक काका गाडी सुरू ठेवून वाट बघत बसले.

काही वेळाने समोरून धावत पळत येणारी प्रिया दिसली.
धावत धावतच प्रिया बस मधे चढली.
आणि बघते तर तोबा गर्दी... मागे जायला जागा नाही.
प्रिया इकडे तिकडे पार शेवटपर्यंत पाहू लागली.
आणि तेवढ्यात सायलीचा वर आलेला हात तीला दिसला.
पण सायलीकडे बघून तिचा पुरता हिरमोड झाला...

आणि प्रिया ला बस मध्येच उभारल्या उभारल्या आपली सॅक वरच्या रकान्यात ठेवताना रडू फुटलं...

पण बस च इतकी ठासून भरलेली होती, की कुणालाही कुणाची पडली नव्हती... इव्हन सगळ्यांचे काही अवयवच एकमेकांना दिसत होते.

(इथे साधी गोष्ट झाली. प्रियाला पुस्तक बदलून यायला वेळ लागला... तोवर बस गच्च झाली... इकडे सायलीने दोघींना हटकलं होतं... माझी मैत्रिण इथे बसणार आहे म्हणून... पण ‘सुयोग’ ने (मुलाने)विचारल्यावर सायलीचा ( वृषभेची लाजाळू असेल Wink ) नाईलाज झाला... आणि उशीरा आल्यावर प्रियाला रडू फुटलं कारण आपल्या मैत्रिणीला सांगितलं असतानाही... तिने आपल्यासाठी जागा नाही धरून ठेवली)  “कमालीचा हळवेपणा!”

तर ही अशी 'कर्क'

आपण पुढील भागांत अजून समजून घेणारच आहोत... Happy
सध्या इथे विश्रांती घेतो.

तोवर तुम्ही 'कर्केचे माबोकर'

तुमच्या देखील स्वत:च्या काही आठवणी, आयुष्यातले प्रसंग मोकळेपणाने कमेंटस मधे सांगा
चर्चा करू Happy

पुढील भागात कर्केचे काही मायनस पॉईंट्स आणि कर्केत येणारी जी तीन नक्षत्रे आहेत
पुनर्वसू चा एक चरण
आणि 'पुष्य' , 'आश्लेषा' या पुर्ण नक्षत्रांंवर उपाजलेल्या व्यक्तिंबद्दल माहिती जाणून घेऊ.

वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून 'कर्क' जाणून घेऊ Happy

(क्रमश:)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे तुम्ही.. मला बऱ्याच गोष्टी।माहीत नव्हत्या.. माझी कुंडलीच बनवली नाही घरच्यांनी त्यामुळे मला माझी।रासच माहीत नाही...
पण ही वाली नक्की नाही हे कळले...

छान Happy

@च्रप्स मी पूर्ण लिहिल नाहीये अजून
तुम्हाला जन्मलग्न कुंडली ची गरज च नाही पडली ? लग्न वगैरे च्या वेळी सुद्धा?
औं?? Proud

तुमची जन्मवेळ, जन्मस्थळ आणि जन्मतारीख सांगाल का?
काढून देतो की लगेच Happy

@किल्ली धन्यवाद !
बघू कितपत लांब होतंय
बरच लिहिण्यासारखं आहे
नेक्स्ट संडे पुढचा भाग Happy

छान लिहिले आहे
माहिती बरीच मिळाली

भाग पुढचा कि पुढची रास