सोन्याची किंमतीत अमेरिकन व युरोपियन मार्केटची भर..

Submitted by विश्वजीत बा. म्हमाणे on 1 August, 2020 - 14:48

विषय - सोन्याची किंमतीत अमेरिकन व युरोपियन मार्केटची भर
लेखक - विश्वजीत बाबुराव म्हमाणे

जगातील गुंतवणूकदारांनी नेहमीच सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानलेली आहे.देशात किंवा जगामध्ये जेव्हा कधी आर्थिक मंदी आली तेव्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झालेलीच आहे.आर्थिक मंदी आणि सोन्याची किंमत यांच्यात नेमका कनेक्शन काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. सामान्यांच्या आयुष्यात गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून म्हणा नाहीतर कार्यक्रम, समारंभाच्या बाबतीत म्हणा सोन्याचं महत्त्व हे त्याच्या नावाप्रमाणेच राहिलेलं आहे. त्यामुळेच भारत हा सोन्याची खरेदी करणारा जगात दोन नंबरचा देश आहे.साधारणता लॉकडाऊन मध्ये मार्च ते जून महिन्याच्या कालावधीमध्ये Rs.40610 वरून Rs.55010 प्रती 10 ग्रॅम एवढी झाली आहे.यादरम्यान जवळजवळ Rs14400 रुपयांनी सोनं महागली आहे.एकीकडे कोविड -19 च्या संकटामध्ये पूर्ण जगभरातील अर्थव्यवस्था ढासळली आहे.बऱ्याच गोष्टींचा किंमतीत घट झालीय.याउलट सोन्याच्या किंमत हि वाढतच चाललेली आहे.यामागचा नेमका कारण काय? भारतामध्ये याची किंमत कशी वाढते? ती कोणती संस्था ठरवते? व अमेरिकन व युरोपियन गुंतवणूकदारांची सोन्यात पडलेली भर हि कशी? हे आपण जाणून घेऊयात.

@ IBJA (India Bullion & Jewellers Association)
या असोसिएशनची स्थापना 1919 मध्ये मुंबईत झाली.दिवसभरात सोन्याची किंमत वाढणार की कमी होणार हे ठरवण्याचं काम असोसिएशन करत असते.असोसिएशन हे काम खालील तीन मुद्द्यांवर ठरवत असते.

1) जागतिक बाजार(International Market)- जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याची किंमत व त्याची मागणी किती आणि गुंतवणूकदारांची एकूण सोन्यामध्ये असलेली गुंतवणूक हि कमी की जास्त याच आधारावर सोन्याची किंमत ठरते. म्हणजे आपण अर्थव्यवस्थेमध्ये शिकलोय ज्या गोष्टींची मागणी जास्त त्या गोष्टींची किंमत ही जास्त.

2)डॉलरची रुपयांमध्ये असलेली दर - जागतिक मार्केटमध्ये जर भारताला सोन्याची आयात (IMPORT)करायचे असेल तर तो डॉलरने करावा लागतो म्हणजे डॉलरच्या किंमतीत रुपयाचा भाव किती आहे तेवढी किंमत मोजावी लागते.जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर सहाजिकच किंमत जास्त मोजावी लागते. आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वाढला तर किंमत कमी मोजावी लागते. या गोष्टींचाही परिणाम सोन्याच्या किंमतीत होत असते.

3)अधिक नफा व कर(Taxes and Profit Margin)- गव्हर्मेंट सध्याच्या परिस्थितीत 10% इम्पोर्ट चार्जेस हे एकूण सोन्याच्या खरेदीवर दुकानदारांना आकारते. पुढे दुकानदार सोन्याच्या दागिन्यांवर 3 टक्के GST गुड्स अंड सर्विस टॅक्स आणि 5 ते 10 टक्के मेकिंग चार्जेस हा ग्राहकांनी खरीदी केलेल्या दागिन्यांवर आकारतो. म्हणजे एकूण 15 टक्के रक्कम सोनं खरीदी करणाऱ्यांना जास्त मोजावी लागते.यामुळेही सोन्याची किंमत अधिक वाढते.

@ सोन्याच्या किंमतीत अमेरिकन व युरोपियन गुंतवणूकदारांची भर

जेव्हा कधी अर्थव्यवस्था ढासळत असते तेव्हा गुंतवणूकदार आपले गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी ठेवत असतो. यामुळे कोविड 19 च्या परिस्थितीत अमेरिकन व युरोपियन गुंतवणूकदारांनी जवळजवळ 7 लाख किलो सोनं (700 Matric tones Gold) यामध्ये गुंतवणूक केली आहे ज्याचा प्रमाण फार मोठा आहे.यामुळे सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक अमेरिकन व युरोपियन मार्केटच्या तुलनेत 1993 मध्ये झालेल्या सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा सर्वात जास्त आहे.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही गुंतवणूक त्यांनी Exchange Traded Fund(ETF) म्हणजे म्युच्युअल फंड व स्टॉक च्या स्वरूपात केलेली आहे.याउलट भारत व चीन देशांमधून सोन्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. कारण भारतामध्ये 80 टक्के लोक फिजिकल गोल्ड वर गुंतवणूक करतात.आणि दुसरीकडे लॉकडाउनच्या काळात देशभरात सराफ बाजार बंद असल्यामुळे फिजिकल गोल्डची मागणी कमी झाली.याचाच परिणाम भारताकडून सोन्याच्या आयातीत मोठ्या प्रमाणात घट झाली.

सामान्यांच्या मनातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सोन्याची किंमत वाढणार की कमी होणार? आणि जर भारतामध्ये आणि चीन मध्ये सोन्याची आयात वाढल्यावर त्याच्या किंमतीत काय फरक पडणार का? यावरच अचूकपणाने सांगणे कठीण आहे असे आपले अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. सर्व माहिती नंतर एक गोष्ट मात्र नक्की जगातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक ही नेहमीच सुरक्षित मानलेलं आहे.

जय हिंद जय भारत

आपल्याला ही माहिती कशी वाटली यावर खालील इमेल वर कमेंट करा - vishwajeetmhamane@yahoo.com

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

RBI Sovereign gold bonds open for subscription tomorrow -
ही सोन्यातील बेस्ट गुंतवणूक आहे. आठ वर्षाचा लॉकइन पिरियड आहे. शेवटी टॅक्स बेनेफिट मिळतो आणि दरवर्षी २.५% व्याज. आठवर्षांनी बाजारभावाप्रमाणे मोबदला. फिजिकल सोन्यापेक्षा हे बेस्ट. इन्फ्लेशन बिट करायला हा बरा आणि निर्धोक पर्याय आहे.

आणि दरवर्षी २.५% व्याज>> हे अडीच टक्के कशावर? बॉण्ड घेताना जी किंमत असेल त्यावर की व्याज मिळताना त्यावेळची सोन्याची बाजारभााप्रमाणे असलेली किंमत यावर?