घरापासून मिळणारे उत्पन्न

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 August, 2020 - 05:30

समजा 18 लाख गुंतवणुक करुन मी 2003 मधे एक घर/फ्लॅट घेतला . त्याची आज 2020 मधे त्याची बाजारभावाने किंमत 1 कोटी आहे. त्याचे आज मिळणारे घरभाडे 20 हजार आहे तर मी केलेल्या गुंतवणुकीचा घरभाडे रुपात मिळणारा हा परतावा खरेदी केलेल्या 18 लाखावर धरायचा की आत्ताच्या 1 कोटीवर? तेव्हाच्या 18 लाखाची किंमत आता 1 कोटी झाली यात माझे काहीच कर्तुत्व नाही. हा मला मिळालेला लाभ आहे. अशा वेळी घर विकलेले फायदेशीर की भाड्याने तसेच देत राहणे फायदेशीर? गुंतवणूकीचे अर्थशास्त्र काय सांगते?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Strusturel audit इमारतीस वीस वर्षांनी लागू होते म्हणजे दहा वर्षंपर्यंत जागा विक्रि खरेदी व्यवहार ठीक वाटतात आणि बँक लोन लोन देईल. ( पुढे टक्केवारी कमी होईल.)

पनवेल सारख्या ठिकाणी सिडकोची 15 20वर्षा पूर्वीच्या इमारती मध्ये फ्लॅट (52लाख 2 bhk) मिळत आहे,बिल्डिंग रि devlopmnt ला जाण्याची आशा एजंट दाखवत आहे,
पुढे जावे की कसे याबद्दल कुणी मार्गदर्शन करू शकेल का plz????

Area किती आहे आणि इमारत स्टेशन पासून किती दूर >>>जवळपास 920sq बिल्ट up, स्टेशन पासून 5min चालत अंतर

पनवेल सारख्या ठिकाणी सिडकोची 15 20वर्षा पूर्वीच्या इमारती मध्ये फ्लॅट (52लाख 2 bhk) मिळत आहे,बिल्डिंग रि devlopmnt ला जाण्याची आशा एजंट दाखवत आहे,
>>>>>

वाशी (२५-३० वर्षे जुने) काहीच रिडेव्हलपमेंटला जात नाहीये सिडकोचे
काही गेलेय ते अडकून पडलेय. आम्हीही घर शोधताना तो विचार करत होतो. कारण वाशी भागात नवीन कन्स्ट्रक्शन नाहीयेच. आणि मला फार लांब जायचे नव्हते मुंबईपासून

नव्या मुंबैत सिडकोचे राज्य आहे. मी वर लिहिलेय आधीच, सिडकोने रिडेवलोपची परवानगी दिली होती म्हणून. त्या बिल्डींगईंचे फोटो पेपरात पाहिले होते, अगदी आता पडते की नंतर अशी अवस्था होती तरी सिडको परवानगी द्यायचे नाकारत होते. काहीही होणार नाही. माझे घर 25 वर्षे जुने आहे, अजून 25 वर्षे तरी रिडेवलोपचा विषय निघायचा नाही. Happy Happy

नव्या मुंबैतील जमीन सिडकोच्या मालकीची आहे. सोसायट्यांच्या नावावर कन्व्हेयन्स डिड करून द्यायला सिडकोने भरपूर रडारड केली, शेवटी महत्प्रयासाने ते राजी झाले. तरीही जमिनीवर काहीही करायचे झाले तर सिडकोचे पाय धरावे लागतात. माझ्या कॉलनीतील माझें स्वतःचे घर मला उद्या विकावयाचे झाले तर मला माझी सोसायटी व सिडको दोन्हीकडे जावे लागणार.

पनवेलची परिस्थिती माहीत नाही.

रिअल इस्टेटच्या किमती भविष्यात किती वाढतील याचा अंदाज अनेकांचा चुकतो.अगदी बिल्डर लोकांचा देखील चुकतो. अन्यथा आमच्या गृहसंकुलात बिल्डरने स्वत:साठी अनेक फ्लॅट ठेवले असते. 2005 मधे बिल्डर कडे 25 लाखला 3 बीचके होते ते आज 2020 मधे 1.8 सीआर ला रिसेल मधे जातात.
दुसरा चर्चेत मुद्दा आला तो चांगला फायनान्शियल प्लॅनरचा जो ठरवायला अवघड आहे. इथे प्रश्न विश्वासार्हतेचा येतो. माझा एक सीएफए मित्र आहे त्याच्या कडे गुंतवणूक करत होतो पण नंतर त्याच्या धनदा इन्हेस्टमेंट प्रा लि. ची दिवाळे वाजले. त्यात अडकलेले पैसे गेलेच. मिळण्याची शक्यता फारच कमी. वेळोवेळी त्याने चांगले रिटन्स दिले होते. आता सरासरीमधे शून्य किंवा ऋण म्ह्णावे लागतील. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडेच कल आहे. एक फटका खाल्लाय आता नको. पुढच्या वीस पंचवीस वर्षांचे प्लॅनिंग हे देशाच्या आर्थिक धोरणावरच अवलंबून राहणार. माझा अर्थशास्त्राचा फार संबंध येत नाही. इन्कमटॅक्स पेयर असे लेबल लावून घ्यायची इच्छाही अपुरी राहीली. तिथपर्यंत पोचलोच नाही. बायको भरते टॅक्स. अल्पसंतुष्टत्वात मला आनंद व समाधान आहे. जो देगा उसका भला जो नही देगा उसकाभी भला! पेन्शन देतय मायबाप सरकार बिनचूक.तशी चिंता नाही.

Financial planner आणि portfolio management या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

सध्याच्या काळात रिडेव्हलपमेंट मध्ये जाण्याची किंवा प्रोजेक्ट पुर्ण होण्याची शक्यता कमी आहे. बिल्डर ला दुसरे घर भाड्यानी देणे सध्याची बिल्डिंग पाडुन नवीन बांधायचा खर्च , सरकारला द्यायची. रेडॅव्हलपमेंट फी हे सध्याचा परिस्थितीमध्ये परवडणारे नाही. करोना मुळे सगळ्या कामात वेळ लागत असल्याने द्यावे लागणारे घरभाडे, बॅकेचे व्याज यामुळे बरेच रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चे बजेट कोलमडले आहे आणि परिस्थिति चिघळली की बिल्डर त्या प्रोजेक्ट मध्ये दिवाळे काढुन मोकळे होतात. जर बिल्डिंग पाडली असेल तर लोकाची न घर का न घाट का अशी वेळ येते.

अपवाद फक्त प्राईम एरिया चा. गिरगांव किंवा. स्वारगेट च्या मेट्रो स्टेशन च्या बाजुची बिल्डिंग केव्हाही रिडेव्हलपमेंट मध्ये जाउ शकते. अश्या बिल्डिंगना सरकारने FSI पण चांगला दिल्याने बिल्डर / घरमालना पण चांगला फायदा मिळतो.

Pages