शब्दांसाठी आता

Submitted by अविनाश राजे on 31 July, 2020 - 11:11

शब्दांसाठी आता मी वणवणत नाही
शीळ वाजवतो,गीत गुणगुणत नाही

वेदनेला माझिया शाप उपेक्षेचा
कोणापुढे म्हणून मी कण्हत नाही

सापडेलही हीरा आत एखादा
मीच काळजाचा कोळसा खणत नाही

विचारांनीही भागून पाहतो शहाणा
भावनेला भावनेनेच गुणत नाही

पुराव्याची माझ्या कर जाहीर छाननी
व्हावा न्याय; मी निवाडा म्हणत नाही

Group content visibility: 
Use group defaults