आठ्या मोजत मोजत त्याच्या फोन ठेवते

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 July, 2020 - 00:02

मेलेल्यांची तारिफ होते असे ऐकते
वेठिस धरल्या मनास कायम मारत बसते

आपल्यामधे हाकेचेही अंतर नाही
तितक्यामध्ये कसे काय जग उभे ठाकते ?

त्याच्यामध्ये मशगुल होते फितूर हे मन
माझे असून निर्लज्जागत मला टाळते

तुला हवी तर साक्ष काढ चंद्राचीसुद्धा
रात्र-रात्रभर जागत बसते, कूस बदलते

आवाजातिल तिडीक अन शब्दातिल अंतर
आठ्या मोजत मोजत त्याच्या फोन ठेवते

येण्यावरही त्याच्या रचल्या कविता गझला
जाण्यावरही त्याच्या कविता गझला रचते

सहचर्याच्या वाटेवरती हजार काटे
स्वत्वाचे खत-पाणी घालत बाग फुलवते

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>सहचर्याच्या वाटेवरती हजार काटे
स्वत्वाचे खत-पाणी घालत बाग फुलवते>>> आवडला.

>>>>तुला हवी तर साक्ष काढ चंद्राचीसुद्धा
रात्र-रात्रभर जागत बसते, कूस बदलते>>> हासुद्धा.

तुला हवी तर साक्ष काढ चंद्राचीसुद्धा
रात्र-रात्रभर जागत बसते, कूस बदलते

आवाजातिल तिडीक अन शब्दातिल अंतर
आठ्या मोजत मोजत त्याच्या फोन ठेवते

>>>> दोन्ही शेर खुप छान !!