प्रमाणाबाहेर

Submitted by अविनाश राजे on 28 July, 2020 - 21:27

प्रमाणाबाहेर सगळीच माती असते
मनी चांदतारे पण शून्य हाती असते

तशा जाती दोनच, मानवप्राण्याच्या खऱ्या
एक भली आणि दुसरी, बुरी जाती असते

स्वप्न सोबतीस जे, झोपतो घेऊन मी
डोळ्यांत तेच कसे, पुन्हा प्रभाती असते

झटकतो आपण, थोडी जरी चिकटली तरी
वर म्हणतो कि माती जीवनदाती असते

त्या काळाची शेवटी झाली अत्तरकुपी
अता जातो तिथे ती ही सांगाती असते

Group content visibility: 
Use group defaults

तशा जाती दोनच, मानवप्राण्याच्या खऱ्या
एक भली आणि दुसरी, बुरी जाती असते<< खरं लिहिलं आहे. छान रचना...