तुम्हाला पडलेली स्वप्न आणि त्यांचा अनुभव

Submitted by dodo14 on 27 July, 2020 - 04:35

नमस्कार, हा विषय मला खूप कुतूहलाचा वाटतो, म्ह्णून हा धागा काढायचं ठरवलं, आधी कुठे हा विषय चर्चिला असेल तर माफ करा आणि पुढे काय करायचं ते सुचवा म्हणजे त्या धाग्याखाली हलवणे etc

सुरवात माझ्या पासून करते, दोन वर्षांपूर्वी स्वप्नात मला अजगर दिसला जो माझ्या मागे होता आणि त्याने मला धरलं, मला माहिती आहे कि नाग / साप दिसणं चांगलं नाही पण अनुभव नव्हता आला, १ महिन्यात माझे दोन्ही गुढगे दुखू लागले (Cartilage Issue ) मग डॉक्टर कडे जाणे इत्यादी चालू झालं म्हणजे हे खरं समजावं का?

आत्त्ता एप्रिल मध्ये स्वप्नात मी, माझी आई, मामी आणि मावशी होतो, गजानन महाराजांचा मठ होता, आम्ही प्रदक्षिणा घेतल्या, मी तिथल्या एका बाई ला पैसे दिले मदत म्हणून आणि तिला विचारलं महाराज कुठे आहेत तर ती बोलली ते काय समाधी च्या बाजूला आहेत, मी तिथे पाहिलं तर तिथे महाराज बसले होते in his regular pose
जाग आली, काही कळत नव्हतं का बरं महाराज आले असतील, मे पासून संकटाना सुरवात, आधी मामी च्या घरी तिचा मुलगा आणि मामा हॉस्पिटल मध्ये, मग माझ्या घरी सासू बाई हॉस्पिटल मध्ये (८४ age and Corona +) आणि नंतर माझे आई बाबा दोघे Corona + आणि ऍडमिट..
पण आता सगळं नीट आहे,नक्कीच देवाची कृपा

तुम्हाला पण असे अनुभव असतील तर नक्की इथे लिहा, अपेक्षा आहे कि खरे अनुभव दिले जातील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नात जलाशय (वॉटर बॉडीज) येतात. काहीतरी चांगलेच घडते - असा पक्का अनुभव आहे
यावेळेला उलटे झाले मात्र अगदी परवाच - गीतेमधील श्रीकॄष्णाचे विराट रुपदर्शन अगदी झोपण्यापूर्वी वाचले. स्वप्नात समुद्र भरतीची वेळ व ओहोटीची वेळ - अशा २ वेळी आला. एका शिंपल्यात २ मोती सापडले.
मात्र त्या दिवशी आम्ही खूप दिवसांनी देवळात गेलो.

कदाचित (शुक्र व नेपच्युन संलग्न) ट्राइण चंद्र असल्याने हे जलाशयाचे/वरुण स्वप्न सतत मला पडत असावे. हेरीडीटरी असते का ते माहीत नाही. आजोबांना पाणी यायचे स्वप्नात. ते म्हणायचे पैसे मिळतात त्या दिवशी.