मौन जास्ती बोलके ठरते म्हणा !

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 July, 2020 - 03:12

मोडला आहे जरी माझा कणा
काढतो आहे फणा हा 'मी' पणा

दोन आणिक दोन म्हणजे पाच का ?
प्रश्न हा नाही पडत तो शाहणा

नेमके राहून जाते बोलणे
मौन जास्ती बोलके ठरते म्हणा !

संकटांची वादळे घोंघावती
संभ्रमांचा त्यात वाजे तुणतुणा

शून्य उरले हातचा मिसळूनही
भरवसा नात्यात झाल्यावर उणा

प्रेम होते, प्रेम आहे अजुनही !
स्वच्छ कर, दिसतील हृदयावर खुणा

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर.‌‌..

प्रेम होते, प्रेम आहे अजुनही !
स्वच्छ कर, दिसतील हृदयावर खुणा‌‌>>>>>वाह..