जुन्या काळातील बायका काय काय कामे करीत ?

Submitted by अस्मि_ता on 26 July, 2020 - 01:15

Sadhya lockdown asalyamule amhi family video karaycha tharavala ahe. Theme ahe junya kalatil baykanchi kame.. Kuni krupaya mala sangu shakal ka?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1)जात्यावर दळण दळणे.
२) शेणानी जमीन सारवून काढणे
3) अंगणात शेणाचा शेण काला देणे
4) सर्व डाळी जात्यावर तयार करणे
5) मिरच्या कुटणे आणि मिरची ची powder बनवणे.
6) घरात कोण पैलवान असेल तर त्याला गव्हाचा चिक करून देणे
सध्या एवढीच.

तेव्हाची दिनचर्या लक्षात घेउन कामे ठरवता येतील. जसे सकाळी उठून आधी जात्यावर दळत
मग सडा सारवण रान्गोली
चूल लावणे
गायीला चारा, धार काढणे
न्याहारी तयार करणे
नदी विहीरीवरून पाणी आणणे
कपडे धुणे
स्वयंपाक
पन्क्ती वाढणे उष्टी खरकटी काढणे
भांडे घासणे
दुपारी निवडण टिपण इ कामे...
असे बघता येइल.

आजी च्या काळात पिठाच्या गिरण्या वगैरे रूढ झाल्या होत्या, निदान शहरी भागामध्ये तरी
निनाद माझी आजी तरी नेहमीची पीठे धान्य देऊन गिरणीतून दळून आणायची, अगदीच स्पेशल पीठे असतील तर जात्यावर दळणे.

फ्लॅट सिस्टम असल्याने सडा सारवणे रांगोळी कट

खरीप आणि रब्बी हंगामात सकाळी दहा ते अंधार पडे पर्यंत शेतात काम करणे.
आणि त्याच बरोबर वर उल्लेख केलेली काम सुद्धा करणे

नऊवारी साडी विसरु नका. टिपिकल जून्या स्टाईलची. आता असतात तशा चंकीफंकी नको.

चुलीवर जेवण करणे हे ही add करा.
लहान बाळाला बाहेर अंगणात कोवळ्या ऊन्हात अंघोळ घालणे.(शक्य झाल्यास घंगाळ्यात)

व्वा किती गोड कल्पना आहे. सगळ्या नातेवाईक स्त्रियांनी मिळून पारंपरिक पोशाख (नऊवारी साडी नथ) घालून जुन्या काळातील प्रत्येकी एकेक कामं करायचं आणि त्याचा व्हिडीओ बनवून शेवटी त्या सगळ्या क्लिप्स कम्पाईल करायच्या. खूप हिट होईल हा व्हिडीओ. तुम्ही किती जणी आहात?

1. सडा आणि रांगोळी
2. जात्यावर दळण
3. चुलीवर भाकरी
4. उखळ मुसळ मिळणं अवघड, पण त्यावर काम
5. तुळशीला पाणी घालून दिवा लावणे
6. गायीला चारा घालणे
7. झोपाळ्यावर बसून भाजी निवडणे / फुलं ओवणे
8. पूजेची तयारी, फुलांची परडी
9. सांडगे घालताना किंवा वाळवण करताना
10. घरातल्या छोट्या मुलींना तेल लावून घट्ट खोपा घालणे. (ज्यांच्याकडे छोट्या मुली आहेत त्यांना पण या क्लिपमध्ये परकर पोलका घालून मिरवता येईल)

धान्य वाळवणे, पाखडणे, निवडणे
देवपूजा करणे ,
पोथी वाचणे,
नामस्मरण/जप करणे
सडा रांगोळी,
पाटावर शेवया करणे,
जात्यावर दळणे,
जात्यावरची गाणी पण ऍड करू शकता

विहिरीतून पाणी शेंदणे
बुट्टीत भाजी भाकरी घेऊन नवऱ्याला शेतात नेऊन देणे
सांडगे पापड तयार करणे

छान आयड्या आहे..
पण पुरुषांनाही लावा की थोडी कामे
निदान धोतर पंचा सांभाळत लुडबुड करताना तरी दाखवा
आणि विडिओ लिंक ईथे जरून पोस्ट करा

आम्ही ' वाड्यातली मंगळागौर ' या आमच्या कार्यक्रमात ही थीम सुरवातीला ठेवलेली, बकग्राऊंडला ' घनश्याम सुंदरा ... ' हे गाणं होतं . ते ही आमच्यातलीच एक - जिचा आवाज गोड आहे ती गायची. वर बहुतेक सगळ्या कामांचा उल्लेख झालाच आहे. आम्ही आणि एक केलं होतं -- पूर्वी आता जसा मेकअप बॉक्स असतो तशी पूर्वी लाकडी पेटी असायची, त्याच्या वरच्या झाकणाच्या बाजूला आरसा आणि पेटीत कप्पे असायचे तर त्यात बघून अंबाडा घालायचा , त्यावर गजरा माळायचा, मोठं कुंकू रेखाटायच. आणि नऊवारीचा पदर खांद्यावरून पुढे घेऊन गोड स्माईल द्यायची.
आणि एक - मध्ये मातीचा मटका ठेवून त्यात दोघी असतील तर त्यांनी ताक घुसळायचं . उखळ सुद्धा आहे.

१) घरातच जमिनीच्या उखळात किंवा उभ्या उखळात मसाले कुटणे, ( शेंगदाणा कूट पण असेच करायच्या )

२) नऊवारी साडी / रेशमी पैठण्या

३) हातात तोडे, नथ , छल्ला

४) चुलीवर / स्टोव्ह वरचा स्वयंपाक

५) उभ तुळशी वृंदावन , तुळशीची पूजा, त्यासमोर खाली जमिनीवर रांगोळी आणि त्यातच वृंदावन च्या एका भागात संध्याकाळचा दिवा लावून ठेवण्यासाठी एक कप्पा

६) लामणदिवे लावणे

माझ्या पणजी आज्जी च एवढंच आठवतंय मला...

चूल सारवणे
शेणगोठा करणे, गोवर्‍या थापणे
कंदील, चिमणीच्या काचा पुसणे
ताजे दूध, दही, ताक, लोणी, तूप मिळावे --- यासाठीच्या कृती
तांबा-पितळ भांडी लखलखीत ठेवणे
बाहेरून येणार्‍या प्रत्येकाचे आदरातिथ्य / खाणेपिणे / विश्रांती / नाजनखरे इत्यादि सांभाळणे
सणाप्रमाणे गोड्धोड / दिवळी फराळ / मुलांचे वरखाणे / पथ्याचे पदार्थ --- उपलब्ध साहित्य, पौष्टिकता, चव, आवडीनिवडी याचा मेळ राखून --- लागणार्‍या प्रमाणात बनवणे

बेगमीचे पदार्थ -- लोणची, मुराम्बे, पापड, कुरड्या, सांडगे, मसाले, शेवया, भाजणी, साठं, इत्यादि
वर्षाचे धान्य ऊन दाखवून भरणे
जुन्या रेशमी / जरीच्या कपड्यांना ऊन दाखवणे, घड्या बदलून ठेवणे
गोधडी शिवणे, भरतकाम, विणकाम, जुन्या कपड्यांच्या पिशव्या करणे, हातशिलाई करून कपड्यांची डागडुजी
व्रते-वैकल्ये, पूजा, समाराधना, श्राद्ध याची तयारी + कृतीत सहभाग
घरगुती / झाडपाल्याच्या औषधांची माहिती करून घेणे + साठवण व योग्य वापर
परसबाग करणे

पुरूषांचे, सासूचे आंघोळीनंतरचे कपडे / अंगपुसणे आयते तयार ठेवणे / हातात घेऊन उभे रहाणे
त्यांच्या पायाला / डोक्याला तेलमालीश / चेपून देणे
माहेरचा उद्धार / तिरकस बोलणी, टोमणे, कागाळ्या --- याकडे दुर्लक्ष करून गप्प + हसतमुख रहाणे
गाय, म्हैस, घरातील बायका -- यांची बाळंतपणे + पुढची काळजी
अर्धा / एक / सवा डझन मुले जन्माला घालणे, योग्य वाढवणे, धाकात ठेवणे
वागण्या-बोलण्या-वावरण्यातून बायकीपणा / शालीनता / घरची इभ्रत राखण्याचे सतत भान ठेवणे

मराठीत बोलणे
साक्षर असतील तर देवनागरीत लिहीणे/वाचणे (पत्रे, पोथ्या, पुस्तके )

70 वर्षांपूर्वीच्या ग्रामीण मराठी समाजाचा T S किंवा आडवा छेद घेतला समजू. परिघापासून सुरुवात करू. दिवस उजाडायच्यापूर्वी पाऊण एक तास उठून स्वतः:चे प्रातर्विधी आटपून घेणे. त्यात मशेरी करणे, लावणे, लोटा घेऊन दूर आडोश्याला जाणे, सरपण असेल तर पाणी तापत ठेवणे, केरवारे करणे, आंघोळ आटपून घेणे, जित्राब असेल तर शेण गोठा करणे, दूध असेल तर चहा करणे, न्याहारीच्या तयारीला लागणे वगैरे. पातळ आंबील, पेज, नाचणी/ज्वारीच्या भाकरी ,भाकरीवर जवसाचे तेल आणि तिखट, कांदा, मिरचीचा ठेचा इ. रांधणे, इतरांना उठवून त्यांचे हवेनको बघणे, त्यांना आपापल्या कामावर घालवणे, कोणी रात्री दारू पिऊन पडले असेल तर लवकर उठवल्याबद्दल मार खाणे. सरपण, शेणीगोवऱ्या यांची तरतूद करणे त्यासाठी शेण गोळा करणे, रानातून लाकूडफाटा गोळा करणे, त्याच्या ढलप्या फोडणे, घरात धान्य असेल तर ते दळणे नाही तर मोलाने दळाकांडायला जाणे, नदी/विहिरीवर जाऊन कपडे धुणे, पाणी आणणे, शेतमजुरी करणे, मुलांना जन्म देणे, त्यांचे संगोपन करणे... वगैरे. वाळवण साठवण करण्याचा प्रश्नच नसतो. देशावर भुईमूग उकलायला, शेंगा फोडायला, कोंकणात काजू बी फोडायला, रतांबे गोळा करून फोडायला मजुरीवर जाणे, त्यातल्या त्यात सणासुदिनाला काहीतरी गोड करणे, उतरंडीत तळाशी पसापायली धान्य, एखाददुसरा बंदा रुपया लपवून ठेवणे वगैरे वगैरे...कामाला अंत नसणे आणि भुकेलाही.

माझ्या आजीचे वडील वैद्य (आयुर्वेदिक डॉक्टर) होते. ती लहानपणी त्यांना त्यांच्या दवाखान्यात मदत करायची. बाकी ‘संसार करावा नेटका‘ सुद्धा तिनं केला. आईची आत्या शिक्षिका होती.

गो. नी. दांडेकरांची पडघवली किंवा व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी, माणदेशी माणसं अश्या कादंबर्‍या वाचा. त्यामधून तुम्हाला त्याकाळातील स्त्रियांच्या आयुष्याबद्दल बरीच माहिती मिळेल. मराठीतील काही दर्जेदार साहित्य वाचूनही होईल.

नर्सिंग, शिक्षिका, भाजी विकणे ते सर्कसमध्ये काम, आखाती देशात नोकरी असे वेगवेगळे व्यवसायही करत होत्या. फारच गाणी हवी असतील तर सलमानच्या "भारत" मधली 'स्लो मोशन में' किंवा 'इष्के दि चाशनी' पण वापरू शकता. आजीचाच काळ होता तो Happy
(कटरिना आजी म्हणून नसेल पटत तर जुने नर्गिस, वैजयंतीमाला, इ चे सिनेमे बघा. काही निवडा-बिवडायच्या नाहीत. रेडीयो-टीव्ही नसल्याने, घरे ही एकमेकापासून दूर दूर असल्याने मस्त खिडकी उघडून गात बसायच्या. आपली आजीही असे सुखी जीवन जगली असेल म्हणायचे. उगाच कशाला एवढी कामे मागे लावायची... Wink Happy )

व्हिडिओत काम करायला घरातल्या स्त्रिया मिळतीलही. पण ज्यावर कामे करणार ती जाती, उखळी, शेण, गोठे, जनावरे इ इ इ कुठून आणणार??

साधना, जातं तुमच्याकडेच होतं ना?? का आय.डी दुसरा कुठला होता? कुठल्यातरी धाग्यावर फोटो पाहिला होता मी. "सर्प्राईज!!!!" करत येतील बरं तुमच्याचकडे... Happy

हो, जाते आहे माझ्याकडे. पण मी सध्या गावी आलेय, जाते तिकडे मुंबईतल्या घरी राहिले..

गावातल्या स्त्रिया आता गिरणीवर दळायला जातात व मिक्सरवर वाटपे काढतात Happy Happy जाती अजूनही थोडीफार आहेत पण भातावरची तुसे काढायला वापरायची ती मोठी लाकडी जाती, मुसळी, व्हायने (जमिनीत पुरलेला अर्धा फूट व्यास असलेला लोखंडी खोल पेला, ज्यात मुसळाने धान्य कांडून त्याचा कोंडा काढला जायचा) मात्र इतिहासजमा झालीत.

त्या वायनात लसणीचं तिखट सॉलिड मस्त व्हायचं. माहेरी आता आहे की नाही माहीती नाही, लाद्या घालणार होते. अजूनपर्यंत शेणाची जमिन होती माहेरी.

Lol

शब्दच बदलला, विंग्रजी घातला.

Btw लसूण चटणीला आम्ही लसणीचे तिखट म्हणतो.

अच्छा.
काही लोक लसणाची चटणी एवढी तिखट करतात की लसणीचं तिखट हेच चपखल आहे त्याला.

छान आयडिया आहे
लॉक डाऊन थोडा सैल झाल्यावर ढेपे वाडा ला पण शूटिंग करता येईल.कपडे भाड्याने मिळतात.

करण्यासारखं
नव वारी साडी.
पुरुषांना धोतर , सदरा, आणि बंडी.
जात उपलब्ध होवू शकत म्हणजे जात्यावर दळण आणि त्याच पिठाच्या भाकऱ्या.
तुळस वृंदावन ,तुलसी ची पूजा.
एक पूर्ण दिवस पूर्वीसारखं राहता येत आहे का त्याची trial.
विजेचे दिवे नाही तर पणत्या वापरायच्या.
पंखे आणि वातानुकूलित यंत्र बंद.
टीव्ही बंद, नेट बंद,मोबाईल बंद.
गाडीचा वापर नाही चालत प्रवास.
पावसात बाहेर जायचे असेल तर छत्री वापर नाही तर पोत डोक्या वर घ्यायचे.

हे घ्या

चित्रपट नवरंग

https://youtu.be/X8Ky3pUpzZk

अंतरे ऐकताना , उधळीत ये रे गुलाल सजना , दिल का हाल सुने दिलवाला , शक्कर बटा रे , ही गाणी आठवतात

Mazi comment kahi kelya post hotach navhati.. saglya mayboli karanche khup khup abahr..
Finally kela amhi video..
1. Sahanevar gangh ugalane
2. Vasudevala dhanya dene
3. Sada, Rangoli
4. Devpujesathi phule vechane
5. Devachi bhandi swachha karane
6. Panaji ajji ahet tyana jap kartana dakhvale
7. Ajji natva la shlok shikvtey
8. Jatyavar dhanya dalane (eka bahinikade Jat hota)
9. Vilivar khobare khovane
10. Modakacha naivedya
11. Aai tanhulyala zopavtey
12. Pata varvantyaver vatan karane
13. Devpuja
14. Vati valane, malavstra karane
15. Tulshi chi puja
16. Vide lavane
17. Valvate, maltya, nakhule karane
18. Dhanya nivadane
19. Tak ghusalane
20. Devasamor tal gheun bhajan karane
Asha baryach activities kelya ahet... Ani background la uthi uthi gopala, Vasudev ala ani airanichya deva hi gani takli..

छानच झाला असणार व्हिडीओ.
आम्हीही केला होता. पण जुन्या काळाचा नव्हे. आत्ताचा. त्यात मग पुरुषांनी नारळ फोडणे, फूड प्रोसेसरवर तो खवणे, एक जण कचरा काढतोय, एक उंच झाडू घेऊन जळमटे काढतोय, एक अमेरिकावासी लॉक डाऊन मध्ये घरी ट्रेडमिलवर चालतोय, एक भांडी घासतोय, एक पोळ्या भाजतोय, त्याची बायको लाटता लाटता त्याला इन्स्ट्रक्शन्स देतेय, एक आज्जी गंध उगाळतेय, दोन लंडनवासी लहान मुले शुभम करोति म्हणताहेत, एक डॉक्टर पी पी इ घालून ओळखता येत नाहीय आणि ओळखता न येण्यासारखं काहीतरी करतोय, एक रांगती गोड मुलगी पळापळ करतेय आणि करवतेय, वगैरे. आणि मागे शूर आम्ही सरदार, जिथे राबती हात तेथे हरी अशी गाणी.

अरे वा मस्तच झाला असणार व्हिडीओ. बऱ्याच गोष्टी दाखवल्या आहेत. शक्य असल्यास इथेच टाकाल का माबोकरांसाठी??