मायबोली गणेशोत्सव २०२० साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by Admin-team on 23 July, 2020 - 17:22

यंदा गणेशोत्सव २२ ऑगस्ट्ला सुरु होत आहे.

मायबोली गणेशोत्सव २०२० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर इथे गणेशोत्सवा निमित्त
कोणकोणते उपक्रम आयोजित केले जातात
आणी सहभागी कसे व्हायचे हे कुठे कळेल अ‍ॅडमीन सा?

आणि मला मदत देखील करायची आहे
कॉलेज नोव्हेंबर मधे कदाचीत उघडतील

मी टेम्प्लेट्स उत्तम बनवतो!

माझी काही मदत लागली तर जरूर करेन.

प्रगल्भ, हहेडरमध्ये दिलेल्या लिंक्स पहा, त्यात जुन्या गणेशोत्सवाचे डिटेल्स मिळतील.

खेळ, स्पर्धा, उपक्रम वगैरे संयोजकांनी मिळून बनवायचे असतात.

माझी काही मदत लागली तर जरूर करेन

@रीया धन्यवाद मी वाचतो सगळ्या २००९ चा धागा गायब आहे असं दाखवत आहेत,
२०१९ वरच गेलो डायरेक्ट आणी तिथल्या टेम्प्लेट्स बघितल्या
मी दुसरे धागे बघतो!

"माझी काही मदत लागली तर जरूर करेन" ---> हे असं म्हणायच असतं का
सॉरी ह ... मला माहित नव्हतं ... एडीट करतो Happy

जे कोणी संयोजक टीम बनेल.. यावेळी दणक्यात करा गणशोत्सव.. कोरोनामुळे ऑनलाईन उत्सव साजरा करण्यावरच आता भिस्त आहे. त्यामुळे सर्वांना जोरदार शुभेच्छा ! Happy

अवांतर - भरघोस प्रतिसाद मिळाला तर यावेळी नवरात्रही करूया. नऊ दिवस नऊ उपक्रम Happy

"माझी काही मदत लागली तर जरूर करेन" ---> हे असं म्हणायच असतं का >>>>

काहींना संयोजनात भाग घ्यायचा असतो पण तितका वेळ देता येत नाही. थोडा वेळ देता येणे शक्य असते ते संयोजक मंडळाला तात्कालिक मदत करतात.

ज्यांना पुरेसा वेळ व भरपूर इच्छा आणि डोक्यात कल्पना आहेत त्यांनी संयोजनात भाग घ्यायला आवडेल लिहिले तरी पुरेसे आहे. त्यांना संयोजक मंडळात सामील करून घेतले जाते.

माझ्या शुभेच्छा. मला संयोजनात भाग घ्यायला जमणार नाही पण उपक्रम काय असतील याची उत्सुकता आहे.

जे कोणी संयोजक टीम बनेल.. यावेळी दणक्यात करा गणशोत्सव.. कोरोनामुळे ऑनलाईन उत्सव साजरा करण्यावरच आता भिस्त आहे. त्यामुळे सर्वांना जोरदार शुभेच्छा ! Happy>>>>> +११११०१ Happy

Admin sir,
तुम्ही जे काही काम या गणेशोत्सवासाठी द्याल वा ज्या कोणत्या विभागाचे काम द्याल ते मी करायला तयार आहे.
दिवसभराचे चार तास लेक्चर्स सोडल्यास बाकीचा वेळ तुम्ही द्याल ती कामगिरी करेन. वेळ , उत्साह, अनुभवाची आस सगळच आहे.
( माझा वरचा प्रतिसाद उडवलात तरी चालेल )

मी आहे इच्छूक.
पण मी आधी कामं केलेलं आहे २०१८ ला.
चालतंय काय?

मायबोली
छान होऊ दे कार्यक्रम / उपक्रम .
खूप शुभेच्छा !
गणपती बाप्पा मोरया .

असामी, अभ्या..., प्रगल्भ, नितीनचंद्र, jui.k, यतीन, किशोर मुंढे

तुम्हा सर्वांचे गणेशोत्सव संयोजन मंडळात स्वागत आहे. नवीन ग्रूप तयार केला आहे.

अभिनंदन आणि शुभेच्छा संयोजक मंडळ.

मस्त टीम आहे, प्रत्येकाच्या प्लस पॉईंटची मदत घेऊन मस्त संयोजन करता येईल. तसं पाहिलं तर टॅलेंटेड मंडळ आहे या वेळेला.

शुभेच्छा! मजा करा

Pages