खेळ भविष्याचा

Submitted by Rani19 on 21 July, 2020 - 05:58

कल्पना एक अत्यंत हुशार मुलगी. लहानपणीच वडील वारल्याने घरी फक्त आई, ती आणि लहान बहीण खुशी. वडिलांच्या अकाली जाण्यामुळे घराची सर्व जबाबदारी आई वर पडली होती. आईच शिक्षण फार झालेलं नसल्यामुळे लोकांचं घरकाम करून ती घर चालवत होती. त्यातच कल्पना आणि खुशी ची जबाबदारी. त्यामुळे दोघांचं उच्च शिक्षण घेणं शक्य नव्हतं. तरी कल्पनाने स्वबळावर पार्ट टाईम काम करून स्वतःच सर्व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल. तिला गाडी चालवायची भारी हौस. म्हणुन आई ने जमवलेल्या पैश्यातुन तिला एक सेकंड हँड स्कूटी घेऊन दिली.

कल्पनाच उच्च शिक्षण आता पूर्ण झालं होत. त्यामुळे आता वेळ होती ते नोकरी करून आईला तिच्या कामातून निवृत्त करण्याची. त्यामुळे तिची नोकरीसाठी शोध मोहीम सुरू झाली. त्यातच एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये भरती असल्याची जाहिरात तिने वर्तमान पत्रात वाचली होती. लागलीच तिने भरतीसाठी अर्ज भरला होता. ही नोकरी जर लागली तर त्यांच्या बरेचस्या समस्या सुटणार होत्या. त्यातच खुशीच ही पुढील शिक्षण करणं शक्य होणार होत. त्यामुळे ती या भरती साठी खूप उत्साही होती. अखेर ती वेळ आली. त्या कंपनी मध्ये तिचा इंटरव्ह्यू होता. तशी तिने इंटरव्ह्यूची तयारी केलेली होती, तरी थोड टेंशन होतच. उद्या इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांची उजळणी करत गजर लावून ती झोपते. सकाळी 6 चा गजर वाजतो. आई उठते व कल्पना ला उठवुन गजर बंद करायला सांगते आणि पाणी भरायला निघुन जाते. कल्पना उठुन गजर बंद करते, बाजुला खुशी झोपलेली होती. शनिवार असल्याने खुशी ला सुट्टी होती. तीला शांत झोपलेली पाहुन कल्पना तिला उठवत नाही. ती तयारीला लागते. थोड्या वेळाने खुशीही उठली, ती फ्रेश झाल्यावर तिघींनी नाश्ता केला. मग कल्पनाने सगळ आवरायला घेतल. इंटरव्ह्यू साठी तयार केलेली फाईल, मोबाईल आणि पर्स घेतली आणि देवाला नमस्कार केला, "देवा हा जाॅब मला मिळु दे".. तेवढ्यात घडाळ्या कडे लक्ष जात. अरे देवा ! उशीर होणार बहूतेक. इंटरव्ह्यू ला जायला उशीर होत होता म्हणून घाई घाईत निघताना ती आई ला हाक मारते.

कल्पना - 'आई मी निघते'
आई - अग थांब . दही तरी घे
कल्पना- अग आई उशीर होतोय.. लवकर आण दही ..
आई - हे घे...
कल्पना - आई पाया पडते
आई- यशस्वी हो..
निट जा ग..
हो... स्कूटी ची चावी घेवुन ती घाईघाईत निघते. जरी निघायला उशीर झालेला असला तरी ती इंटरव्ह्यूच्या ठिकाणी वेळेच्या आधीच पोचते. ऑफिसच्या आवारात गाडी लावते आणि आत जाते. इंटरव्ह्यू साठी आलेल्यांना पाहुन ती नर्व्हस होते. तिला वाटत कि, यामध्ये ती निवडली जाईल की नाही. तिचा नंबर येतो आणि इंटरव्ह्यूही चांगला जातो. सुदैवाने ती सिलेक्ट होते. मनातल्या मनात देवाला थँकु बोलते आणि घरी जाताना पेढे घेऊन जाते.

कल्पनाला नोकरीला लागुन जेम तेम दोन महिने झाले होते आणि ती कामात रुळली होती. कल्पना ऑफीस मध्ये एक नवीन सॉफ्टवेअर काम करत होती. मार्च एंडिग म्हणून टार्गेट पुर्ण करायच होत. ऑफीस ची दुसरी कामं, त्यामुळे तेवढा वेळ नाही भेटायचा. म्हणून तिने सरांकडून परमिशन घेऊन घरुन पण काम करायच ठरवल. कामावरून आल्यावर, घरातली कामं आटपून ती ऑफीसच काम करायची. आठवड्या भरात तिच काम पुर्ण झाल आणि तिने ते ऑफिसमध्ये सबमिटही केल.

कल्पनाला भविष्यात काय लिहून ठेवलाय हे जाणून घेण्याची फार ईच्छा होती. जर भविष्य जाणून घेता आलं तर एखादा वाईट प्रसंग घडणार असेल तर तो टाळता येऊ शकतो, अशी तिची धारणा होती. म्हणून तिला भविष्य पाहता येईल असं सॉफ्टवेअर बनवायचं होतं. तसा तीच स्वप्न होत. त्याकरिता तिने आवश्यकतो अभ्यास याआधीच सुरु केला होता. इंटरनेट, पुस्तके असे मिळेल त्या माध्यमातून तिने सॉफ्टवेअर साठी लागणारी माहिती, साहित्य, प्रोग्राम, उपकरणे, सामग्री इत्यादी बाबतची माहिती गोळा करून संकलित केली होती. तसेच सॉफ्टवेअर कस आणि कश्या पद्धतीने करायच, त्याची procedure , कोणत्या सॉफ्टवेअरची जोड लागेल, असे अनेक महत्वाचे मुद्दे तिने डायरी मध्ये नोट डाऊन केले होते. थोडक्यात तिची पूर्वतयारी झाली होती. आता वेळ होती ती स्वप्नांना उजाळा देण्याची. आज रविवार आणि त्या नंतर सलग 4 दिवस सुट्टी होती. टार्गेट हि पूर्ण झाल्यामुळे आता निवांत वेळ होता. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करीत तिनेसॉफ्टवेअर बनवायला घ्यायचं ठरवलं आणि सर्व साहित्य, सामग्री, उपकरणे, पुस्तके आणि ती डायरी असे आवश्यक सर्व गोष्टी घेऊन ती कामाला लागली. या सॉफ्टवेअरला तिने नाव दिलं TTF म्हणजे Tour of Future. दर दिवशी जस वेळ भेटेल तस ती घरातील काम आटपून ती सॉफ्टवेअरच काम करायची. आता बर्‍या पैकी काम आटपल होत. जस कि पुढे काय होणार याची माहिती मिळवणे, भविष्यात जाणे इ. बाबतचे प्रोग्राम सॉफ्टवॅअरमध्ये फीड करून झाले होते. बाकी होत ते भविष्यातून पुन्हा वर्तमानात येणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्ड प्रोटेक्ट करणे. या सर्वात सुट्टी कधी संपली ते कळालच नाही.

कल्पना आज रात्री उशिरापर्यंत काम करत होती, त्यात तिला झोप कधी लागली ते कळलच नाही. रात्री अलार्म न लावल्याने सकाळी उठायला उशीर झाला. त्यामुळे पटापट तयारी करते आणि नाश्ता न करता ऑफिसला जायला निघते. गाडीची चावी घेवुन आईला हाक देते निघते म्हणून.
तिला बाय करून आई खुशी काय करतेय ते बघते, खुशी अभ्यास करतेय हे बघून आई जेवणाच्या तयारीला लागते. खुशी अभ्यास करून झाल्यावर आई जवळ जाते आणि जाऊन विचारते ...
खुशी- आई मी ताईच्या कंप्युटर वर गेम खेळू
आई - नाही, ताई काम करत असते त्या वर. परत काही झाल तर ताई ओरडेल.
खुशी - मी फक्त गेम खेळीन त्यावर. बाकी नाही काही
आई - ठिक आहे जा. पण तिच्या कामाच्या वस्तूला हात लाऊ नकोस.

खुशी कंप्युटरवर गेम चालु करते, एक लेवल संपते आणि दुसरी चालु होते, तेवढ्यात तिची नजर स्क्रीनच्या वरच्या बाजूला चक्रावर जाते. तिला वाटत तो एक गेम चा भाग आहे. त्यावर ती क्लिक करते. स्क्रिन वर येत welcome .. Tour of Future आणि त्या मागे आकाशगंगा असते. ते पाहून तिला खुप मजा वाटते. ती आई ला हाक मारते..
खुशी - आई ... हे बग काय.. लवकर ये..
आई - काय ग किती गोंधळ करतेस?
खुशी - हे बग आकाशगंगा. छान आहे ना.
आई - हो
थोड्यावेळाने स्क्रिन वर ओपशन्स येतात कि, वेळ, दिनांक, ठिकाण. खुशी ती माहिती टाकुन Next वर क्लिक करते.. आणि जणु काही सर्व थांबुन जात...

दरम्यान कामावर जायला निघालेली कल्पना पुलाजवळ पोचली असते, तेवढ्यात मागुन येणाऱ्या कार चा तिला धक्का लागतो, तिचा तोल जाऊन ती बाजुला पडते. कार वाला घाबरून पळून जातो. ती उठुन आधी त्या गाडीवाल्याला शिव्या देते. ड्रेसला लागलेली माती झाडते आणि मग स्कूटी उचलते. तिची पर्स पडलेली असते ती उचलते, वस्तु गोळा करते पण फोन काय तो भेटत नाही. कावरीबावरी होऊन आजुबाजुला बघते. पण कुठेच दिसत नाही. मग तिला आठवतं आणि ती कपाळावर हात मारते. '"बघितलस विसरलीस ना वेडीच आहे, आता परत घरी जाव लागेल", असं स्वतःशी बडबडत तीने गाडी चालु केली. पुढुन यु टर्न घेतला आणि परत घरी आली. गाडी घरासमोर लावली. दरवाजा उघडा होता. ती घरात आली.
तिने आईला आवाज दिला पण आई ने काय उत्तर मात्र दिल नाही, म्हणून तिने खुशी ला आवाज दिला. दरवाजा शेजारी मोबाईल चार्जिंगला लावला होता, दोघांना आवाज देत तिने चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला आणि पर्स मध्ये ठेवला. उशीर होत होता म्हणून 'आई मी मोबाईल घेवुन जातेय, बाय' अस बोलुन जायला निघाली. पण तेवढ्यात तिला ड्रेसला लागलेली धुळ आठवली, अशा अवस्थेत ऑफीसला कस जायच म्हणून ती वाॅशरुम मध्ये ड्रेस साफ करायला गेली. ड्रेस साफ करून येत असताना तिला स्वयंपाक घरात पण आई दिसली नाही. दरवाजा पण उघडा होता. ईतका वेळ झाला मला येऊन, यांना हाका मारून पण कोणीच काही उत्तर देत नाही, आणि दोघे दिसत पन नाहीत.
ती थोडी घाबरली. तरी तिने पुन्हा दोघांना आवाज दिला, पण कोणाचा काहीच प्रतिसाद नाही. ती त्यांना शोधु लागते. आतल्या घरात जाऊन बघते. त्या दोघी तिथेच असतात. त्यांना बघुन सुटकेचा निःश्वास टाकते. "अगं आई, किती आवाज देतेय दोघांना, तुम्ही दोघी पण उत्तर देत नाहीत. काय ग? कुठे रमलात येवढ्या? किती घाबरले होते मी माहित आहे का?
आणि काय ग खुशी किती वेळा तुला सांगितलंय माझ्या संगणकाला हात नको लाऊस म्हणुन." अस बोलत ती खुशीच्या डोक्यावर एक टपली मारते, पण..... पण टपली मारल्यावर कल्पनालाच लागत म्हणून ती ओरडते. ती घाबरत घाबरत दोघींना आवाज मारायला लागते, दोघींना हलवून बघते. पण दोघी हालत नाहीत न काही बोलत. दोघी दगडा सारख्या कडक झाल्या होत्या. नेमक काय झालंय दोघांना हेच कळत नव्हतं. सैर भैर झाली होती. काय करावं हेच तिला सुचत नव्हतं. काय करु डॉक्टरांना बोलवु की नको, कोणाला कळवू, असे अनेक प्रश्नांनी तिच्या डोक्यात काहूर माजलं होत. तिच शरीर थंड पडु लागलं, डोक काम करत नव्हतं, रडू येत होत पण रडवत ही नव्हत, काय झालं काय कराव सुचेना. ती पुन्हा आई आणि खुशीला आवाज देते पण काहीच प्रतिसाद नाही. म्हणुन शेजारी राहणाऱ्या काकुला बोलवायला जाते, त्यांचा दरवाजाही बंद. मग घरी येऊन फोन घेते आणि अँब्युलन्स बोलवते. अँब्युलन्सची वाट बघत ती त्यांच्या बाजुला बसते.

तेव्हा तिची नजर संगणकाच्या स्क्रीन वर जाते. ति ज्या सॉफ्टवेअर काम करत होती (TTF) ते रन झालेल बघते. सॉफ्टवेअर मध्ये तर खुशी ने काही गडबड तर केली नाही ना म्हणून ती चेक करते. तर खुशी ने भविष्यात जाणारा प्रोग्राम रन केलेला असतो, हे तिला दिसत. खुशीने माऊस पकडला असल्यामुळे आणि आईने तिच्या खांद्यावर हात ठेवलला असल्याने दोघीही त्या सॉफ्टवेअरशी जोडले, आणि त्यामुळे दोघेही भविष्यात गेले असल्याचे तिला कळते. सॉफ्टवेअरच काम अजुन पुर्ण झाल नव्हत आणि टेस्टिंग ही पूर्ण झाली नसल्यामुळे हे असं काही तरी होईल याची तिला काहीच कल्पना नव्हती. ती स्वतःला दोष देऊ लागते. आता पुढे काय करायचे, अँब्युलन्स जर आली आणि हॉस्पिटलला नेल तर त्यांच माऊस द्वारे झालेल कनेक्शन तुटेल आणि ते पुन्हा कधीच वर्तमानात येऊ शकणार नाहीत, याची तिला भिती वाटु लागली. म्हणून तिने तातडीने अँब्युलन्स कँसल केली.

आता त्यांना बाहेर कस काढाव याचा विचार करू लागली. डायरी शोधली, त्यामध्ये तिने सॉफ्टवेअर बद्दलची माहिती लिहिली होती. सरांना फोन करू का हा विचार मनात आला, पण ते काय करणार? या सॉफ्टवेअर बद्दल त्यांना काहीच माहिती नाही. नको, नाही करत फोन, हे बोलुन ती डायरी घेऊन संगणकाजवळ जाते आणि सॉफ्टवेअरच पुढच काम करायला घेते. त्यासाठी पुढील डाटा टाकायला सुरुवात करते. दोन नवीन प्रोग्राम सॉफ्टवेअर त्यात ऍड करते. त्यामुळे संगणकावर लोड येतो आणि संगणक हँग व्हायला लागतो. तिला त्यात अडथळा निर्माण होतो, तिची चिड चिड होते. रागाच्या भरात ती माऊस आपटते आणि डोक धरुन बसते, परत उठुन CPU हलवते व तशीच बसते. थोड्या वेळाने हँग झालेला संगणक पूर्ववत चालु लागतो.

कसल्या तरी वासामुळे ती भानावर येते, पण ती लक्ष देत नाही. वास तिव्र होतो, तो जळल्याचा वास होता हे लक्षात येताच ती बाहेरच्या खोलीत धावत येते. तिला वाटल की गॅस चालु राहीला असेल, पण तस काही नव्हत. सगळ व्यवस्थित होत. ती मागे वळते तेव्हा जाणवत की वास त्याच खोलीतुन येत होता. ती आत जाते आणि तो वायर जळल्याचा वास होता. सगळीकडे बघते पण काही जाणवत नाही. बाहेर येत असेल असा समज करून ती परत कामाला लागते. आता ती पुन्हा सॉफ्टवेअरच काम पुर्ण करायला घेते. थोड्या वेळाने सॉफ्टवेअर पुर्णपणे रेडी होत. ती एक छोटी मशिन बनवते घड्याळ स्वरुपात, भविष्यातुन परत येण्यासाठी त्याचा वापर होईल. कल्पना ते घड्याळ घालते, संगणकावर वेळ, दिनांक, ठिकाण टाकते आणि भविष्यात प्रवेश करते. प्रवेश करायच्या आधी तिने शोधल होत कि, त्या दोघी कुठल्या दिशेला गेल्या आहेत. ति त्या दिशेला जाते.

तिला एक नदीवर लाकडी जुना पुल दिसतो, आणि पलिकडे आई आणि खुशी. खुप पाऊस पडत असतो आणि नदीच पाणी वाढायला लागल असत. पावसामुळे पुलाची अवस्था दयनीय होती. पण दोघींना वाचवन तितकेच गरजेचे होत. काय कराव सुचेना, पलिकडे जाण्याचा तो एकच मार्ग होता. तिने पुलावरून जाण्याचा निर्णय घेतला. हळु हळु एक एक पावल टाकत पलिकडे पोचते. आई आणि खुशी ला सांगते की, नदीच पाणी वाढतय, आणि पाऊसाचा जोर अजुन वाढायच्या आधी निघायला हव. तस तिघी परत यायला निघतात, कल्पना खुशीचा हात धरते आणि खुशीला आईचा हात धरायला सांगते, जेणेकरून खुशी दोघींच्या मध्ये राहिल. पुलाच्या मध्यावर येतात एक क्षण असा येतो की धुक्यामुळे आणि पावसाच्या जोरामुळे तिला तिला समोरच काही दिसत नाही म्हणून थांबतात, थोड्यावेळाने धुक नाहीस होत. "आता फक्त अर्ध अंतर, मग आम्ही पोचु तिकडे.." अशी मनाची समजूत घालून पुढ हळु हळु चालायला लागतात. पण फळी मोडकळीस आलेल्या फळीवर आईचा पाय पडतो. तिच्यावर पाय पडताच आई आणि खुशी खाली पडतात, कल्पना खेचली जाते, तेवढ्यात कल्पना बाजुला असलेल्या रश्शी ला पकडते. मग कल्पना खुशीला आणि आईला वर खेचते. पाऊस कमी होतो तसे त्या तिघी हळु हळु पावल टाकत पुल पार करतात. कल्पना हातात असलेल्या घड्याळाचे बटन दाबते तसे त्या तिघी वर्तमानात पोचतात रुम मध्ये.

तिघीही थोड्या घाबरलेल्या होत्या, त्यांना इतकी धडकी भरली होती कि काय बोलाव हे सुचेना, कल्पना संगणक बंद करते, आई जेवणाच्या तयारीला लागते, खुशी बेड वर जाऊन झोपते. नेहमी प्रमाणे कल्पना सकाळी उठुन कामाला जाते, खुशीची शाळेत जाते, आई तिच्या कामात असते, असा दिनक्रम चालु होतो. काही दिवसांनी कल्पनाचा पगार होतो, ती विचार करते की जेवायला बाहेर जाऊ. म्हणून आईला फोन करून सांगते आज जेवायला जावुया. कल्पना घरी येते, आई आणि खुशी तयार असतात, निघणार तोवर रिमझिम पाऊस पडायला लगतो, आई बोलते की नको आज जायला.. या पावसाचा काही भरवसा नाही. पण खुशी जायचा हट्ट करते, आणि कल्पना पण तिला दुजोरा देते. जाऊया कि नको यावर चर्चा होते. शेवटी जायच अस ठरत.

अर्ध्या तासाच्या अंतरावर एक हॉटेल आहे. कल्पना मुद्दाम जवळच हॉटेल बघते, तिला रिस्क नसते घ्यायची नसते, म्हणुन रिक्षा थांबवते आणि तिघी त्यात बसुन हॉटेलमध्ये पोचतात. कल्पना खुशी च्या आवडीच जेवण मागवते, बाहेर पावसाने जोर लावलेला असतो. जेऊन झाल्यावर कल्पना बाहेर येते, पाठोपाठ आई आणि खुशी, आई बोलते बघितल... मी सांगितलेल ना नको म्हणून.. बघ आता, आला ना मोठा पाऊस. कल्पना बोलते तुम्ही इथेच थांबा.. मी रिक्षा बघते,रस्त्यावर एक ही रिक्षा दिसत नाही. आलाच तर ते कोणी थांबवत नव्हते, आई बोलते की चालत घरी जाऊ, तसे त्या तिघी चालत निघतात. तेवढ्यात कल्पना ला तिच्या आॅफिसमधुन फोन येतो, ति फोनवर बोलत चालत असते व खुशी आणि आई मागुन चालत आसतात. आई सामान घेण्यासाठी दुकानाजवळ थांबते, खुशी सोबत असते. कल्पनाला आवाज देते ती फोन वर बोलत पुढे चाललेली असते तिला काही ऐकु येत नाही. आई विचार करते कि घर पण जवळ आले, नको थांबवायला. पावसाचा जोर वाढत जातो. कल्पना पुल पार करून थोड पुढे जाते. जोरात आलेल्या पावसाने भांबावून जाते, मागे बघते तर आई आणि खुशी नसतात. ति आई ला फोन करते तेव्हा तिला कळत की दोघी पुलाच्या पलिकडे असतात, मनात एक विज चमकते, जे होणार ते टाळायचा प्रयत्न केला पण ज्याची भिती ते होणार आहे, तिला ते अनुभवलेल भविष्य आठवत. ती धावत धावत जाते पुलाजवळ, तिला आई आणि खुशी पलिकडे उभ्या दिसतात एका आडोश्याला. हळु हळु एक एक पावल टाकत पलिकडे पोचते. आई आणि खुशी ला सांगते की, नदीच पाणी वाढतय, आणि पाऊसाचा जोर अजुन वाढायच्या आधी निघायला हव. तस तिघी परत यायला निघतात, कल्पना खुशीचा हात धरते आणि खुशीला आईचा हात धरायला सांगते, जेणेकरून खुशी दोघींच्या मध्ये राहिल. पुलाच्या मध्यावर येतात एक क्षण असा येतो की धुक्यामुळे आणि पावसाच्या जोरामुळे तिला तिला समोरच काही दिसत नाही म्हणून थांबतात, थोड्यावेळाने धुक नाहीस होत. "आता फक्त अर्ध अंतर, मग आम्ही पोचु तिकडे.." अशी मनाची समजूत घालून पुढ हळु हळु चालायला लागतात. पण फळी मोडकळीस आलेल्या फळीवर आईचा पाय पडतो. तिच्यावर पाय पडताच आई आणि खुशी खाली पडतात, कल्पना खेचली जाते, तेवढ्यात कल्पना बाजुला असलेल्या रश्शी ला पकडते. मग कल्पना खुशीला आणि आईला वर खेचते, पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने आई खाली खेचली जाते, त्या झटक्याने कल्पना ज्या फळीवर असते ती मोडुन खाली पडते रश्शी चि पकड सुटते आणि तिघी पाण्यात वाहून जातात.

इथे कल्पना खडबडून जागी होते. "अरे देवा!... हे स्वप्न होतं", कपाळावरचा घाम पुसते. सकाळच्या 6 चा गजर वाजत असतो. तो बंद करते, बाजुला बघते आई आणि खुशी शांत झोपल्या आहेत. आणि तशीच थोडावेळ शांत पडुन राहते विचार करते की जो भविष्य संबंधी सॉफ्टवेअर बनवणार होती, तो न बनवलेला बरा.

एक म्हण आहे.. जे लिखीत आहे ते टळणार नाही" .. त्यामुळे भविष्याशी खेळ न केलेलाच बरा.,

मी पहिल्यांदा कथा लिहिली आहे .. अभिप्राय कळवा .. काही चुका असेल तर नक्की सांगा . जेणे करून मला पुढच्या लेखनासाठी त्याचा उपयोग होईल.  

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती निघते, ऑफीसला पोचते >>> अशा वाक्य रचनेमुळे वाचता आली नाही पुढे .
रसभंग करते अशी वाक्यरचना Sad

मध्येच वर्तमान काळातली वाक्य रचना नको.
बाकी कथा स्वप्नरंजन म्हणून छान आहे.
असं software लिहून भविष्यात कसं जाणार ना, त्याचं reasoning पटलं नाही

भूतकाळात लिहा... चांगले लिहताय... लवकर पुढची कथा लिहा.. हि प्रेडिक्टेबल होती स्वप्न असेल वगैरे...

कथा विवेचन मधेच भूतकाळ आणि अचानक वर्तमानकाळ असं स्विच होत राहिल्याने वाचायला ठीक नाही वाटत. संपादन करता येत असेल तर सगळी वाक्य भूतकाळात रूपांतरित करा.

आणि हो, वेळ 'भेटत' नाही, वेळ मिळतो. सजीव गोष्टी भेटतात, निर्जीव गोष्टी मिळतात.

या सॉफ्टवेअरला तिने नाव दिलं TTF म्हणजे Tour of Future. >>>> हे नाव ToF करायला हवं. मोठी चूक नाही, पण लेखन झाल्यावर आपलं आपण वाचलं की अशा छोटछोट्या चूका आपल्याला दिसुन येतात.
पुलेशु !

@ मीरा..
आणि हो, वेळ 'भेटत' नाही, वेळ मिळतो. सजीव गोष्टी भेटतात, निर्जीव गोष्टी मिळतात.>>>>
चूक नाही. महाराष्ट्राच्या काही भागांत असेच बोलतात. त्यामुळे हे अजिबात चूक नाही.

प्रभुदेसाई + 1

वेळ भेटतो मध्ये काहीही चुकीचे नाही... (पुण्याबाहेर)