आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावीच लागेल..

Submitted by विश्वजीत बा. म्हमाणे on 20 July, 2020 - 07:21

सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने चीनला भरपूर गांभीर्याने घेऊन आपल्या सीमे बरोबरच आपल्या बाजारपेठेमध्ये ही चीनला मात देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भातच पहिला पाऊल भारत सरकारने कडून 16 जुलै 2020 रोजी 59 चायनीज एप्लीकेशन वर बंदी आणण्यात आली आहे एवढेच नाही तर भारत सरकार येणाऱ्या काही दिवसांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्येही मात देण्याच्या तयारीत आहे त्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत हा स्लोगन भविष्याच्या अर्थक्रांती साठी वापरलेला आहे.
या संदर्भातच चला मग पाहुयात की चायनीज इकॉनोमी काय म्हणते आणि इंडियन इकॉनोमी काय म्हणते या विषयावर बोलताना आपण थोडसे पाठीमागे जाऊयात आणि चायना बद्दल जाणून घेऊयात.
चीनला ग्लोबल फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड(Global factory of the world)म्हणतात तर असं का म्हणतात ते जाणून घेऊयात. 1990 मध्ये चायनाची ग्लोबल आउटपुट बाय व्हॅल्यू(Global Output by Value)ज्याला जागतिक उत्पादन म्हणतो जो त्यावेळी 3% होती ती आज 25% वर गेली आहे हे सर्व खूप विचार करण्यासारखं आहे.जागतिक बाजारपेठेमध्ये 70 टक्के मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग,50 टक्के शूज मॅन्युफॅक्चरिंग,75 टक्के सोलर मॅन्युफॅक्चरिंग, 60 टक्के सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग,50 टक्के कोळसा मॅन्युफॅक्चरिंग,45 टक्के शिप म्हणजे जहाज मॅन्युफॅक्चरिंग,50 टक्के स्टील मॅन्युफॅक्चरिंग हे सर्व चीन एकटा देश करतो आपल्या देशाच्या बरोबरीने ते खूप आहे.या सर्व गोष्टींमुळे त्यांची इकॉनोमी $25.27 ट्रिलियन म्हणजे 25.27 Lakh Crore एवढी आहे.एवढेच नाही तर तो जगामध्ये 50 टक्के सफरचंद उत्पादन करून निर्यात करतो आणि त्या पाठोपाठ अमेरिका 6 टक्के करतो.50 आणि 6 टक्के यामधील फरक तुम्हीच पहा आणि विशेष म्हणजे अमेरिकेचा 90 टक्के झेंडा चायना मॅन्युफॅक्चरिंग करतो.जगातील 50 टक्के लक्झरी आईटम म्हणजे पर्स,बेल्ट व इतर गोष्टी हे मेड इन चायना असतात.याच चायना देशाची गणना 1978 च्या अगोदर एक गरीब देशांमध्ये केली जायची आणि त्यावेळेची जीडीपी हे फक्त $156 USD एवढीच होती जी आज 13.61 लाख USD एवढी आहे.प्रत्येक वर्षी चायनाची GDP दहा टक्क्यांनी वाढत आहे. आत्तापर्यंत चीन देशाने त्यांच्या 80 करोड लोकांना गरिबीतून वरती आणला आहे.या सर्व गोष्टी कशामुळे घडले आहे आपण जाणून घेऊयात.

1.चायनीज लोक मास प्रोडक्शन(Mass Production) हे भरपूर प्रमाणात करतात म्हणजे कुठलीही लहान वस्तू बनवताना त्याचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतात त्यामुळे त्याची किंमत ही खूप कमी असते उदाहरण.पेन,पेन्सिल, लहान मुलांचे खेळण्या, स्वयंपाक घरातील भांडी अशा अनेक गोष्टी यांचा बाजारपेठेतील भाव बघून एकदम चीप रेटमध्ये ते लोक विकतात हे सर्व शक्य होतं ते मास प्रोडक्शन मुळे आणि आपण इकॉनॉमिक्स या विषयामध्ये शिकलोच आहे की जेवढे जास्त प्रोडक्शन तेवढी प्रॉडक्टची कॉस्ट कमी.

2. कॉम्पिटेटिव्ह प्राईसिंग विथ रिव्हर्स मॅन्युफॅक्चरिंग (Competitive pricing with reverse manufacturing) म्हणजेच हे लोक जगातील वेगवेगळ्या गोष्टींचे इनोवेशन बघून नंतर त्याच गोष्टींचा अभ्यास करून हुबेहूब तीच गोष्ट कमी किंमतीत आणि लोकांना परवडण्यासारखे वस्तू बाजारात आणतात आणि या सर्व गोष्टींमध्ये त्यांची आर अँड डी आणि इनोवेशन कॉस्ट वाचतो उदाहरण.2006 मध्ये LG कंपनीने पहिला टच स्क्रीन कॅपॅसिटीव मोबाईल मार्केटमध्ये आणला त्यानंतर बरेच मोबाईल कंपनीने भरपूर एक्सटेन्शन आणि सॉफ्टवेअर अपडेशन मोबाईल मध्ये केला या सर्व गोष्टींचा अभ्यास करून चायना ने नंबर ऑफ वेरिएशन चे नवनवीन मोबाईल मार्केटमध्ये आणले तोही खूप कमी किंमतीत आणि विशेष म्हणजे काही काळानंतर ज्या LG कंपनीने फर्स्ट स्क्रीन टच मोबाईल मार्केटमध्ये आणला आज त्याच कंपनीचे एकही स्मार्टफोन 2% च्या वरती सेल होत नाहीत आणि चायना मात्र पूर्ण जगभरात 50 टक्के पेक्षा जास्त मोबाईल निर्यात करतो भारतामध्ये तर जणू काय मोबाईल कंपनीचा विळखाच बसवलेला आहे ओप्पो, विवो, एम आय, रियल मी हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे.

3.प्रॉडक्टिव लेबर(Productive labour) बऱ्याच लोकांकडून असं ऐकायला मिळतं की चायनाचे लेबर खूप कमी किमतीत काम करतात जे अगदी खोटं आहे. उलट चायना चे लेबर योग्य त्या किंमतीतच काम करतात कारण ते प्रॉडक्टिव असतात जर भारतात एक लेबर आठ तासात 10 स्मार्टफोन तयार करत असेल तर चायना चा एक लेबर आठ तासांमध्ये 50 स्मार्टफोन तयार करतो ह्यालाच म्हणतात प्रॉडक्टिव लेबर. विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यांना कंपनी मध्ये आंदोलन करायची वेळ येते आणि समजा ती कंपनी शूज मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर त्या कंपनीतील लेबर त्या दिवशी फक्त शंभर शूज तयार करतात ते पण फक्त डाव्या पायातले अशी पद्धत त्यांच्याकडे असते आंदोलन करतात पण प्रॉडक्टिव राहतात. अशा सर्व गोष्टी शक्य होतात ते म्हणजे फक्त स्किल डेव्हलपमेंट मुळे जे त्यांच्याकडे शाळेपासूनच शिकवलं जातं.

4.एक्सपिरीयन्स अंड एक्सपेर्टीस(Experience & expertise)आज जगामध्ये कोणत्याही देशाला कोणतीही गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचा असेल तर पहिला प्राधान्य दिला जातो ते चीनला याचं कारणही तसंच आहे ते लोक नेहमी येणाऱ्या लोकांना प्राधान्य देतात आणि त्यांची प्रत्येक गोष्ट वेळेच्या आत त्यांना मॅन्युफॅक्चरिंग करून देतात तेही अगदी कमी कॉस्ट मध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या सरकारची पॉलिसी खूप ट्रान्सपरन्सी आहे.समजा एखादी गोष्ट त्यांना येतही नसेल तरीही ते लोक अभ्यास करून ती गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करतात अगदी जशी रिक्वायरमेंट आहे तशी याच गोष्टींचा फायदा नेहमीच चीनला होतो.

आता भारतीय अर्थव्यवस्था काय म्हणते ते बघुयात 1990 मध्ये भारताची जीडीपी व्हॅल्यू हे 32097 Crore एवढी होती ती 2018 मध्ये 2.72 Lakh Crore इतकी झाली आहे जे सरासरी ठीक आहे. भारताची निर्यात व्हॅल्यू 2019 च्या शेवटी 330 मिलियन एवढी होती तर चीनची निर्यात व्हॅल्यू 2019 च्या शेवटी 2.5 ट्रीलियन एवढी होती. आज आपल्या देशाची निर्यात व्हॅल्यू आणि मॅन्युफॅक्चरिंग स्थिती पाहता आपल्याला खूप काम कराव लागणार आहे आणि पंतप्रधानानी जनतेला दिलेली हाक म्हणजे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया व स्किल इंडिया या सर्व बाबींना सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज देशाच्या युवा पिढीला आहे आणि त्याचबरोबर आपल्या सरकारला चांगली इंडस्ट्रियल पॉलिसी आणण्याची गरज आहे आणि ते काही प्रमाणात आलेही आहेत. आपल्या देशाची इकॉनोमी कसा वाढवता येईल ते पाहूयात.

1.भारत सरकारला आपली कमर्शिअल रुल्स आणि इंडस्ट्रीज पॉलिसी सोपे करावे लागतील.जसं प्रधानमंत्री यांनी म्हटल्याप्रमाणे काही प्रमाणात सोपे झाले आहे. जेणेकरून नवी मॅन्युफॅक्चरिंग तयार करण्याची इच्छा असणाऱ्या बिझनेस मॅन किंवा युवा पिढीसाठी एक फार मोठी संधी असेल.

2.आपल्या देशातील प्रत्येक राज्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब आणि एग्रीकल्चर हब उभा करावा लागेल.जसे की अमेरिकेत डेट्रॉईट सिटी म्हणजे मोटार हब, न्यूयॉर्क म्हणजे फायनान्स हब, सिलिकॉन व्हॅली म्हणजे टेक्नॉलॉजी हब म्हणून प्रसिद्ध आहेत तसं आपल्यालाही हब निर्माण करावे लागेल आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रीकल्चर सेक्टरच्या इम्प्रोव्हमेन्ट साठी पाहिजे तेवढी मदत राज्य सरकारने केले पाहिजे. भारत हा अगोदरपासूनच कृषिप्रधान देश आहे त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यामध्ये कृषी हब उभा करून युवा पिढीला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.

3.भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये काही विषय ऍड करण्याची गरज आहे जसं की अपडेटड टेक्नॉलॉजी बद्दल त्यांना सूचित करणे, बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस कसा केला जातो हे त्यांना शिकवण, ग्लोबल लर्निंग प्रॅक्टिसेस कसा केला पाहिजे हे त्यांना शिकवण,स्किल डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस याबद्दल त्यांना माहिती देणे या सर्व गोष्टी त्यांना अभ्यासक्रमात बंधनकारक केले पाहिजेत. त्याचबरोबर पालकांनीही मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मागे पडता कामा नये.

4."Boycott Made in china"हा स्लोगन काही दिवसांपूर्वी भारतातील युवापिढीने खूप मोठ्या प्रमाणात ट्विटर,फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत या गोष्टींचे स्वागत आपण केलंच पाहिजेत.याची सुरुवात आपण आपल्यापासूनच केलं पाहिजे.पुढच्या वेळेस कोणतीही गोष्ट विकत घेत असताना तो स्वदेशीच आहे याची काळजी घेणे गरजेचे आहे. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना ती स्वदेशी घ्या. प्रत्येक विदेशी एप्लीकेशन ला प्रत्येक गोष्टींना पर्याय आहेतच तो शोधा आणि स्वीकार करा. या सर्व गोष्टींमुळे एक दिवस नक्कीच बदल घडून येईल. या गोष्टींचा विचार करून चालणार नाही कि हे कसं शक्य आहे?? अरे आपली इकॉनॉमी सुधारण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठावा लागेल!! पण थोडासा विचार करा चीन देशाने ही आत्मनिर्भर होण्याची सुरुवात 1990 पासून केली होती आज ते कुठे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे.त्याच निर्धाराने आपणही आजपासून फक्त Vocal for Local स्वदेशी वस्तू यांना प्राधान्य देऊयात मग बघा एक दिवस आपण नक्कीच आत्मनिर्भर भारत होणारच.

आत्मनिर्भर भारतासाठी आपण काय केले पाहिजेत..
1.स्वदेशी एप्लीकेशन ला प्राधान्य द्या.

2.स्वदेशी वस्तू वापरा आणि त्याची ऍडवरटाइजमेंट सोशल मीडियाद्वारे करा.चीन देशाचे लोक याच गोष्टी करतात.

3.आपल्या मुलांना स्वदेशी वस्तूंचा महत्त्व समजून सांगा जेणेकरून भविष्यात स्वदेशी वस्तूंबद्दल असलेली चिंताच मिटून जाईल.

4.युवा पिढीला स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया या संकल्पनेच महत्त्व सांगून त्यांना नेहमी प्रोत्साहन द्या.

5. Vocal for Local हे स्लोगन नेहमीच लक्षात राहू द्या.

या सर्व गोष्टींमुळे एक दिवस घडेल “आत्मनिर्भर भारत” आणि याची सुरुवात आजपासूनच केली पाहिजे.

जय हिंद जय भारत

- विश्वजीत बाबुराव म्हमाणे
Vishwajeetmhamane@yahoo.com

Group content visibility: 
Use group defaults