औषध मदिरा

Submitted by निशिकांत on 19 July, 2020 - 23:24

औषध मदिरा

ओघळणारे अश्रू पुसण्या औषध मदिरा
हरलेल्यांना दु:ख विसरण्या औषध मदिरा

तारेवरची कसरत आहे जीवन जगणे
थरथरणारे पाय घसरण्या औषध मदिरा

दुसरे विजयी झाले याची तगमग मजला
ठसठसणारे शल्य विसरण्या औषध मदिरा

सन्मार्गाला सोडुन जाती मोहामागे
चिखला मध्ये पुरते फसण्या औषध मदिरा

मजला सल्ले लाख मिळाले गोंधळलो मी
काय करावे पुढती कळण्या औषध मदिरा

साध्य न झाले धेय्य मला मी तुटलो, थकलो
मृगजळ पुढती मागे पळण्या औषध मदिरा

तारुण्याच्या आठवणीने बेचैनी का?
खिन्न मनाला आज रिझवण्या औषध मदिरा

ह्र्दयावरती नाव कशाला लिहिले न कळे
भळभळणारया जखमा सुकण्या औषध मदिरा

गळणार्‍या अश्रूंचे आता एकच कण्हणे
पाश्चातापी धगधग जळण्या औषध मदिरा

सुटका माझी लवकर व्हावी देवा आता
मृत्त्यूसंगे हात मिळवण्या औषध मदिरा

शुन्य कमवले "निशिकांताने" जगता जगता
नादारीचे खाते लिहिण्या औषध मदिरा

निशिकान्त देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users