पंडितजी गायले .......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'ती' बातमी वाचल्यापासून गेल्या दोन दिवसांत मनात जे जे काही आलं ते शब्दांत सांगणं म्हणजे अक्षरश: गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसा प्रयत्न करायचा म्हणजे मला आधी वाल्मीकी किंवा गदिमांच्या प्रतिभेची उसनवारी करावी लागेल. ती बातमी म्हणजे ... 'पंडितजी गायले'.
ध्यानीमनी नसताना indiatimes च्या मुखपृष्ठावर बातमी वाचली. क्षणभर खरं वाटलं नाही. दुसर्या क्षणी सकाळची साईट उघडली. पहिलीच बातमी. पुढचे काही क्षण कदाचित श्वास घ्यायला विसरलो होतो. अगदी अधाशी किंवा जन्मोजन्मीचा उपाशी असल्यासारखी ती बातमी वाचली. शब्द वाचताना गडबड होत होती. आधी शब्द की आधी आशय ....? शब्द तरी कुठे एका जागी स्थिर होते? हेलकावतच होते ....
'व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा' पाहून तर फक्त हर्षवायूच व्हायचा बाकी होता. पण हाय ... दुर्दैव माझं. घरच्या तथाकथित highspeed wireless internet connection ला ते झेपलं नाही. जवळपास तासभर पुन्हापुन्हा प्रयत्न केले ... निदान एक झलक ... पहायला नाही तर निदान ऐकायला तरी ...... पण नाहीच. रात्रीची थंडी किंचित कमी असती तर रात्रीच ऒफिस मध्ये जाऊन त्या clips पाहिल्या - ऐकल्या असत्या. दुसर्या दिवशी सकाळी ऒफिसमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा www.esakal.com उघडला आणि त्या स्वरभास्कराचा आवाज ऐकला. इतकं काही मनात दाटून आलं .... नशीब त्या वेळी school मध्ये फारसे लोक नव्हते. एखाद्यानी येता जाता ऒफिसमध्ये डोकावून पाहिलं असतं आणि 'काय झालं' असा प्रश्न केला असता तर काय उत्तर देणार होतो मी? काय सांगितलं असतं? नव्हे ... काही सांगता आलं असतं का?

खरंतर मला शास्त्रीय संगीतातलं ओ की ठो कळत नाही. तानसेन काय कानसेनही नाहिये मी. दूरदर्शनवरच्या त्या 'बजे सरगम गूंज बनके देस राग' गाण्यामुळे 'देस' राग कधितरी ओळखता येतो ... आणि कधीतरी चुकून 'भैरवी'चा साक्षात्कार होतो. पण ऐकायचा शौक मात्र आहे. पुण्यनगरीतल्या काही वर्षांच्या वास्तव्यात हा शौक उत्तरोत्तर वाढत गेला. अर्थातच 'सवाई' हा गणपती-दसरा-दिवाळी प्रमाणेच वार्षिक सण बनून गेला होता. आणि सवाईच्या तमाम चाहत्यांप्रमाणेच पं. भीमसेन जोशी हे माझंही कधी दैवत बनलं हे कळलंच नाही. जाणकारां पासून संगीताच्या क्षेत्रात 'औरंगजेब' असणार्या माणसापर्यंत सगळेच लोक मान्य करतील की 'सवाई' मध्ये भीमसेनना ऐकणं हा एक अद्वितीय सोहळा असतो. मी पुण्यात इतरत्रही त्यांचे कार्यक्रम ऐकले आहेत पण 'सवाई' मधलं त्यांचं गाणं आगळंच! त्यात काय वेगळं असतं मला सांगता येणार नाही पण वेगळं असतं हे खरं.

विषय: 
प्रकार: 

लिहिलेला शब्द अन शब्द पटला.. पंडितजींना 'सवाई' मध्ये एकणे हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो.. माझ्या सुदैवाने आठ वर्षे तो अनुभव मला पुन्हा पुन्हा घेता आला.. पण यंदा मात्र नाही जमले अन त्याची हुरहुर ही कायमच जाणवत राहिल.. Sad

'सवाईच्या' असंख्य आठवणी आहेत.. बघू जमेल तसे लिहायचा प्रयत्न करेन..

खरंच खरंच,
मला मात्र नेट स्पीड कमि असल्यामुळे अजूनही नीट ऐकायला मिळालेलं नाहिये Sad

खरंच,मलादेखिल ऐकताना डोळ्यांत नकळत पाणी आलं रे!!कलाकारांना वयाचं बन्धन नको होतं देवानी ठेवायला.अजून भरपूर वर्ष गाउ दे ह्यांनी आपल्या आयुष्यातली काहि वर्ष घेऊन ,असं वाटलं.थकलेत पण आता खूपः-(

पराग! मध्ये पंडितजींचा त्यावेळचा एक फोटो वर्तमानपत्रात आला होता. त्यांची प्रकृती एवढी नाजूक होती की (मला शास्त्रीय संगीतातलं कळतं असं नाही, तर एक चाहता म्हणून) तो फोटो बघून मनात ज्या भावना आल्या त्या शब्दांत सांगता येत नाहीत. खरं म्हणजे असा विचार करायलाही मनाला त्रास होतो, पण त्यानंतर पंडितजी गातील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर साधारण एप्रिल मध्ये त्यांनी गायलेल्या एका प्रोग्राममधल्या देसकाराची क्लिप पाहण्यात आली. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. या वयात अशा अवस्थेत ते त्याच आवेशात गात होते, ते पाहताना बघणार्‍याच्या काळजाचा ठोका चुकावा. आणि आता परत 'सवाई' मध्ये ते गायले हे ऐकून तर मी नि:शब्दच झालो. खरंच वृषाली म्हणते तसं वयाचं बंधन नको होतं कलाकारांना..

पंडितजी गायचे तेव्हा भान विसरून फक्त आणि फक्त ऐ़कणेच व्हायचे. एका विशिष्ट ट्रान्समधे घेऊन जायचे पंडितजी. ते हयातीत होते तेव्हा सवाईमधे त्यांना ऐकताना स्वर्गातलं गाणं ऐकल्यासारखं वाटायचं. आता तर तिथे स्वर्गातलेही असेच सुखावले असतील ना?