LET’S DECODE DEPRESSION AND SUICIDE VIA SUSHANT SINGH RAJPUT

Submitted by टेमकरांचाअक्षय on 16 July, 2020 - 07:00

LET’S DECODE DEPRESSION AND SUICIDE VIA SUSHANT SINGH RAJPUT

नमस्कार मी अक्षय टेमकर . बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली आणि एकच गदारोळ माजला.आज जगभरात प्रत्येक ४० सेकंदांना १ आत्महत्या होते. world health organisation च्या मते आजमितीला २६ करोड लोकं depression मध्ये आहेत.

depresison आणि आत्महत्या हे दोन्ही elements एकमेकांना directly proportional कसे आहेत हे आपण बघणार आहोत.
आत्ता आपण 4 महत्वाच्या points वर बोलणार आहोत .

point number 1- जगभर इतक्या आत्महत्या होतात मग सुशांत सिंग राजपुतचंच प्रकरण का गाजतंय. त्याचा current भारतीय समाजजीवनाशी असलेला थेट संबंध आणि त्याचे भारतीयांवरचे दूरगामी परिणाम . नागराज मंजुळेंचं एक वाक्य आहे - भारतीय प्रेक्षक स्वतःच्या आयुष्याला जितकं seriously घेत नाहीत तितकं सिनेमांना घेतात .त्यांच्या या वाक्याचा सुशांतच्या आत्म्हत्येसोबत असलेला थेट संबंध

point number 2- depression
point number 3 - आत्महत्या .

या दोनही terms चं खूप deep आणि मुद्देसुत विश्लेषण आपण करणार आहोत.

point number 4- 6 life hacking methods आत्महत्या आणि depression या भावनेतून कसं बाहेर पडलं पाहिजे , infact मी स्वतः depression मधून कसा बाहेर आलो.

या साऱ्याचा उहापोह आत्ता आपण करणार आहोत आणि त्याचा धांडोळा मी तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रामाणीक प्रयत्न करणार आहे. आणि हो यातून मला खूप मोठा संदेश वगैरे द्यायचाय असं काही नाहीये..... हा १०-१५ मिनिटांचा blog शेवटपर्यंत नक्की वाचा . i promise तुमचा वेळ वाया जाणार नाही. i repeat तुमचा वेळ वाया जाणार नाही.

may be यातले काही points माहिती असतील तर काही माहिती नसतील .

किंवा सगळेच points नव्याने redefine होतील.

before moving towards these 4 पॉईंट्स .......

आज प्रत्येक जण म्हणू लागलाय की depression आणि आत्महत्या यावर openly चर्चा करायला हवी.अर्थात याचा अर्थ असा नाही की तुम्ही depression मध्ये आहात त्याचे videos काढून सोशल मीडियावर post करून जगभर सांगत सुटा.
“ व्यक्त व्हा ..व्यक्त व्हा ...जवळच्या लोकांकडे मन हलकं करा हा ट्रेंड सुरु झालाय “ ट्रेंडच्या माध्यमाखाली का होईना आज प्रत्येक जण व्यक्त होऊ पाहतंय ही खरंच पॉजीटीव्ह गोष्ट आहे.

POINT NUMBER 1 :

जगभर इतक्या आत्महत्या होतात मग सुशांत सिंग राजपूतचंच प्रकरण का गाजतंय ? त्याचा एवढा बवाल का ?

इथे २ मुद्दे आहेत - १) आत्महत्या कोणी केलीये २) कोणत्या zone मध्ये केलीये ..... म्हणजे surrounding conditions काय आहेत ?

मुद्दा पहिला :-

भारतीय लोकं ४ गोष्टींना स्वतःच्या आयुष्याएवढीच किंमत देतात

1- जात - धर्म
2- सिनेमे
3 - क्रिकेट
4 - लोकं काय म्हणतील ?

या 4 points पैकी सुशांत सिंग राजपूत number 2 म्हणजे सिनेमा या प्रकारात आहे. जसं मी वर म्हणालो - नागराज मंजुळेंचं एक वाक्य आहे -

“ भारतीय प्रेक्षक स्वतःच्या आयुष्याला जितकं seriously घेत नाहीत तितकं सिनेमांना घेतात “

त्यातल्या नट - नट्यांच्या आयुष्याला घेतात. लोकं त्यांना जबरदस्त follow करतात. सलमान खान ने एक शर्ट घातला तर तसाच शर्ट हजारो-लाखो लोकं विकत घेतात. अमीर खान ने एक साधी पाण्याची बॉटल जरी उचलली तरी तो brand बनून जातो.

प्रथम सुशांत सिंग राजपूत हा खूप खूप promising अभिनेता होता. खूप intellectual होता. महत्वाचं म्हणजे प्रचंड वाचन करणार अभिनेता होता. even त्याच्या personality चं गारुड माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताही गॉडफादर नसल्यानं खूप ground level पासून त्यानं करियरची सुरुवात केली होती.

television to screen हा स्ट्रगल काय असतो हे फक्त फिल्म इंडस्ट्रीमधली लोकंच सांगू शकतात.

जसं मी बोललो की सिनेमा सेलिब्रिटीस ना लोकं blindly follow करतात. सुशांतचा खूप मोठा चाहता वर्ग होता

संकटं आलं की त्याचं final solution आत्महत्या हेच आहे असा एक चुकीचा मेसेज लोकांमध्ये पोहचला. लोकांची thinking त्या अनुशंगानं विचार करेल.

लोकं हाच विचार करतील की आपण ज्याला follow करायचो त्यानेच असं केलं . सगळे बोलतात त्याला काय कमी होतं .......तर महत्वाचं म्हणजे सुख - दुःख जगभरातल्या प्रत्येक माणसाला असतातच ..... फरक फक्त एवढाच की त्या सुख दुःखाची तीव्रता कमी अधिक प्रमाणात असते.

मुद्दा दुसरा :-

सुशांतने ज्या situation मध्ये आत्महत्या केलेली आहे . जगभर कोरोनाचे संकट आहे. कित्येकांचे जॉब गेलेले आहेत , अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत, करोडो लोकांचं भविष्य अंधारात आहे . लोकं already depression मध्ये आहेत. अशा.....अशा......अशा..... condition मध्ये लोकांना positive राहणं खूप गरजेचं आहे . त्यांना फक्त आणि फक्त सकारत्मक news ऐकायची आहे. या condition मध्ये सुशांतनं आत्महत्या केलेली आहे, त्याचा थेट परिणाम भारतीय समाजजीवनामध्ये उमटतोय. जर कोरोना नसता तर सुशांत सिंगच्या news ची तीव्रता कमी असती. असं मला personally वाटतंय.

आता भारतीय समाजजीवनावर २ प्रकारचे परिणाम होऊ शकतात

पहिलं- काही लोकं सुशांतच्या पावलांवर पाऊल ठेवतील......मला माहितीये सगळेच आत्महत्या करत सुटतील असं नाहीये .पण मूठभर लोकं तरी असं करू शकतात . तर दुसऱ्या बाजूला काही लोकं हा डिसिजन घेतील की त्याने जसं केलं तसं आपण करायचं नाही. आपण आपल्या समस्यांवर तोडगा काढायचा. ज्या depressive situation मधून आपण जात आहोत ती situation आपल्या आप्तजनांसोबत share करून दुःख हलकं करायचं , मोकळं व्हायचं . अशी लोकं सुशांतच्या matter ला positively बघतील .

मुळात सर्वांत महत्वाचं म्हणजे लोकं विचार करतील . either positive or negative . शक्यतो पॉसिटीव्हलीच करतील असं आपण ग्राह्य धरुयात. अशी इच्छा आपण व्यक्त करूयात.

सुशांत फक्त निमित्त आहे. भारतीय फिल्म industry असे अनेक सुशांत सिंग राजपूत आहेत......त्यांच्यासोबत आता मोठ मोठे production houses जसे धर्मा , यशराज फिल्म्स ,नाडियादवाला grandson films , जिओ studios , ....सध्याचं सर्वांत महत्वाचं production house -maddock films असे अनेक production houses फिल्म industry मधल्या अशा अनेक सुशांत सिंग राजपुतांना कसं treat करणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

बॉलिवूड ढवळून निघालंय .

अशा वेळी एक term खूप वेळा वाचायला ,ऐकायला मिळाली.-ती म्हणजे nepotism- त्याचा मराठीत अर्थ होतो नातलगत्व. म्हणजे राजाचा मुलगाच राजा बनणार किंवा नेत्याचा मुलगा मुलगीच नेता बनणार .तसं bollywood मध्ये हिरोचा मुलगाच hero बनणार. सुशांत हा outsider होता.त्याच्याकडे मोठ मोठे producers ज्या प्रकारे starkids कडे लक्ष देतात त्या प्रकारे सुशांत सिंगकडे लक्ष दिला नसल्याचा आरोप लोकं करू लागलेत. starkids च्या movies वर ban टाकायची भाषा जनसामान्यांमधून उफाळून आलीये.लोकांमध्ये starkids बद्दल द्वेष पसरलाय. त्याचे परिणाम येत्या काही वर्षांत bollywood मध्ये नजीकच्या काळात दिसण्याचे chances नाकारता येत नाहीत आणि या साऱ्याचा परिणाम म्हणून मोठ मोठे producers outsiders चा गांभीर्यानं विचार करतील.

resolution अर्थात परिवर्तन काही अंशी का होईन घडताना दिसून येईल . मी असं म्हणणार नाही की खूप मोठी क्रांती वगैरे येईल . honestly सांगतो या साऱ्या points चा लोकं आणि फिल्म इंडस्ट्री वेगवेगळ्या angles ने विचार करतीलच. त्याचे परिणाम नक्की आपल्याला जाणवतीलच.

सुशांत हा science freak होता. त्याला अंतराळाच्या विशेष आवडत होती.even त्याच्या घरात खूप मोठा telescope होता. त्यानं NASA ला visit दिली होती. हे सगळं तुम्ही फोटोजमध्ये बघितलंच असेल.

" YOUTUBE BBC मराठीवर सुशांत सिंग राजपूतच्या ५० स्वप्नांची डायरी " हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याची मोजकी स्वप्न स्वप्न अशी होती की - मुलांना अंतराळाबाबत उत्सुकता निर्माण करणं , समुद्रातल्या bluehole मध्ये डुबकी घेणं ,विमान चालवणं , चॅम्पियन्ससोबत टेनिस आणि क्रिकेट मॅचेस खेळणं , १००० झाडं लावणं, त्याच्या engineering कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये पुन्हा जाऊन राहणं , गरिबांसाठी मोफत शिक्षण देणं ,अंटार्टिका फिरायला जाणं , एका सक्रिय ज्वामुखीला कॅमेरात कैद करणं . त्याला एका चॅम्पियन खेळाडूविरुद्ध बुद्धिबळ खेळायचं होतं. , visible sound आणि vibration चा अभ्यास करायचा होता. रेल्वेत बसून संपूर्ण युरोपचं पर्यटन करणं........त्याची अशी जवळजवळ ५० amazing स्वप्न होती.

त्याच्या स्वप्नांवरूनच हे जाणवेल की कोणत्या level चा हा माणूस होता.

POINT NUMBER 2
DEPRESSION

सर्वांत आधी हे समजून घेऊयात की depression चा specific असा कालावधी नसतो.

मुळात कोणी हे सांगू शकत नाही की मी २ महिने depression मध्ये होतो किंवा सकाळी ९ वाजल्यापासून माझं depression सुरु झालं आणि रात्री ८ वाजता जेवणाआधी संपलं. तर depression ही एक phase आहे ज्याचा specific असा कालावधी नसतो. आणि जगातला प्रत्येक माणूस या phase मधून जातोच. even अंबानीसुद्धा या phase मधून कधीना कधी जात असेलच. असा अंबानी जो देवासमोर उभं राहिल्यावर विचारतो - " देवा काही लागलं तर मला सांग "

so तुमच्यासोबत काही जगावेगळं घडत नाहीये हे ध्यानात घ्या .

depression ची १० महत्वाची कारणं -

९० टक्के लोकांच्या depression ची हीच कारणं असतात.

१) भूतकाळात केलेल्या चुकांचा भविष्यावर होणारा गंभीर परिणाम . त्या regret मानसिकतेत जगणं . यामुळे माणूस depressed होतो.

२) अनपेक्षित आलेला नकार .

३) अपमान

४) खूप वेळ - पैसा लावूनही काम न होणं. अथवा अखं आयुष्य ज्यासाठी पणाला लावलं होतं ती गोष्ट साध्य न होणं.

५) नेमक्या गरजेच्या वेळीच जवळच्या व्यक्तींची साथ सुटणं.

६) अत्यंत जवळची व्यक्ती आयुष्यातून निघून जाणं किंवा मृत्यू पावणं.

७) आयुष्यातल्या सर्वांत महत्वाच्या गोष्टी = लग्न आणि घर न होणं अथवा होऊन फिसकटनं .

८) शिक्षण आणि नोकरी यामध्ये अपेक्षित यश न मिळणं अथवा total failure होणं.

९) Obsessive Compulsive Disorder - OCD . म्हणजे एखाद्या गोष्टीची इतकी सवय लागणं की ती गोष्ट न केल्यास जीव घाबरा होऊन जातो.

(OCD याबद्दल youtube वर बरेच videos हिंदी- मराठीमध्ये आहेत.)

१०) जवळच्या व्यक्तींनी केलेला दगाफटका - फसवणूक .

depression चे 10 symptoms :-

१) चेहऱ्यावरचा glow म्हणजे तेज पूर्णतः निघून जाणं आणि डोळ्यांखाली काळे घेर येणं .

२) जगणं असह्य होऊन आत्महत्येचे विचार मनात येणं.

३) घरातून पळवून जाऊन दूर कुठेतरी निघून जावंसं वाटणं .

४) जो जगण्याचा goal set केलाय त्यापासून फारकत घेणं अथवा तो goal च रद्द करणं.

५) व्यसनाधीन होणं .

६) आधी प्रचंड बोलकी असणारी व्यक्ती अचानक शांत होणं.

७) रात्रभर जागं राहणं .

८) illogical गोष्टी करणं .

९) चार चौघांत असे प्रश्न उपस्थित करणं ज्याचा वास्तवासाशी अथवा चाललेल्या चर्चेशी संबंध नसणं

१०) अंगातून उत्साहच निघून जाणं .

depression ही एक मानसिक भावना आहे जी कोणीच चेहऱ्यावरून judge नाही करू शकत किंवा फक्त आणि फक्त उदास दिसणारी व्यक्तीच depression मध्ये असू शकते वगैरे असं काही नसतं ..... तर बाहेरून प्रचंड खुश =दिसणारी व्यक्तीसुद्धा मनाने कोमेजून गेलेली असू शकते. .

POINT NUMBER 3

आत्महत्या - the term shows its own definition - आत्म-हत्या.....म्हणजे स्वतःची हत्या. स्वतःला physically damage करून मृत्यू ओढवून घेणे .

सर्वांत महत्वाचा point आहे हा ....

एक सर्वे असा आहे की एखाद्या problem चं permanent solution न मिळाल्यानंच बहुतांशी लोकं आत्महत्या करतात.परंतु त्यांना हे माहिती नसतं की problem तर temporary आहे. helpless असल्याची भावना त्यांच्या मनात खूप दृढपणे भिनते. त्यामुळे लोकं आत्महत्या करण्याचा अडकाफडकी निर्णय घेतात.

सर्वांत आधी आपण हे बघुयात की मुळात लोकं आत्महत्या का करतात ? अर्थात depression मध्ये गेलेली व्यक्तीच आत्महत्या करते. पण त्याचे ४ elements आहेत.

१) पहिला मुद्दा - आयुष्याला proper AIM / TARGET नसणं . किंवा कालांतराने ते नष्ट होणं. मुळात आपण कशासाठी जगतोय हेच माहिती नसेल किंवा आपल्या कष्टाचे भविष्यात फळ मिळणार नाही असे वाटले तर लोकं depression मध्ये जातात आणि आत्महत्येचं पाऊल उचलतात.

English मध्ये एक quote आहे - if you don 't have dreams then you are wasting your life .

तुम्हाला आयुष्यात स्वप्न / काय करायचंय हे माहितीच नसेल तर तुमचं आयुष्य कदाचित boring असू शकतं.

२) दुसरा मुद्दा - अर्थपूर्ण नातेसंबंध .....यामध्ये बहुदा internal फॅमिली problems हे कारण असतं. किंवा फिस्कटलेले नातेसंबंध , जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा ती व्यक्ती सोडून निघून जाणं , घटस्फोट होणं , teenagers चे love affairs / love matters ही कारणं असतात.

३) तिसरा मुद्दा - असा एक सर्वे आहे. आपली value prove करण्यासाठीसुद्धा किंवा आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी माणसं आत्महत्या करतात.

असं म्हणतात मेल्यानंतरच सगळेजण माणसाची value करतात. जे की मोठ्या प्रमाणात खरं देखील आहे. आपण ते deny करू शकत नाही.

४) financial problems .

POINT NUMBER 4 :

आत्महत्या आणि depression या भावनेतून कसं बाहेर पडलं पाहिजे infact मी स्वतः यातून कसा बाहेर आलो.

तुम्ही नैराश्यावस्थेमध्ये आहात हे तुमच्या मनात दाबून ठेवता ……व्यक्त होत नाहीत .त्यातून प्रचंड घुसमट होते आणि मग त्याचं रूपांतर depression आणि थेट आत्महत्येमध्ये होतं. जे की आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक माणसासोबत होतंच . हे १०० नाही तर हजार टक्के खरं आहे.

एक लक्षात ठेवा ......प्रत्येक problem चं solution आहे...प्रत्येक टाळ्याला चावी असतेच की .

मी असं म्हणणार नाही की रात्रीमागून दिवस उजाडतो वगैरे वगैरे poetic अजिबात बोलणार नाही ...... पण एक clearly सांगतो दुःखा नंतर सुख येतंच येतं. हे जागतिक शाश्वत सत्य आहे. नाण्याला छापा काटा- असतो तसं आयुष्याला सुख- दुःख आहेच.

बहुतांश लोकं depressed यामुळेसुद्धा असतात की “ मला कोणीच समजून घेत नाही...... “ याचा अर्थ हे तर clear आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. आपलं सुख - दुःख share करणारी व्यक्ती आयुष्यात पाहिजेच. असं म्हणतात की सुख वाटून घेतल्यानं वाढतं आणि दुःख वाटून घेतल्यानं ते कमी होतं.

यासाठी अशी एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असावी की ज्या व्यक्तीसोबत आपण आपलं मन हलकं करू शकतो ...... सुदैवानं माझ्या आयुष्यात असे बरेच मित्र- मैत्रीण मी जोडलेत ज्यांच्यासोबत मी माझं सुख - दुःख share करतो. आणि मुळात ते मला समजून घेतात.

मी कशामुळे depression मध्ये गेलेलो ?

२ reasons

1) internal family problems

2) अर्थातच love scene ....ज्या मुलीवर प्रेम केलं तिचा आलेला नकार...अर्थात onesided प्रेम होतं माझं .

मी त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं ?

तर अशा मित्रांना भेटलो जे ७-८ वर्षं रीलेशनशीपमध्ये असून breakup झालेले काही मित्र होते. त्यांनी त्यांचा अनुभव माझ्यासोबत share केला आणि हे सगळं ऐकल्यावर मला माझं दुःख खूप खूप लहान वाटलं. मी मुळात माझ्या जवळच्या मित्रांसोबत मनमोकळेपणानं यावर बोललो ज्यामुळे त्या phase मधून बाहेर निघण्यास मला मदत झाली.

पण seriously सांगतो..... तुम्ही कोणीही असो ....depression मुळे थांबू नका. ते कधीना कधी येणारच ....त्याला tackle करायला शिका . depression overcome करण्याचे ६ methods आहेत .

याला आपण 6 life hacking methods बोलूया .

१) निर्लज्ज व्हा......... निर्लज्ज...... याने तुम्हाला मानसिक ताण अजिबात येणार नाही.

" निर्लज्जम सदा सुखी "

अशी मराठीत एक म्हण आहे.शाळेत फळ्यावर लिहिले जाणारे सुविचार किंवा म्हणी आपण तिथेच फळ्यावरच सोडून दिल्या आहेत.

‘संयम थोर असतो’, ‘सब्र का फल मिठा होता है’ यांसारखी सुवचने आपण जास्त seriously कधीच घेतली नाहीत. शाळेत फळ्यावर लिहिले जाणारे सुविचार आणि म्हणी आपण carryforward करून सोबत घेऊन actual आयुष्यात apply करायला पाहिजे. आधी एखादी मला व्यक्ती उलटं सुलटं बोलल्यावर मी ३-४ दिवस त्यावरच विचार बसायचो.....पण एकदा निर्लज्ज झाल्यावर २ ऱ्या सेकंदाला तुम्ही तो thought च मनातून काढून टाकता.

२) रडा आणि मोकळे व्हा ........ रडणं ही सर्वांत बेस्ट therapy आहे......याच्यावर माझा १०० नाही १००० टक्के विश्वास आहे. मोठ मोठे counselors ही method सांगतात. एक survey असा आहे की फक्त रडल्यानं आणि जवळच्या व्यक्तीकडे मनातल्या भावना व्यक्त केल्यानं ८० % दुःख - depression कमी होतं.

मग तुम्ही एकांतात रडा नाहीतर जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर रडा . पण रडा.

खरंम्हणजे पूर्वीपासून आपण आपल्या मनाचा एक चुकीचा गैरसमज करून घेतलाय की ..... मी रडलो तर समोरचा मला हसेल का ? मला कमकुवत समजेल का ? किंवा रडायचं ते स्त्रीयांनीच....... पुरुषांनी कधीच रडलं नाही पाहिजे.

तर हा गैरसमज आधी डोक्यातून काढून टाका आणि मनमोकळेपणाने रडा.believe me यानं तुमचं depression निर्विवाद नाहीसं होईल.

३ ) पंचमहाभूतं -

पृथ्वी - जल -अग्नी - वायू - आकाश .

depression मध्ये गेल्यावर शक्य असल्यास २-३ दिवसासाठी राहत्या घरापासून थोडं दूर जायला मिळाल्यास जा. जसं गावी किंवा ट्रेकिंगला किंवा कोणत्याही निसर्गाच्या ठिकाणी.

पृथ्वी - म्हणजे माती - तुम्ही concrete च्या घरातून बाहेर पडून जंगलात अथवा समुद्र किनारी भ्रमंती करू शकता.

जिथं -

जल - शुद्ध पाणी असेल .

अग्नी- म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात मिळेल.

वायू - हवा शुद्ध असेल.

आकाश- open space असेल . दाटीवाटीच्या ठिकाणाहून किंवा कोंदटलेल्या ठिकाणातून बाहेर पडून मोकळ्या खुल्या आकाशात भ्रमंती करायला मिळेल अशा ठिकाणी जायला मिळाल्यास जा.

मुळात एखादा माणूस जंगलातच राहत असेल आणि depression मध्ये गेला असेल तर त्यानं कुठं जावं ? किंवा वरील प्रवास खर्चिक असल्यास अशा वेळी काय करावं ? तर उरलेले ५ methods कराच शिवाय राहत्या घरापासून जिथं शक्य होईल अशा शांत ठिकाणी एकांतात स्वतःसोबत वेळ घालवा. स्वतःसोबतचा घालवलेला हा शांततेचा काळ नक्कीच गुंतलेली अवघड गणितं सोडवण्यास मदत करतो.

४) एखाद्या problem मध्ये अडकून depression मध्ये गेल्यानंतर स्वतःला एका गरिबांसोबत किंवा सर्वांत दुःखी माणसासोबत compare करा. असं केल्यास तुम्हाला तुमचं दुःख क्षुल्लक वाटेल. for an example - तुम्ही ज्या घरात राहताय ते तुम्हाला खूप छोटं वाटून घुसमट होत असेल तर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसोबत स्वतःची तुलना करा , तुम्हाला एक जाणवेल की तुम्हाला राहायला atleast साधं घर तरी आहे. आणि अन्न - वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा तरी पूर्ण होत आहेत. असा प्रश्न स्वतःला विचारल्यास तुमचं depression आणि आत्महत्येचे विचार overcome होतील.

५) सकाळी सूर्यु उगवायच्या आत उठून अंघोळ करा..... तुमचे प्रॉब्लेम्स automatically solve होतील बघा... आणि जो स्वतःची झोप sacrifice करू शकतो तो आयुष्यात खूप successful होऊ शकतो.

६) अर्थात जग संपूर्ण भारतात हा ट्रेंड सुरु आहे की व्यक्त व्हा.... हे खरंय..... तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे तुमचं मन हलकं करा..... मोकळं व्हा......

at the end सांगतो .......

आयुष्यात जास्त जास्त लोड घेऊ नका. emotionally विचार करण्यापेक्षा logically विचार करा. आत्महत्या करून उत्तरं मिळत नाहीत तर आणखी प्रश्न recreate होतात .

अहो लोकं १ दिवस सोशल मीडिया वर फोटो टाकून RIP लिहितील आणि तुमच्यासोबतचे त्यांचे संबंध यावर मोठ मोठ्या posts लिहितील. believe me ..... २४ तासांनंतर तो फोटो remove झाल्यानंतर लोकं तुम्हाला विसरून जातील . लोकांना स्वतः चेच एवढे problems आहेत की त नाही लक्षात ठेवत.दुनियेला फिकीर नसते. फरक पडतो तो फक्त आणि फक्त घरच्यांनाच .घरच्यांवर याचे दूरगामी परिणाम होतात. हा fact आहे जो माणसानं हे accept केलाच पाहिजे.

english मध्ये २ सुंदर कोट्स आहेत - अर्थात दोहोंचा अर्थ एकच आहे -

living a life without a purpose is life wasted
a life without a clear purpose is like driving with no destination and no direction
आणि हे खरंच आहे... आई शप्पथ एकदा का स्वप्न मागे लागली ना तर results मिळेपर्यंत अपमान, तिरस्कार, त्याग ,माया नकार. निद्रानाश, ignorance या सगळ्या खूप क्षुल्लक गोष्टी वाटू लागतात.

purpose of life - आपण स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्मलो आहोत.

आपण दुसर्यांना खुश करण्यासाठी इच्छा पूर्ण करतो. दुसर्यांना prove करण्यासाठी जगतो. आणि मग त्यांच्या इच्छा पूर्ण न केल्यामुळं depressed होतो. त्यामुळे सर्वांत आधी स्वतःला खुश ठेवण्यासाठी जगा.

तुम्हाला आयुष्यात काय achieve करायचंय हे एका पानावर लिहून काढा. atleast १० स्वप्नं तरी लिहा. ती स्वप्न पूर्ण करणं हेच तुमच्या जगण्याचं ध्येय बनून जाईल बघा . मुळात तुम्हाला का जगण्याचंय याची minimum १० कारणं तरी तुमच्याकडे असतील.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या अनुषंगानं timetable बनवा.

आणि सर्वांत महत्वाचं स्वतःला एक प्रश्न विचारा -मी कोणावर प्रेम करतो ? माझ्यावर कोण कोण प्रेम करतं ?

थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की depression आणि आत्महत्येचे विचार हा सगळा एक खेळ आहे जो तुम्ही तुमच्या मनातल्या मनात खेळत आहात .

तूर्तास इथेच थांबतो.

मी जे काही मनापासून सांगितलं ते पटलं असेल -आवडलं असेल - समजलं असेल आणि मुळात उमजलं असेल असा विश्वास मी व्यक्त करतो.

हा Blog जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा......तुमच्या प्रतिक्रिया comment मध्ये लिहा. धन्यवाद.

माझं instagram आणि facebook वर writer akshay temkar या नावाने page आहे त्याला follow करा. धन्यवाद

लेखक - अक्षय टेमकर

संपर्क- 8652826033 , email id- akshaytemkar8795@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप विचारपूर्वक लिहिलंय.
तेवढं शक्य झाल्यास त्या मुद्देसुत चं मुद्देसूद कराल का?
कोणासमोर तरी व्यक्त होणे, रडणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.जितकं वरून स्ट्रॉंग असल्याचा, कूल असल्याचा गिलावा करत राहावा लागणार तितके आतल्या भिंतीला पडलेले तडे लपून वाढत जाणार.
डिप्रेशनमध्ये असलेल्या सर्वाना असे ऐकणारे कान, रडायला खांदे मिळोत आणि ते यातून योग्य उपाचाराने बाहेर येवोत.

उत्तम लेख... रूट कॉस पण दिला आहे आणि सोल्युशन देखील...
नव्या नव्या डिप्रेशन मद्धे जाणाऱ्याला नक्की फायदा होईल बाहेर पडायला....

भाषा जर अशी विकसित होत जाणार असेल तर सुशांतच्या मार्गावर जाणे सोयीस्कर असेल.
>> सिरियसली??? इतकी कुचकी कमेंट या विषयावर??

अक्षयजी .. धाग्याचे नाव मराठी मध्ये लिहिलं तर अधिक परिणामकारक होईल. पुढील लेखनास शुभेच्छा तुम्हांला.

मनापासून लिहिले असल्याने भावले!
ते पन्चमहाभूतांचा विचाय माझ्या मते अगदी आवश्यक आहे...बाहेर पडल्याने खरी अनुभूती होते....कि आयुष्य हे विशाल आहे...
आणिक एक महत्वाचे....मनाला भावणार्या विचारांन्ना आवर्जून प्रतिसाद द्या! हा 'छोट्टासा प्रतिसाद ही एक जादू करून जातो...

चांगलं लिहिलंय. काही ठिकाणी बोली भाषेऐवजी लेखी भाषा वापरली असती तर वाचताना कमी अडखळायला झालं असतं. पुलेशु (पुढील लेखनासाठी शुभेच्छा)!
डिप्रेशनचा अजून एक प्रकार असतो तो म्हणजे high functioning depression. अशी लोकं अत्यंत उत्साहाने जगणारी, भरभरून बोलणारी असतात मात्र तरीही त्यांना नैराश्याने ग्रासलेले असते. अशी माणसे ओळखणे आणि त्यांना योग्य उपचार मिळणे आवश्यक असते.

चांगलं लिहिलंय. काही ठिकाणी बोली भाषेऐवजी लेखी भाषा वापरली असती तर वाचताना कमी अडखळायला झालं असतं. >> +१००
अनावश्यक इंग्रजी शब्दांची पखरण (स्प्रिंकलिंग) टाळता आली तर बघा. उदा: "तुमचे प्रॉब्लेम्स automatically solve होतील बघा" ऐवजी "तुमचे प्रश्न आपोआप सुटतील". हल्ली वर्तमानपत्रात असेच धेडगुजरी मराठी लिहीतात. त्यामुळे लेख "ट्रेन्डी" आहे, उत्तम आहे. अभिनंदन Happy

छान लिहीले आहेत. बरेच मुद्दे पटले.

१. निर्लज्ज व्हा... हे मी गेले काही वर्षे करतोय.

२. रडा आणि मोकळे व्हा... हे आधीपासूनच जमते. पण १ नंबरमुळे डिप्रेशन यायचा चान्स खूपच कमी होऊन जातो.

खालचे मात्र मला समजले नाही.
>>>
५) सकाळी सूर्यु उगवायच्या आत उठून अंघोळ करा..... तुमचे प्रॉब्लेम्स automatically solve होतील बघा... आणि जो स्वतःची झोप sacrifice करू शकतो तो आयुष्यात खूप successful होऊ शकतो.
>>>

सक्सेसफुल होण्यास हे ठिक आहे. पण डिप्रेशनवर ऊपाय म्हणून हे कसे झाले?

कि सक्सेसफुल होणे आणि डिप्रेशन न येणे याचा थेट संबंध लावला आहे यात.

सक्सेसफुल नाही झालो तरी डिप्रेशन येता कामा नये ना..?

बाकी एक माझेही मत आहे की आयुष्य ईतके मनोरंजक असले पाहिजे, आवडीच्या गोष्टींना तुम्हाला वेळ कमी पडायला हवा, आणि झोपणे म्हणजे वेस्ट ऑफ टाईम वाटायला हवे.

त्यानंतर
स्वप्न हवीत हा मुद्दाही मला किंचित कन्फ्यूजिंग वाटला.

स्वप्ने नसली तरी काही बिघडत नाही. आपले मजेत चालूय. असा ॲटीट्यूड ठेऊन कोणी जगत असेल तर डिप्रेशन का यावे?
कि डिप्रेशन आल्यावर आपली स्वप्ने काय आहेत याचा शोध घ्यावा?
स्वप्ने आहेत पण तीच पुर्ण न झाल्याने डिप्रेशन नाही का येऊ शकत?

मला वाटते की डिप्रेशन पॉईंट ऑफ व्यू ने विचार करता स्वप्न असे हवे की ते पुर्ण होण्यापेक्षा ते बघण्यात आणि ते जगण्यात आयुष्य सुंदर वाटायला हवे. ॲट ए टाईम छोटे स्वप्न बघावे पुढे जात राहावे. तसेच पुर्ण आयुष्याचे एकच स्वप्न एकच ध्येय असू नये. हे म्हणजे एकाच बॅंकेत सारे पैसे ठेवलेत. ती डुबली की आलो रस्त्यावर. आयुष्य जगण्याचा दुसरा बॅकअप हवाच. असा विचार करू नये पण अगदी आपल्यासाठीची जगातली प्रिय व्यक्ती सोडून गेली तरी आपल्याकडे का जगावे हा पर्याय हवा.

nepotism- त्याचा मराठीत अर्थ होतो नातलगत्व. म्हणजे राजाचा मुलगाच राजा बनणार किंवा नेत्याचा मुलगा मुलगीच नेता बनणार >>>>> Nepotism - भाई-भतीजावाद. Nephew (nepot) लॅटिन शब्द.

सिरियसली??? इतकी कुचकी कमेंट या विषयावर??>> कुचकी कमेंट? असा निष्कर्ष कशावरून काढलात? तुम्ही लेख वाचालात, तुम्हाला भावला ते चांगलं आहे की. माझ्याच्याने वाचवले गेलेच नाही. एवढी मेहनत जर एखादा लेख पाडायला घेत असेल कोणी तर थोडी मेहनत भाषा, व्याकरण, शुध्दलेखन यावर देखील घेतली तर चांगले होईल की नाही? अगदीच पुस्तकी भाषा हवी हा हट्टदेखील नाही पण खरेच हे लिखाण ज्यांना ज्यांना वाचता आले त्या सगळ्यांना प्रणाम.

एवढी मेहनत जर एखादा लेख पाडायला घेत असेल कोणी तर थोडी मेहनत भाषा, व्याकरण, शुध्दलेखन यावर देखील घेतली तर चांगले होईल की नाही? अगदीच पुस्तकी भाषा हवी हा हट्टदेखील नाही पण खरेच हे लिखाण ज्यांना ज्यांना वाचता आले त्या सगळ्यांना प्रणाम.
>>
+१

भाषा जर अशी विकसित होत जाणार असेल तर सुशांतच्या मार्गावर जाणे सोयीस्कर असेल.
>> मी या कमेंट बद्धल बोलत होतो... तुमची पहिली ओळ - माझ्याच्याने वाचवले गेले नाही - हे समजू शकतो.. पण सुशांत च्या नावावर जो विनोद टाईप खपवला आहे त्याबद्धल ...

किल्ली, सकाळी सूर्यु उगवायच्या आत उठून अंघोळ करा..... तुमचे प्रॉब्लेम्स automatically solve होतील बघा... (हलके घ्या! Happy ) (अवांतर बद्दल क्षमस्व).
इंग्रजी शीर्षक बहुतेक त्यांचा ब्लॉग आहे म्हणून दिले असावे. एस ई ओ प्रकार. तसे असेल तर नाही बदलले तरी ठीकच आहे. मराठी जास्त लोकांनी वाचावे अशीच इच्छा मग त्यासाठी एस ई ओ प्रकार करावे लागले तरी ठीक.

लेखाचा हेतू आणि मदतीची इच्छा स्तुत्य आहे .. माईल्ड डिप्रेशनची लक्षणं असणाऱ्यांना फायदा होईल .. सुसाईड ही हाताबाहेर गेलेल्या , क्रॉनिक डिप्रेशनची शेवटची पायरी असते . त्यांना ह्यातले सगळेच सल्ले मानवण्यासारखे नाहीत .. एक एक दिवस जिवंत राहणं ज्यांच्यासाठी परीक्षा असते त्यांना काय स्वप्नं बघायला सांगणार .... आणि परपज ठरवायला सांगणार ... तेवढी मानसिक शक्तीच नसते .. सन स्ट्रोक होऊन जमिनीवर तडफडणाऱ्या माणसाला - ' तो डोंगर दिसतो आहे लांब त्याला तुझं ध्येय बनव , आणि चालत राहा , बाकी त्रासाकडे लक्ष देऊ नकोस , तिथे पाणीही मिळेल कदाचित पण तू चालत राहणं महत्वाचं आहे ' असा सल्ला दिल्यासारखं होईल ते ....

असो , तुमचे बहुतेक सल्ले - टिप्स छान आहेत , मदत करण्याच्या सद्भावनेतून आले आहेत ... तात्कालिक कारणांमुळे तडकाफडकी आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्यांना त्यांचा नक्कीच फायदा होईल ( प्रेमभंग , नापास होणे , नोकरी अचानक जाणे , फसवणूक , आर्थिक लॉस ) ... फक्त क्लिनिकल डिप्रेशन असेल तर त्यांचा तेवढा उपयोग होणार नाही ... या लेखात डिप्रेशन ही मेडिकल कंडिशनही असू शकते याचा उल्लेखही नाही आहे ...

या लेखात डिप्रेशन ही मेडिकल कंडिशनही असू शकते याचा उल्लेखही नाही आहे ... लोल अगदी म्हणुनच काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मुख्य मेंदूतील केमिकल इम्बॅलन्स तर असतो त्याचा उल्लेखही नाही.

बरोबर आहे. क्लिनिकल डिप्रेशनचा उल्लेख नसला तरी हा लेख मला उपयोगी वाटला.
क्लिनिकल डिप्रेशन असणारी व्यक्ती आत्महत्या करेलच असे नाही. पण सध्याच्या परिस्थितीत अनेक जणांना मानसिक ताणतणाव भेडसावत आहेत आणि त्यातून एका कमकुवत क्षणी आत्महत्येसारखं भयंकर पाऊल उचलण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो. अशा मनाने निराश असलेल्या व्यक्तीला हा लेख वाचून कदाचित मदत होईल.

भारतीय लोक अभिनेता ,अभिनेत्री ची लाईफ स्टाईल फॉलो करतात हे चुकीचे आहे.
भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे.
तुम्ही व्याख्या केलेली लोक 20 लाख पण नसतील.
सुशांत सिंग च्या आत्म हतेंकडे गंभीर पने दोन चार लाख लोक पण बघत नसतील.

पण सध्याच्या परिस्थितीत अनेक जणांना मानसिक ताणतणाव भेडसावत आहेत आणि त्यातून एका कमकुवत क्षणी आत्महत्येसारखं भयंकर पाऊल उचलण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो. >> + १०० शिवाय लेखक स्वतः डिप्रेशन मध्ये होते आणि त्यातून बाहेर पडले. हे अशा व्यासपीठांवर लिहायलाही बळ लागते.
जीवशास्त्र (बायोलॉजी) १०१ - मनुष्य शरीर व आनुषंगिक रोग अभ्यासण्याच्या ६ पातळ्या असतात. पहिली रासायनिक (मोलेक्युलर किंवा केमिकल), दुसरी पेशीय (सेल्युलर), तिसरी ऊती किंवा टिश्यू, चौथी अवयव पातळी (ऑर्गन लेव्हल), पाचवी प्रणाली (सिस्टेमिक) आणि शेवटची वर्तणूक (बिहेवीयरल). कुठल्याही लेखकाला किंवा शास्त्रज्ञाला प्रत्येक पातळीवर उहापोह केलाच पाहिजे असे बंधन नाही. यापूर्वी (व यानंतरही) मानसरोगांवर लिहीणार्‍या अनेक लेखकांच्या अनेक त्रुटी ध्यानी येवूनही केवळ त्यांनी त्यांच्या आजारावर मात केली हे अतिशय कौतुकास्पद आहे हे भान ठेवून प्रतिक्रिया देते/देण्याचा प्रयत्न करते.