माझी २०१७ मर्सिडीझ बेन्झ GLA आता बदलावी का?

Submitted by खग्या on 13 July, 2020 - 08:44

माझ्याकडे २०१७ सालची मर्सिडीझ बेन्झ GLA २५० ४ मॅटिक हि गाडी आहे. गाडी अत्यंत उत्तम स्थितीत आहे.

दुर्दैवाने महिन्याभरापूर्वी रात्री गाडी चालवत असताना हरीण मध्ये आल्यामुळे छोटासा अपघात झाला. विमा कंपनीच्या कृपेने गाडी ४५० डॉलर्स मध्ये दुरुस्त होणार असली तरी चालकाच्या बाजूच्या बम्पर पांसून मागच्या दरवाज्यापर्यंत प्रत्येक भाग बदलला आहे.

या मुळे गाडीची पुनर्विक्री किंमत नक्कीच कमी होईल. परंतु विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार गाडी चालविण्यात काहीही अडचण येणार नाही आणि नवीन दुरुस्ती ची वॉरंटी देखील दिली आहे.

मग आताच हि गाडी विकून नवीन गाडी घ्यावी का?

आणि सध्या मंदीचे चटके जाणवत असल्यामुळे कर्ज अगदी कमी दरात उपलब्ध आहे. आणि गाड्यांच्या किमतीसुध्दा अतिशय कमी झाल्या आहेत. म्हणून मोह पडतो आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>मग आताच हि गाडी विकून नवीन गाडी घ्यावी का?<<
शॉर्ट आन्सर इज येस. पुढची कटकट टाळायची असेल तर...

४ इयर/५०,००० माइल वॉरंटि वॉय्ड्/पार्शली वॉय्ड झालेली आहे का याची आधी खात्री करुन घ्या. वॉरंटि असेल तर ती पुढच्या वर्षी संपायच्या आत गाडी विका, त्यातल्या त्यात बरी किंमत मिळेल. एयरबॅग डिप्लॉय झाली असेल तर विकाच (विथ फुल डिस्क्लोजर). कोलराडो डिएमविचे नियम माहित नाहि, पण अ‍ॅड वलोरेम कापत असतील तर स्टेटकडुन आणि इंशुरंस कंपनी कडुन डिमिनिश्ड वॅल्युचा चेक मिळेल, तो काहि प्रमाणात रिसेल वॅल्युतली तूट भरुन काढु शकेल. गुड लक!

पेमेन्ट्स चालू आहेत का अजून ? १-२ वर्षात संपतील. आता नवी गाडी घेतली तर अजून ४-५ वर्षे पेमेंट्स चालू राहतील.
स्ट्र्क्चरल डॅंमेज नाही ना? गाडी अजून -८-१० वर्षे मस्त चालेल. त्यानंतर रिसेल व्हॅल्यू मधे फारसा फरक जाणवणार नाही !कशाला ४-५ वर्षे पेमेंट ओढवून घेताय ?

हरीण धडकल्याने होणारे सगळेच डॅमेज करफॅक्स मध्ये रिपोर्ट होत नसावेत... माझा झाला नव्हता. (माझ्या बबतीत पोलिस वगैरे काही ममला नव्हता)
माझ्या २००७ च्या गाडीला २०१२ मधे हरीण धडकल्याने $१४०० चा खर्च आला होता (बॉनेट, बंपर, हेडलाईट्स आणि सबंधित सगळी असेंब्ली). जो अर्थातच ईन्श्युरन्स कंपनीने दिला. मी २०१६ मध्ये गाडी विकली तेव्हा कारफॅक्स रिपोर्ट मध्ये ह्या संदर्भात काहीच नमूद नव्हते.
त्यामानाने तुमचा डॅमेज मायनर दिसतो आणि प्लग अ‍ॅंड प्ले टाईप्स स्टँडर्ड बॉडी पार्ट्स लावले असतील तर फार काही फरक पडू नये.

गाडी चांगले असेल/ इन्शुरंन्स मिळत असेल इ. तर मेधा +१.
नवी गाडी (कुठल्याही कारणासाठी) / वेगळ्या सेगमेंट मधली गाडी घ्यायची मनात असेल तर आत्ता चांगली वेळ आहे. पण जर अशीच गाडी घ्यायची असेल तर काही पॉईंट दिसत नाही.

Buy Tesla

सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अमा: टेसला घ्यायचा विचार केला पण चार्जिंग साठी जागा नाही. मी अपार्टमेंट मध्ये राहतो तेथे सोय नाही. टेस्ला चे चार्जिंग स्टेशन पण जवळपास नाही.

च्रप्स: हरीण उत्तम आहे. मी खाली उतरायच्या आत पळून गेले त्यामुळे मनाला वाईट कमी वाटले.

हायझेनबर्ग: धन्यवाद, डॅमेज तसं कमी आहे, आणि इन्शुरन्स कमी झालेल्या किमतीचे पैसे देईल असं वाटत नाही.

मेधा: पेमेंट्स संपली २ महिन्यांपूर्वी आता या गाडीचे पैसे सरळ दुसऱ्या गाडीमध्ये घालून वर थोडे घालावे लागतील असा अंदाज आहे.

राज: हो वॉरंटी याच वर्षी संपते आहे.

एकंदर आहे ती गाडी विकून सी क्लास घ्यायचा मोह होतोय. पण सध्या पैशांचा अपव्यय सुद्धा वाटतोय. गाडी दुरुस्त करून मिळायला अजून साधारण २ आठवडे आहेत. तेवढा वेळ विचार करतो.

पेमेंट्स संपली २ महिन्यांपूर्वी आता या गाडीचे पैसे सरळ दुसऱ्या गाडीमध्ये घालून वर थोडे घालावे लागतील असा अंदाज आहे. >> पेमेंटस नसतील तर ते एंजॉय करा अजून चार पाच वर्षे . वॉरंटी सपंली तर डीलरकडे न जाता लोकल मर्सिडिज स्पेशलायझेशन शॉप शोधा . बरेच पैसे वाचतील. १००-१५० के माइल्स आरामात चालावी तुमची गाडी.
माझी सी क्लास १३० के मैल चालवली होती. आता बीमर एस्युव्ही १४८ के मैल आहे आणि अजूनही मस्त चालते आहे.

>>हो वॉरंटी याच वर्षी संपते आहे.<<
जर्मनीच्या गाड्यांमधलं इलेक्ट्रॉनिक्स हे एक मेंटेनंस नाइटमेर आहे. हा ब्रह्मराक्षस अ‍ॅक्सिडंट झाल्यामुळे चवताळतो, आणि गाडी वारंवार नादुरुस्त करण्याची शक्यता निर्माण करतो. आता करा हिशोब, जुन्या गाडिच्या दुरुस्तीवर खर्च करत बसायचं कि नविन गाडी घेउन अ‍ॅट लिस्ट वॉरंटि पिरियड मधे मिळणारा पीस ऑफ माइंड प्रेफर करायचा...

धन्यवाद!

काही चांगलं डील मिळालं तर बघतो. मेंटेनन्स हा मुद्दा पटला, माझ्या माहितीप्रमाणे वार्षिक रेग्युलर मेंटेनन्स साठी साधारण १००० डॉलर्स खर्च येतो. नवीन गाडी घेतली तर ३-४ वर्षांसाठी तो खर्च वाचेल.

एकंदर असा विचार करतोय कि गाडी दुरुस्त करून मिळाली कि २-४ महिने चालवून पाहावी आणि आवडली नाही तर नोव्हेंबर - डिसेंबर च्या आस पास उत्तम डील बघून हि विकून नवी गाडी घ्यावी

नोव्हेंबर - डिसेंबर च्या आस पास उत्तम डील बघून हि विकून नवी गाडी घ्यावी> आमच्या इथे दिवाळी पाडवा अशे दिवशी स्पेशल डील्स असतात तसे तिथे क्रिसमस टायमाला असतील हो ना. इथे तर कार्स हे बायर्स मार्केट झाले आहे.