त्या पोराने

Submitted by मनोजकुमार देशमुख on 12 July, 2020 - 01:02

येता गिर्‍हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे?
वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ?

चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो
हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे?

नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे
आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे?

भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते
सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे

जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला
या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?

Group content visibility: 
Use group defaults

"चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो
हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे?" ---> आईशप्पथ मन भरलं. दोन-तीन दिवसांंपुर्वीच वाटल होतं. मोगर्‍यावर, चाफ्यावर, बकुळीवर गाणी निघतात. जुई वर का नाही. (जुई अत्ता अत्ता यायला लगलीय पावसमुळे) या दोन ओळींनी गाण्याची तहान भागली मनोज दादा!

"जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला
या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?"---> टोचलं बघा आत कुठतर सगळ सुरळीत असुनही!!

Pragalbha Prade अशी दाद मिळाली की भरून पावल्या सारखे वाटते ...खूप धन्यवाद !