थोडासा टाईमपास करोना- उखाणा कोरोना

Submitted by म्हाळसा on 11 July, 2020 - 23:53

कोरोनाच्या काळातला उखाणा- पहिला मी घेते

‘घरी बसून मुलगी झाली आहे बोर
खंडोबा रावांना ओरडून सांगते, बिझी ठेव हिला नुसतच टाईमपास करतंय हे पोर‘

दुसराही मीच घेते-

‘बाहेर भटकायची लागली आहे खूपच आस,
खंडोबारावांचं नाव घेते, कधी संपणार हा कोरोनाचा त्रास’
.
आता तुमचा टर्न ..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जळलं मेलं लक्षण, नको करोनाचं नाव,
खेळता का आमच्याशी एक गमतीचा डाव?

ड्यु आयडी भर्रपूर त्यांचा चाराणे भाव
कावळ्यासारखे सतत करतात काव काव

कुठे मारतो पिन तर कुठे आग लाव
करून सवरून XXX आणतो सावाचा आव Happy

पैचान मै किस्के गर्लफ्रेंड का ड्यु आयडी हूं? Lol

एक वॉट्सअप्प फॉरवर्ड

.…......

उखाणे म्हणलं की लक्ष जात काय नवीन ऐकायला मिळतायेत का उखाणे.पण आज मी नेहमीचेच उखाणे आणलेत फक्त वेगळ्या स्वरूपात. उखाण्यातुन केलेली जनजागृती.लोकडॉऊन मध्ये सुचलेले काही गमतीशीर उखाणे.

हंड्यावर हंडे सात,त्यावर मांडली परात,
कोरोनाना हरवायला,बसा आपापल्या घरात

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,
सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून

शिरा बनवायला तूप,साखर,वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

तालमहल,कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षण दिसली कोरोना ची तर डॉक्टरना भेटा थेट

सूर्याला म्हणतात इंग्रजीत सन,चंद्रला म्हणतात इंग्रजीत मुन,
सॅनिटायझर लावा आल्यावर बाहेरून,बाहेर जाताना घरातून

हिमालयात आणि शिमल्यात आहे बर्फाची रास
हँडवॉश व मास्क वापरून करूया कोरोनाचा ऱ्हास

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

चिमणीला म्हणतात चिऊ,कावळ्याला म्हणतात काऊ, आपण घरीच सुरक्षित राहू,विनाकारण बाहेर नका जाऊ,

चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,