अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाण्यातून पसरत नाही तसा, पण जर कूक, पॅक करणारी व्यक्ती, आणुन देणारी व्यक्ती, इतर कुणी ते हाताळणारी व्यक्ती बाधीत असेल तर?
>>> चांगला मुद्दा... पॅकेट आपल्या घरातल्या utensil मध्ये काढून घेतो. नंतर हात व्यवस्थित धुवायचे.

जमल्यास आणि मायक्रोवेव्ह असल्यास मायक्रोवेव्ह ला 1 किंवा दीड मिनिट फिरवल्यास अजून सेफ्टी ऍड होईल.

अन्न ची पॅकेट खोलून ते गरम करण्या च्या अगोदरची काळजी नीट घेतली जावी.
अन्न तर गरम करूनच खाणार आणि त्या मधून संक्रमण होण्याची बिलकुल शक्य ता नाही.
पण pkt हाताळताना नीट काळजी घेतली पाहिजे .
नाही तर काही प्रमाणात संक्रमण चा धोका आहे.

अमिताभ च्या घरातील स्टाफची तपासणी झाली असे वाचल्यासारखे वाटते.
नोकर मंडळी साठी वेगळी व्यवस्था वेगळी मोठी खोली खूप कमी लोक देतात
जुने बंगले बघितले मलबार हिल चे जिथे आता मंत्री लोक राहतात त्या मध्ये नोकर मंडळी साठी बांगल्या च्या आवारात छोटी घरं आहेत .
पण आता एकद्या अडगळी च्या खोलीत चारपाच नोकरांना राहण्याची व्यवस्था असते.
ते कसे राखणार सोशल distance.

आम्ही मागवतो. लॉकडाऊन नसल्यामुळे मास्क, हातात ग्लव घालून स्वतः जाऊन घेऊन येतो. घरी आले की वाईप किंवा सॅनिटायजरने आधी पिशवी पुसुन घेतो. मग बॉक्स बाहेर काढतो व सर्व बॉक्स पण बाहेरुन व्यवस्थीत पुसुन घेतो. मग पुन्हा हात साबणाने स्वच्छ धुतल्यावर बॉक्स उघडतो (हे करेतोवरच दमुन जायला होते). सगळे हेच करत असणार म्हणा.
आमचे काही मित्रवर्य बाहेरचे पण अजिबात आणत नाहीत धोका नको म्हणुन.
अर्थात भारतात इतकं केलं की पुरेसं आहे की नाही हे मात्र ती परिस्थिती जवळून पहाणार्‍यांनाच माहिती असणार.

पण तयार अन्नच कश्याला. राशनपाणी वा काहीही वस्तू मागवतो त्या सर्वांनाच हे लागू.
आम्ही आतल्या स्टोअररूम कम कपडे वाळत घालायच्या रूमचा एक भाग क्वारंटाईन विभाग केलाय. शक्य ते सॅनिटाईज करून घेतो आणि शक्य तेवढे त्या भागात शक्य तितके दिवस वेगळे ठेवतो. जेणेकरून व्हायरस आमच्यापर्यंत संक्रमित न होता तिथेच मरेल.

तयार अन्न बाहेरचे मागवणे थांबवले आहे.
मध्यण्तरी जूनला लॉकडाऊन उघडले तसे एकदोनदा समोरून समोसापाव वडापाव आणलेले. पण ते पाव आणि चटणीसह ओवनम्ध्ये गरम करून घेतले

<< अर्थात भारतात इतकं केलं की पुरेसं आहे की नाही हे मात्र ती परिस्थिती जवळून पहाणार्‍यांनाच माहिती असणार >>

----- हात साबणाच्या पाण्याने स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे. साबणाच्या पाण्यामधे कोरोनाचे बाह्य आवरण (जे स्निग्ध पदार्थाचे आहे ) विरघळते, कोरोनाचे स्ट्रक्चर नष्ट होते. मग तो काहीही करु शकत नाही.

काही भागात तर पाण्याचे दुर्भिक्ष कोरोनापेक्षा भयानक आहे.... Sad पाण्याचे नळ निव्वळ नावाला असतात. आठ / दिवसांनी दिवसांनी पाणी मिळते, आर्थिक स्थिती बरी असेल तर मग टँकरने मागवणे आले.... साठवणे आलेच.

१९८२ मधे कुलीच्या चित्रपटाच्या वेळी अपघातात गंभिर जखमी झाल्यावर... त्याने मृत्युशी यशस्वी झुंज दिली. दारावर आलेल्या यमराजाला परत पाठिविले. (थोडा काळ पुनित इस्सरचा राग यायचा... ). त्या काळात, रोज सकाळी सात वाजताच्या बातम्या एकायचो आणि तो बरा व्हावा अशी नसलेल्या देवाला प्रार्थना करायचो.

कोरोनाग्रस्त होण्याची वेळ शत्रूवर पण नको यायला... अमिताभ आणि परिवाराला या संकटा मधून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी शुभेच्वेळी.

बरं ते "भारतात करोना पसरणार नाही, घबराट पसरवून तुम्हाला काय मिळतंय?" वगैरे माहिती व्हाट्सएपवर पाठवायला सांगणारे डॉक्टर हल्ली दिसले नाहीत कुठे.

१३ मार्च पर्यंत आरोग्य मंत्रालयाला कोरोना हेल्थ इमर्जन्सी वाटली नव्हती...

आणि मग अचानकच संकट आल्याचे कळाले.... टाळ्या, थाळ्या आणि दिवे लावणे प्रकार झाले...

आज चार महिन्यानंतरही देशाच्या अनेक भागात लॉकडाऊन आहे आणि १८ जुलै पर्यंत दहा लाख लोकांना कोरोनाने गाठले आहे. अनेक जाणकारांनी ऑगस्ट- सप्टेंबर पर्यंत peak गाठणार असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यानंतर उतरण व्हायला सुरवात होणार.. अर्थात हे अंदाज शास्त्रिय माहितीवर आधारलेले असले तरी वास्तविकता त्यापेक्षाही भयानक असेल.

कोरोनाचा काळ जेव्हढा प्रदिर्घ तेव्हढे त्याचे परिणाम भयंकर रहातील... कोरोनाचा प्रसार रोखणे महत्वाचे आहेच पण सोबतच तेव्हढेच महत्वाचे कामगार वर्गाला कामापासून दूर ठेवण्याचे गंभिर आणि दुरागामी दुष्परिणाम...

१३ मार्च पर्यंत आरोग्य मंत्रालयाला कोरोना हेल्थ इमर्जन्सी वाटली नव्हती...
ह्या पॉइंट वर विचार केला तर जगातील सर्व देश बेफिकीर होते.
चीन मधून होणारी विमान वाहतूक पूर्ण बंद कोणत्याच देशांनी केली नाही.
आंतरदेशीय विमान वाहतूक कोणत्याच देशांनी बंद केली नाही.
Corona badhit लोकां na महत्वाच्या शहरात च उपचार केले.
आणि प्रचंड लोकसंख्या मुळे तो राक्षस पसरला
हे सर्व जगात घडले.
फक्त भारतात च असे घडले नाही.

त्यावेळीसुद्धा बातम्यामध्ये अमिताभबद्दल सांगायचे आणि त्याचे भक्त ते मन लावून ऐकायचे Uhoh अमिताभने नंतर पुनीत इस्सारला काम मिळू दिले नाही आणि त्याचे करिअर संपवले.
हाच अमिताभ परिवारासकट अंबानींच्या लग्नात वाढपी म्हणून काम करतो. महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकोपयोगी कार्यक्रमात तो सहभागी झाल्याचे मी बघितले नाही. म्हणायला म्हणायचे की महाराष्ट्राने खूप दिले पण इकडची भाषा, संस्कृती, प्रश्न याच्याशी त्याचे काही देणे घेणे नाही. सभ्यपणाचा बुरखा पांघरलेला लबाड कोल्हा आहे तो.

अमिताभने नंतर पुनीत इस्सारला काम मिळू दिले नाही आणि त्याचे करिअर संपवले.
>>>>
अशी सलमानगिरी त्याने केले असेल तर खरेच दुर्दैवी आहे.

हाच अमिताभ परिवारासकट अंबानींच्या लग्नात वाढपी म्हणून काम करतो.
>>>
बरेच कलाकार सामील होते घरच्या सोहळ्यासारखे अंबानीच्या लग्नात

महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकोपयोगी कार्यक्रमात तो सहभागी झाल्याचे मी बघितले नाही.
>>>
सरकारी जाहीरातीत तो नेहमी असतो. भले वैयक्तिक स्वार्थ असेलही, पण या कामाचा परीणाम लोकोपयोगी होत असेलच ना.

अमिताभने नंतर पुनीत इस्सारला काम मिळू दिले नाही आणि त्याचे करिअर संपवले.>>>>> चंपा. एकाच बाजूने विचार करु नका. अशा चूका मी पण केल्यात.

https://www.youtube.com/watch?v=V2GX1trOcQY

मुलाखत पूर्ण ऐका.

रश्मी मुलाखत ऐकली.
लिंकबद्दल धन्यवाद
अमिताभ स्वत: सुरुवातीला नाकारला गेल्यानंतर ईतका मोठा स्टार झाला तो असा उगाच कोणाच्य करीअरशी खेळेल असे वटत नव्हतेच.

कलाकार मंडळी आपसात काय राजकारण ,डाव पेच खेळतात ते स्वतः टिकून राहण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी नसावा म्हणून करतात
ते सर्वच करत असतील काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी.
त्याच्या शी काही देणे घेणे नाही.
प्रश्न हा आहे ज्या प्रेषक मुळे ते मोठे झालेले असतात त्यांच्या शी त्यांची नाळ तुटलेली असते.
त्या कलाकार ची प्रेशकांशी काही ही देणेघेणे नसते..t.
त्या मुळे आपण त्यांना जास्त डोक्यावर घेण्याची गरज नाही
नाना पाटेकर सारखे काही थोडेच कलाकार त्यांच्या जबाबदारी मनापासून निभावतात.

नाना पाटेकर सारखे काही थोडेच कलाकार त्यांच्या जबाबदारी मनापासून निभावतात.
>>>>>>>

कलाकारांनीच सामाजिक बांधिलकी जपावी, समाजाचे देणे फेडावे, पण नाक्यावरच्या दुकानदाराने मात्र आपला धंदा करावा. डिमांड बघून भाव आणखी वाढवावेत, आणि ते असे करणारच म्हणून आम्ही चालवून घ्यावे.

समाजात जे खरे हिरो आहेत त्यांची प्रसिद्धी झाली पाहिजे .
त्यांना समाजानी डोक्यावर घेतले पाहिजे.
बाबा आमटे सारखी लोक ज्यांनी कुष्ट रोग्याची सेवा केली त्यांच्या मुलांची नावं लोकांना माहीत नाहीत पण अमिताभ च्या नातीचे नाव पण माहीत आहे.
समाजात असे असंख्य बाबा आमटे आहेत ते समाज सेवा करत आहेत ते खरे हिरो आहेत.
अमिताभ किंवा sharukh nahi

नाना पाटेकर सारखे काही थोडेच कलाकार त्यांच्या जबाबदारी मनापासून निभावतात.
>>>>>>> तनुश्री प्रकरणानंतर का ? जसा सलमान ने बीइंग ह्युमन सुरु केला...

पण अमिताभ च्या नातीचे नाव पण माहीत आहे.
>>>>

मला नव्हते माहीत
कधी ऐकलेही असेल. पण लक्षात नव्हते.
बाकी मुलांची नावे लक्षत असणे हे लोकांचे आवडते असण्यशी संबंधित नाही
ईथे शाहरूखचा राग राग करणारयांनाही त्यांच्या मुलांची नाबे माहीत आहेत.

>>>>>> तनुश्री प्रकरणानंतर का ? जसा सलमान ने बीइंग ह्युमन सुरु केला...

>>>

नानाची समाज्सेवक ईमेज आधीपासून होती.
तनुश्री प्रकरणात खरे खोटे त्यांनाच ठाऊक. पुरावा कुठे काही समोर आला. किंबहुना फार गाजलेही नाही ते पुढे

तनुश्री ही नाना वर आरोप करून वेगळाच हेतू साध्य करत होती.
आणि तिची समाजात काडी ची पण किंमत नाही एक अयशस्वी उनाड कलाकारी न.
ह्या पलीकडे. तिला काय किंमत आहे.
कोणी च तिच्या बोलण्या वर विश्वास ठेवला नाही.
नाना खूप अगोदर पासून समाज कार्य करत आहेत.
तनुश्री नी फक्त महिला असल्याचा गैर फायदा उचलला.

तनुश्री नी फक्त महिला असल्याचा गैर फायदा उचलला.>>
माफ करा, पण आपल्याकडे काही पुरावे आहेत का?

वीरू +७८६
अश्या संवेदनशील विषयात ठोस पुरावा नसताना आपले मत आपल्याजवळच ठेवावे.
आरोप नक्कीच करू नयेत. ना नानावर ना तनूश्रीवर.

तिची समाजात काडी ची पण किंमत नाही एक अयशस्वी उनाड कलाकारी न.
ह्या पलीकडे. तिला काय किंमत आहे.
>>>>>>
समाजातली किंमत व्यवसायातील यशापयशावर का ठरवत आहात? माणूस म्हणून कोणाला काही किंमत नसते का?

ऐश्वर्याला तपासायला कोण जाणार या मुद्यावरून नानावटी हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टरांनी भांडण आणि मारामारी केली. दोघेही बोलत होते मीच जाणार.

Pages