Submitted by द्वैत on 10 July, 2020 - 11:14
ह्या काळोखाच्या भवती काळोख पसरला आहे
ह्या काळोखाच्या भवती काळोख पसरला आहे
तो सूर्य उद्याचा बहुदा वाटेत हरवला आहे
खिडकीच्या कानावरती झाडांची सळसळ आली
भलताच म्हणे बघ वारा रानात परतला आहे
हा ऋतू जसा बदलावा ही काया बदलत जाते
रंगात कोणत्या जाणे मी रंग मिसळला आहे
संदिग्ध किनाऱ्याकाठी मज नाव जरी ही दिसते
मी नाव कशी सांभाळू दर्याच खवळला आहे
मी स्वतास नेऊ म्हणतो त्या एका बिंदूपाशी
हा चंद्र नभीचा जेथे पाण्यात उतरला आहे
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
आवडली.
आवडली.
धन्यवाद सामो, धन्यवाद अस्मिता
धन्यवाद सामो, धन्यवाद अस्मिता