मोगरा फुलला!

Submitted by Sumedha on 7 July, 2020 - 13:09

काल काही कारणामुळे मन अस्थत्व झाले होते. youtube वर लताबाईंचे 'मोगरा फुलला' ऐकले अन फार बरे वाटले, जणु काही
फुलांचा सडा! साज, आवाज आणी भाव - अप्रतिम!

या गाण्या बद्दल तुमचे मत काय आहे? मूड ठीक करायला तुमची काही खास गाणी आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मोगर्‍यावर, चाफ्यावर गाणी झाली.
जुई वर एखादं व्हायला पाहिजे देवा!
किती मस्त फुल असतंं जुई च. छोटच पण वास अप्रतिम!!
मला शिर्षक वाचून वाटलं तुम्ही लेखच लिहीलाय.
ओह! तुम्ही गाण्याबद्दल विचारलयं.
मी तर कायम 'तु असतीस तर झाले असते' कॉफी आणि बरच काही मधलं ऐकतो.
त्यासोबत बापजन्म मधील 'गंध अजुनही' आणि 'मन शेवंतिचे फुल'

'मन शेवंतिचे फुल' गाणं अतिशय गोड आहे.
बापजन्म चित्रपट ही सुंदर आहे. लिंक देऊ का? ऑनलाईन बघण्यासाठी!

@pragalbha >>>>लिंक देऊ का? ऑनलाईन बघण्यासाठी!

हो, प्लीज लिंक द्या ना, मला बघायला आवडेल!

मौत भी आती नहीं, रात भी जाती नहीं
दिल को ये क्या हो गया, कोई शह भाती नहीं
लूट कर मेरा जहाँ छुप गये हो तुम कहाँ
लूट कर मेरा जहाँ छुप गये हो तुम कहाँ
तुम कहाँ, तुम कहाँ, तुम कहाँ
तुम न जाने किस जहाँ में खो गये
तुम न जाने किस जहाँ में खो गये

https://sites.google.com/site/baapjanma2017marathi720phd/
सुमेधा ताई डाउनलोड करून बघावा लागेल. फार जास्त साईज नाहीये.
क्लिअ‍ॅरीटी एच.डी. आहे.
'मन शेवंतिचे फुल' ऐकलत किंवा पाहीलत का काल?

@Pragalbha>>>
'मन शेवंतिचे फुल' ऐकले, फार सुंदर आहे. धन्यवाद!

>>>>सुमेधा ताई हे एक शेअर करायचंं विसरलो
माझ्या प्लेलीस्ट मध्ये अजूनही आहे

धन्यवाद! ('सुमेधा' म्हणालात तरी चालेल!)

ओके सुमेधा,
"मनी अचानक हलले काही", तु जरा उशीरच केलास हा! हा! हा!
झी एंटरटेनमेंट ने कॉपीराईट अ‍ॅक्ट लावून व्हिडीओ युट्यूब वरून काढून टाकलाय.
आता एम.पी थ्रीच ऐकावं लागेल.
https://marathimix.in/download/868/mani-achanak.html

गाण्याचे लिरीक्स अत्यंत हेवा वाटणारे आहेत. दासू वैद्य ने कमाल केलीय अगदी!
https://www.aathavanitli-gani.com/Song/Mani_Achanak_Halale_Kahi

सारे कळत नकळतच घडले - एव्हरग्रीन - https://www.youtube.com/watch?v=9-ZhlS0wCrc
तू तेव्हा तशी - https://www.youtube.com/watch?v=XeDp1oz1u4s
अशोक पतकी यांनी लावलेल्या चाली, जरुर ऐका (अतिशय सुंदर चाली) - https://www.youtube.com/watch?v=m_4izgQ9mXU
या लिस्टमध्येही 'मोगरा फुलला' गाणे आहे पण वेगळे.
गोट्या मालीकेची धुन व शब्द अवर्णनिय आहेत.

तुझे आभाळाचे रुप, माझा देह माती माय
कधी करपले दूध कधी दाटलेली साय
उभे भांडण जन्माशी, तरी गाभा सांभाळीला
तुझ्या थोरवीचा आहे, माझ्या माझ्यावर टीळा
जगण्याच्या समईत तुझ्या अभंगाच्या वाती
वादळात चालताना, तू माझा सांगाती

"वादळात चालताना, तू माझा सांगाती"--> सामो ताई या ओळि मी सिरीअल च्या टायटल सॉंग मध्ये ऐकल्या आहेत.
खूप मस्त वाटलं. आता परत ऐकतो Happy

जरुर ऐका प्रगल्भ.
त्या ओळी मी परत परत ऐकल्या. माझा देह मातीमय नसून शब्द माती (मग पॉझ) माय असा आहे. बहुतेक देवीला उद्देश्युन आहे.

मातीमाय म्हणजे धरती माय. आपण काळी आई म्हणतो तसे. किंवा मातीमय सुद्धा असू शकेल.म्हणजे मृण्मय, मातीचा बनलेला. पण माती माय हा जोड शब्द खूप प्रचारात आहे. या नावाचा एक मराठी चित्रपटसुद्धा होता.

>>>>मातीमाय म्हणजे धरती माय. आपण काळी आई म्हणतो तसे. किंवा मातीमय सुद्धा असू शकेल.म्हणजे मृण्मय, मातीचा बनलेला. पण माती माय हा जोड शब्द खूप प्रचारात आहे. या नावाचा एक मराठी चित्रपटसुद्धा होता.>>>> ओह ओके. उत्तम माहीती.

तुझे आभाळाचे रुप, माझा देह माती माय
कधी करपले दूध कधी दाटलेली साय
उभे भांडण जन्माशी, तरी गाभा सांभाळीला
तुझ्या थोरवीचा आहे, माझ्या माझ्यावर टीळा
जगण्याच्या समईत तुझ्या अभंगाच्या वाती
वादळात चालताना, तू माझा सांगाती

यामध्ये माती माय ही मला चूक वाटली होती. देह मातीमय ऐवजी माती माय कसला? त्यातून विचार सुरु झाला होता. कारण एवढ्या ठळक चूका, मालिकेच्या शीर्षक गीतात असू नयेत त्यामुळे चूक नसून वेगळा अर्थ असेल वगैरे ...