आज क्रिकेट मधल्या कॅप्टन कूलाचा वाढदिवस. खरं तर मागे काही दिवसापासून त्याच्या रिटायर होण्यासंबंधी चर्चा
चालू आहे.पण मला वाटतं की, क्रिकेटच्या मैदानावर कोणत्याही खेळाडूचे मूल्यमापन हे त्याच्या आकडेवारीवरून होत असते. पण धोनी सारखे खेळाडू या आकडेवारीच्या पलीकडे जाऊन आपली ओळख बनवतात.परंतु खेळाडू कितीही मोठा असला तरी तो मैदान कसा गाजवतो याकडेच सर्वांचं लक्ष असतं. जिथं क्रिकेटच्या देवालाही निवृत्तीच्या सोहळ्याला सामोरे जावे लागले तेथे धोनी कसा अपवाद ठरेल? आयुष्यभर सेवा केलेले जनावर थकल्यावर मालकाने त्याला बाजार दाखवावा, तशा पद्धतीने विक्रमाच्या डोंगर रचलेल्या आणि अनेक सामने जिंकून दिलेल्या खेळाडूलाही बाहेर फेकले जाते. मग तो कितीही मोठा असो. बीसीसीआयने ने करार केलेल्या खेळाडूंच्या यादीत धोनीचं नाव नसल्यामुळे धोनीयुग संपत असल्याचे संकेत यातून जरी मिळत असले, तरी शेवटी तो धोनी आहे आणि स्वतःच्या निवृत्तीचा निर्णय तो स्वतःच घेऊ शकतो तेवढी क्षमता अजूनही त्याच्याकडे आहे. म्हणूनच तो झारखंडच्या संघातून आणि पुढे येणाऱ्या(कदाचित
झाली तर) आयपीएलसाठी सज्ज आहे. जर त्याने आयपीएल मधून आपली जादू पुन्हा एकदा दाखवली तर येणाऱ्या टी- २० विश्र्वचषकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असं विधान तर याआधी रवी शास्त्री यांनी केलच आहे. हरलेला सामना जिंकून दाखवण्याची उमेद जशी धोनी दाखवू शकतो तसा साध्याच्या घडीला खेळाडू टीम इंडिया कडे दिसून येत नाही. विराट सारखा तडाखेबाज फलंदाज ही 'कर्णधार' भूमिकेसाठी अपुरा पडल्याचं जाणवते. त्यासाठी त्यालाही धोनी नावाच्या पुस्तकाचा अभ्यास करावाच लागेल. स्वतः नियमांबरोबर काटेकोर राहणारा नियम का मोडेल? कदाचित तो आपल्या दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी शोधत असावा....
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल!!
Submitted by हर्षद साबळे on 7 July, 2020 - 00:22
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा