अव्वाच्या सव्वा लाईटबील कमीत कमी यावे म्हणुन काही उपाय आहेत का..?

Submitted by DJ.. on 2 July, 2020 - 05:22

आजकाल वीजबीलांचा शॉक बसलेले बरेच जण आजुबाजुला दिसत आहेत. प्रत्येक घराचा वीजवापर हा त्या त्या घरात राहणार्‍या कुटुंब सदस्य संख्येवर आधारीत असावा असा माझा कयास. कुटुंबात जास्त सदस्य असतील तर कदाचीत जास्त वीजबील येत असावं असा माझा (गैर)समज होता. परंतु समोर रहाणार्‍या ३ सदस्य संख्येच्या कुटुंबाला पण १ हजाराच्या आसपास महिन्याचं वीजबील येतं हे पाहुन थक्क व्हायला झालं.

कसं ते माहीत नाही पण आमच्या शेजारच्या ४ सदस्य संख्या असणार्‍या घरात महिन्याचं वीजबील ४००-४५० रुपयांच्या च्या घरात असतं (महिन्याचे ५५-६०युनिट लागतात). अर्थात दोन्ही कुटुंबातील काही गोष्टी चर्चा करताना समजल्या त्या अशा :

१. सदस्य संख्या ३ असणार्‍या घरात आंघोळीचा गिझर १८ लिटर क्षमतेचा असुन ४ सदस्य संख्या असणारे कुटुंब गॅस गिझरचा वापर करते.
२. सदस्य संख्या ३ असणार्‍या घरातील कपड्यांना इस्त्री घरीच केली जाते तर ४ सदस्य संख्या असणारे कुटुंब इस्त्री साठी बाहेर दुकानात कपडे देते.
३. सदस्य संख्या ३ असणार्‍या घरात आठवड्यातुन ४ वेळा वॉशिंग मशिन लावली जाते तर ४ सदस्य सख्या असणार्‍या घरात आठवड्यातुन २ वेळा.

या काही फरकांमुळे वीजवापरात फरक पडत असावा. परंतु अजुनही काही उपाय आहेत का ज्याने आपण आपले वीजबील कमीत कमी आणि नियंत्रणात ठेऊ शकु..??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण रेटेड व्होल्टेजच्या +/- १०% च्या रेंज बद्दल बोलत आहोत. यात इफिसिंअंसीवर फार मोठा फरक पडणार नाही, व सामान्यांना समजावे म्हणुन ते यात घेतले नाही.
शेवटी काय फ्रिज, एसी, आणि पाण्याची मोटर यात वर्क डन तेवढेच राहील, इफिसीअंसीमध्ये फार फरक नाही, तेव्हा एनर्जी कन्झम्पशन मध्ये फरक नगण्य राहील. पाण्याच्या मोटर बद्दल पोस्ट मध्ये बदल केलाय.
धन्यवाद.

मला वाटते हे प्रत्यक्षात व्होल्टमीटर अ‍ॅमीटर - एनर्जींमीटर लावून प्रयोग करुनच पाह्यले पाहिजे. कारण आयडीअल रिडींग्स आणि प्रॅक्टीकल रिडींग्स मध्ये फार फरक असू शकतो.

१ टन इन्व्हर्टर एसी (३ स्टार) वाला एकदा सामान्य कूलींग (२३-२५ डिग्री) अचीव्ह झालं की मॅक्स १००/१५० वॉ वरच चालतो (साध्या पंख्यापेक्षा कमी वॉट) सो अगदी ८ तासही जर चालवला तर माझ्यामते वीज फार खर्च होणार नाही. त्यात यामध्ये स्टेबिलायझर असतोच सो एक स्टेडी करंटच पुढे युनिट ला पास होतो.
फ्रीज मात्र जरा जास्त खेचेल.
एलईडी दिवे त्या त्या वॉटइतकेच खातील कारण ते ही तसे प्रिसाईज असतात.
डिशवॉशर/ वॉम जर हॉट वॉटर सायकल लावलं तर पाणी गरम करायला म्हणून जास्तीची वीज घेतील.

उन्हाळ्यात एसी वापरताना मी टेम्परेचर २६-२७ अंश से. सेट करतो आणि पंखाही दोनवर सुरू ठेवतो. यात अंगावर एखादी पातळ चादर घेतली तरी भागतं , नाही घेतली तरी चालतं.
पूर्वी २२-२३ ठेवायचो. त्यातुलनेत वरील प्रमाणे ठेवल्यास बिल कमी येतं.

VB, ते मी लिहिलं
लिंक माझ्याच आधीच्या एक ओळी प्रतिसादात आहे.
टाटा पॉवर वाल्यांना ही उपकरणं स्वस्तात मिळणारे आहेत.
तुमच्या वीज वितरण कंपनीची अशी स्कीम आहे का बघा.

sanctioned लोड नावाचा प्रकार असतो त्याचा फरक पडतो का ? माझा २.६ KW आहे , आणि बिल जास्त आहे ,
एका रूम ला (पायिंग गेस्ट) वेगळे मीटर बसवले आहे तिथे sanctioned लोड १.५ KW आहे आणि तिथले बिल कमी असते
हे मीटर स्प्लिट करताना काही चूका होऊ शकतात का ?

भरत, आमच्याकडे mseb ची वीज आहे. सो आम्ही घेतले उषाचे अँटी डस्ट वाले दोन पंखे.
दुकानदाराने कोरोनाच्या नावाखाली एम आर पी किमतीला विकले. ऑनलाईन स्वस्त होते पण घरचे तयार नव्हते.

sanctioned लोड नावाचा प्रकार असतो त्याचा फरक पडतो का ? माझा २.६ KW आहे , >>>

तुमच्या घरात जेवढे पंखे, दिवे आणि इतर सगळी उपकरणे आहेत, त्यांच्या वॉटेजची बेरीज केली (जसे की पंखा - ६० W, LED ट्यूब लाईट २० W इत्यादि.) तर ते झाले तुमच्या घरातील कनेक्टेड लोड. पण आपण सगळी उपकरणे एकाच वेळीस कधीच वापरत नाही. त्यामुळे एकाच वेळी कार्यरत असलेल्या उपकरणांचा लोड हा नेहमी कनेक्टेड लोड पेक्षा बराच कमी असतो. एकाच वेळी कार्यरत असणारी उपकरणे मिळून जेवढा जास्तीत जास्त लोड येईल ती झाली आपली maximum demand.
खास करून उन्हाळ्यात जेव्हा एसी वापरात असतो तेव्हा ती जास्त असते. आपला sanctioned load हा maximum load च्या जवळपास पण कमी असावा.

१. जर आपली maximum demand, sanctioned load पेक्षा जास्त असेल तर आपल्याला excess demand penalty भरावी लागते. आपल्या बिलात तसे नमूद केले जाईल. तेव्हा आपले बिल बघुन तुम्ही आपल्याला तशी penalty लागतेय का ते बघु शकता. (ज्या महिन्यात ती exceed झाली त्याच महिन्यात ती penalty लागेल.)

२. काही राज्यात बिलामध्ये फिक्स्ड चार्जेस हा जो भाग असतो तो किती sanctioned load आहे त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे विनाकारण जास्तीचे stationed load घेणे इष्ट नव्हे. ( मला वाटते महाराष्ट्रात सिंगल फेज आणि थ्री फेजला वेगवेगळा चार्ज आहे, तो sanctioned load प्रमाणे वेगळा नाही.)
३. काही राज्यात गरिबांसाठी sanctioned load लोड कमी असेल (<०.५ kW ) तर सवलतीच्या दराने वीज दिल्या जाते.

आपला sanctioned load हा maximum load च्या जवळपास पण कमी असावा>>
यात लिहिण्यात गल्लत झालीय, saction load हा maximum demand च्या जवळपास पण त्यापेक्षा जास्त असावा.

@मानव पृथ्वीकर: खूप खूप धन्यवाद ! पेनल्टी येत नाहीये म्हणजे मग त्याचा फरक पडत नसावा. मीटर स्प्लिट करताना काही चुका होऊ शकतात का ?
बेसिक चेक केले आहे , म्हणजे क्रॉस कॉनिकशन नाहीये पण बाकी काही चुका असू शकतात का ? जुन्या वायरिंग चा काही फरक असू शकतो का ?

डिस्क्लेमर:
इथे जे सांगण्यात येत आहे त्यात घरची सगळी उपकरणे चालू बंद करायची आहेत आणि मीटर रुम मध्ये मीटर समोर उभं राहून रीडिंग बघायचं आहे. असे करताना मीटर रूम मध्ये कुठेही हात लावायचा नसतो, अन्यथा शॉक लागण्याचा धोका संभवतो.
हे काम क्वालिफाईड इलेक्ट्रिशियनला बोलावून त्याच्या कडूनच करून घ्यावे.
यात मी फक्त काही माहिती देत आहे, माझी पुढे कसलीही जबाबदारी नाही.

हे स्प्लिट म्हणजे MSEB पासून दोन्ही मिटर्सना वेगवेगळा सप्लाय आणि मग प्रत्येक मिटर पासून तुम्हाला एक आणि पेयींग गेस्टला वेगळा एक असं समजतो. (म्हणजे पेयींन्ग गेस्टचे सबमिटर नाहीय.)

स्प्लिट करताना एखादे वेळी तुमच्या बाजूची न्युट्रल त्यांच्या बाजूला गेली असू शकते. ज्याने त्यांचे एखादे उपकरण त्यांची फेज आणि तुमची न्यूट्रल असे सर्किट बनवत आहे आणि त्यामुळे याच्या मिटर वर अर्धे बिल येईल आणि अर्धे तुमच्या मिटर वर. असे न्युट्रल मिक्स होण्याचे प्रमाण फेज मिक्स होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते, पण फेज मिक्स होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याही केस मध्ये त्या उपकरणाचे बिल अर्धे अर्धे विभागल्या जाईल.

असे होतेय का हे पहाण्याचा एक सोपा उपाय आहे.
मीटर डिस्प्ले आलटून पालटून युनिट्स, व्होलटेज, (V) करंट (i), P F इत्यादी दाखवत असते. एकदा तुमच्या घरात काही उपकरण सुरू असताना तुमचे मिटर बघा. आणि त्यात किती करंट दाखवतेय ते बघा. त्याचे unit Amp अथवा नुसतेच A ने दाखवतील. एकदा करंट कसा बघायचा हे कळलं की.

1. तुमच्या घरचा मेन्स स्विच बन्द करा. आणि परत करंट चेक करा. तो आता शून्य दिसला पाहिजे.

2. तुमच्या घराचा मेन्स स्विच चालू करा आणि चालूच ठेवा. पण प्रत्येक उपकरणाचा स्विच बंद करा. सगळे दिवे, पंखे, मिक्सर, संगणक (लॅपटॉप बॅटरीवर अर्थात चालू शकतो. ), गीझर, फ्रिज, एसी, अजुन जे काय असेल ते त्यांचे स्विच बंद पाहिजे. इन्व्हर्टर असेल तर त्यालाही देण्यास येत असला मेन्स सप्लाय स्विच बंद करा. परत एकदा करंट चेक करा तो शून्य दिसला पाहिजे. नसेल शून्य तर काही तरी ऑन आहे, ते बंद करा. सर्व बंद असल्याची खात्री असूनही करंट शून्य होत नसेल तर तुमच्या घरच्या वायरिंग मध्ये अर्थ लिकेज होतय. त्याने जास्त बिल येणार. इलेक्ट्रिशियनला बोलवा. प्रॉब्लेम सोडवून घ्या. मग पुढची स्टेप. शून्य असेल तर लगेच पुढची स्टेप.

३. वरील 2 मधील स्थिती जैसे ते ठेवा मग त्या गेस्ट रूम मधील सगळी उपकरणे ऑन करा. तो मनुष्य induction stove, मिक्सर, मावे वापरत असेल तर थोड्या वेळा करता ऑन करायला, इस्त्री असेल तर तीही ऑन करायला सांगा. आणि लगेच जाऊन तुमच्या मिटर वर करंट बघा. करंट शून्य हवा.
शून्य नसल्यास तुमची न्यूट्रल किंवा फेज तिकडे मिक्स झाली आहे.

4. जर 3 . मध्ये करंट शून्य नव्हता तर आता एक एक उपकरण बन्द करत जा आणि प्रत्येककवेळी करंट बघत रहा. जे उपकरण बन्द केले की करंट शून्य होतो (किंवा कमी होतो -एका पेक्षा अधिक चोर) ते ज्या पॉईंटला लावले आहे त्यात गडबड आहे.
असे सगळे पॉईंट मार्क करून घ्या आणि इलेक्ट्रिशियन कडून ठीक करवून घ्या.

वायरिंग केवळ जुनी झाली म्हणुन बिल वाढत नाही. इतकी जुनी झालीय की वायर वरचे इन्सुलेशन निघून आतील तांब्याची तार उघडी पडली आहे तर समस्या होऊ शकतात.
असे जर फेज,- न्यूट्रल, फेज - अर्थीगं बाबत झाले असेल आणि फेजची तांब्याची तयार न्यूट्रलच्या तांब्याच्या तारेला स्पर्श करत असेल ते शॉर्ट सर्किट होईल, फ्यूज उडेल.
फेजची उघडी तार जर अर्थींगच्या उघड्या तारेला स्पर्श करत असेल आणि तुमच्या घरचे अर्थींग पक्के असेल तरीही शॉर्ट सर्किट होईल आणि फ्यूज उडेल. पण बहुतेक लोक अर्थींग मेंटेन करत नाही आणि अर्थींग बऱ्या पैकी हाय रजिस्टन्स देते. आशा वेळेस शक्य आहे की फ्यूज उडणार नाही आणि फेज मधून अर्थींग मध्ये करंट लिकेज होत राहील. याने बिल वाढेल. वर २. मध्ये जर अर्थ लिकेज आढळला तर त्यास हे एक कारण असू शकते. दुसरे कारण म्हणजे चुकीचं वायरिंग. हे सुरवती पासूनच असेल असे नाही, मध्ये केव्हा इलेक्ट्रिशियनला बोलावले असेल नवीन पॉईंट घ्यायला वगैरे तेव्हा ही होऊ शकते.

टीप: या पोस्टचा सुरवातीचा महत्वाचा डीस्क्लेमर संदेश परत एकदा वाचा.

मा पृ , खूप चांगली व महत्वाची माहिती. आपले वीजबिल जास्त येत आहे अशी शंका असल्यास हा उपाय करून स्वतःच चेक करता येईल.

स्प्लिट मीटर नसेल तर 1 लाच कळायला हवे ना? घराचा मेन स्वीच बंद केल्यावर करंट शून्य असायला हवा. तसे नसल्यास काहीतरी गडबड आहे समजावे?

फ्रीज, वॉशिंग मशिन ,इस्त्री ,माइक्रोवेव, वीज फार खातात. ते चेक करा. किंवा कमी वापरा.

जुने छोटे सीआरटी टिवी २०० वॉटचे असतात तर नवीन टीवी ४० ते ६० वॉटचे असतात. आता कुणाकडे छोटे नसतीलच.

फ्रीजचा दरवाजा घट्ट बंद होतो का? तो वारंवार चालू बंद होतो का? आईस्क्रीमसाठी हाई सेटिंग ठेवलेले तसेच राहिले आहे का? फ्रीजची जागा बदलली आहे का? मागच्या भींतीपासून सहा इंच दूर ठेवा.

गीजरमधले पाणी तापायला पूर्वीपेक्षा जास्ती किंवा कमी वेळ लागतो आहे का?

लॉकडाउनमुळे इस्त्रीचा/ माइक्रोवेवचा वापर वाढला आहे का?

@मानव पृथ्वीकर: धन्यवाद हा शब्द पण खूप छोटा वाटतो , इतकी स्टेप by स्टेप माहिती !! खूप खूप धन्यवाद !
हो , डिसकलमेर वाचला आहे , काळजी घेऊनच करेन ....
वायरिंग बॅटन वायरिंग आहे (काही ठिकाणी)

@ साधना:
स्प्लिट मीटर नसेल तर 1 लाच कळायला हवे ना? >> नाही २. ला

घराचा मेन स्वीच बंद केल्यावर करंट शून्य असायला हवा. तसे नसल्यास काहीतरी गडबड आहे समजावे >>
स्टेप १ या साठी की आधी तुम्ही करंट किती आहे बघता आणि या स्टेप मध्ये तो शून्य होतोय हे बघता म्हणजे नक्की की तुम्ही करंट रीडिंगच बघत आहात, पुढच्या स्टेपला जायला हरकत नाही. स्टेप १ ला करंट शून्यच येईल. नाही आला तर एकतर मीटर शून्य ऐवजी थोडं रीडिंग दाखवतंय. ०. ०१ वगैरे. हा त्यातील झिरो ऑफसेट असु शकतो. किंवा जास्त असेल तर मीटर पासून तुमच्या घरात मेन्स स्वीच पर्यंत ज्या वायर्स येत आहेत तेवढ्यातच कुठे अर्थ लिकेज आहे.

वरील स्टेप्स या शोधक यांना स्प्लिट मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे चेक करण्यास दिल्या आहेत, ते चेक करताना घरात कुठे अर्थ लिकेज आहे का हे पण चेक करता येईल.
पण त्यात उपकरण सुरू केले आणि त्या उपकरणातूनच अर्थ लिकेज असेल तर कळणार नाही कारण उपकरण सुरू केले की करंट हा दिसणारच.

जर आपल्याला नुसते अर्थ लिकेज चेक करायचे असेल तर एक खात्रीपूर्वक पद्धत आहे. पण त्यासाठी इलेक्ट्रिशियन लागेल आणि Tong tester (यालाच Clamp meter असे ही म्हणतात) ते लागेल. इथेही वरील प्रमाणे डिस्क्लेमर स्ट्रॉंगली लागु आहे, हे काम क्वालिफाईड इलेक्ट्रिशियननेच करावे. जर आपल्याला शंका आहे की आपले बिल विनाकारण जास्त येत आहे तर हे अर्थ लिकेज असु शकेल.
या Tong tester ने तुमच्या घरात मेन्स स्विच बोर्ड मध्ये , म्हणजे जिथे अर्थींग वायर तुमचया घरात प्रवेश करते तिथे तिच्यावर ते लावून अर्थींग वायर मधून जाणारा करंट मोजायचा. सगळी उपकरणे बंद असताना, आणि एक एक उपकरण ऑन करत. म्हणजे कुठल्या उपकरणातून लिकेज होत आहे हे ही कळेल. (नोट: प्रत्येक उपकरणातून अगदी थोडा अर्थ लिकेज - १ मिली अँम्प अलाऊड असतो, तेवढ्याने बिलावर काहीच फरक पडत नाही.)

@मानव पृथ्वीकर : धन्यवाद ! खूपच चांगली माहिती सांगत आहात !!!!
माझा अनुभव असा कि - electrician टिपिकल कामात इंटरेस्टेड दिसतात , हे असे लिकेज शोधण्याचे काम सांगितले कि बऱ्याच लोकांना नीट माहिती नसते किंवा इंटरेस्ट नसतो , विनंती करून आणावे लागते.

परत एकदा धन्यवाद !!!

व्होल्टमीटर आणि ऍमीटर अगदी अनुभवी माणसाने वापरावे.
(व्होल्टमीटर चा रोध अनंत असतो त्यामुळे तो दोन पॉईंट ला समांतर आणि ऍमीटर चा रोध शून्य असल्याने तो थेट सर्किट मध्ये सिरीज लावायचा असतो.आम्ही ऍमीटर समांतर लावून फटकन शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्या.त्यानंतर पुढचे अनेक दिवस लॅब मध्ये आमचा उद्धार होत होता.अक्कल बघा यांची, ऍमीटर पॅरलल मध्ये लावतायत म्हणून. Happy )

मानव पृथ्वीकर, धन्यवाद.

मी सकाळीच करंट मोजून पाहिले. बोअरवेलचा मीटर सतत चालु असतो, त्यामुळे इतर उपकरणे जरी बंद असली तरी 0.08 इतका करंट सुरू राहीला. बाकी सगळी उपकरणे सुरू करूनही करंट पूर्ण अंकात जात नव्हता, बोअर सुरू केली आणि झपकन 2 वर गेला Happy .. अधून मधून करंट बघणे चांगले आहे, त्यामुळे मानसिक करंट बसून वीजबिल कह्यात राहील.

माझ्या एका घराचे बिल जास्त येते. तिथे भाडेकरू होता तेव्हा एकदा चेकही केले होते. आता भाडेकरू नसताना किती बिल येते हे बघून परत चेक करावे लागणार. तुमची मेथड कामाला येईल. परत एकदा मनापासून आभार.

मी_अनु टॉंग टेस्टर मध्ये एक गोलाकर क्लँम्प असते. तिचे तोंड वासायला खटका असतो. ज्या तारेतुन जाणारा करंट मोजायचा आहे तिच्या भोवती त्याची क्लँप वासून तिचे तोंड नीट बंद केले की झाले.
ऍमीटर प्रमाणे, वायर काढून ते सिरीज मध्ये खुपसण्याची गरज नाही.

@ मानव पृथ्वीकर, खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद.
आपण या क्षेत्रातील जाणकार दिसता, म्हणून मला काही प्रश्न विचारायचे आहेत.
१. घरातील अर्थिंग digital multimeter ने तपासता येते का? Multimeter 200 V AC ला सेट करुन एक प्रोब न्युट्रल मध्ये आणि दुसरा अर्थिंग मघ्ये घालायचा. जर voltage 0.3 - 0.6 या रेंजमध्ये दिसले तर चांगले. 0.6 पेक्षा जेवढे जास्त तेवढे अर्थिंग weak आणि एकदम शून्य असल्यास अर्थिंगच नाही. असे असते का? ही पद्धत मी कुठेतरी वाचली होती.
२. अर्थिंग तपासण्यासाठी आणखीन कोणती तरी पद्धत आहे ना ज्यात विशिष्ट उपकरणाचे तीन प्रोब जमिनीत विशिष्ट अंतरावर खोचले जातात आणि अर्थिंग मोजली जाते.
३. पेट्रोल पंपावर किंवा अगदी रेल्वे स्थानकांवर अर्थ रॉड च्या शेजारी ओहम मध्ये संख्या आणि दिनांक लिहिलेली असते. हे ओहम कसे मोजतात. आणि पेट्रोल पंपावर अर्थिंग एवढे काटेकोरपणे मोजण्याचे काय कारण?

<< स्प्लिट करताना एखादे वेळी तुमच्या बाजूची न्युट्रल त्यांच्या बाजूला गेली असू शकते. ज्याने त्यांचे एखादे उपकरण त्यांची फेज आणि तुमची न्यूट्रल असे सर्किट बनवत आहे आणि त्यामुळे याच्या मिटर वर अर्धे बिल येईल आणि अर्धे तुमच्या मिटर वर. असे न्युट्रल मिक्स होण्याचे प्रमाण फेज मिक्स होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते, पण फेज मिक्स होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याही केस मध्ये त्या उपकरणाचे बिल अर्धे अर्धे विभागल्या जाईल. >>

सपशेल चूक. प्रत्येक मीटर पॅरॅललमध्ये असते. २ वेगळ्या मीटरमध्ये फेज लाईन सारखीच किंवा वेगळी असू शकते, पण न्यूट्रल सारखीच असते. जर दुसर्‍या कुणाचे लोड तुमच्या सर्किटवर असेल, तरच त्याचे बिल (त्या लोडचे संपूर्णपणे, ५०% नाही) तुमच्या मीटरवर येणार, अन्यथा नाही.
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ बघा.

मानव पृथ्विकरांनी दिलेली माहिती आणि विक्षिप्त_मुलगा यांचे प्रश्न. जाणकारांची चर्चा इतरांना समजायला अवघड ठरते म्हणून तशी माहिती देण्याचे मीही टाळतो. साध्या टिप्स देतो.
एकूण वीजवहन आणि वापर आणि मोजमाप खूपच गहन विषय आहे.
एसी सप्लाई आणि पावर फ्याक्टरचाही बिलावर परिणाम होतोच.

@ उपाशी बोका:
बिल विभागून न येता कुठल्या एका मिटर वर पूर्ण येईल हे बरोबर आहे. आणि ते ज्या मिटरची फेज त्या मीटरवर. न्यूट्रल ने फरक पडणार नाही, चूक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

जे लाईट बिल येतं त्याच्यापेक्षा जास्त बिल(दुप्पट तिप्पट) आपण भरायचं मग पुढच्यावेळी msebवाले आपल्याला ऍडजस्ट करून मायनस मध्ये बिल देतात. ते बिल बघून आपल्याला खूप बरं वाटत.

@ विक्षिप्त मुलगा:

१. ट्रान्सफॉर्मर वरील ३ फेज लोड जेव्हा अनबॅलन्स्ड होतो तेव्हा न्यूट्रल शून्य पोटेन्शिल पासून शिफ्ट होते. (न्यूट्रलही ग्राउंड करतात वगैरे टेक्निकल डिटेल्स टाळतो). त्यामुळे न्यूट्रल आणि अर्थींग मधील व्होल्टेज यावरून निष्कर्ष काढता येत नाही.
त्यापेक्षा आधी मल्टिमिटरने फेज आणि न्यूट्रल मधले व्होल्टेज मोजा, मग फेज आणि अर्थींग मधील व्होल्टेज मोजा. दोन्ही आयडीयली सारखे हवे, पण वर सांगितल्याकारणाने ते शक्य नाही तेव्हा दोन्हीत फार फरक नको. अन्यथा अर्थींग नीट नाही.

२. ३ प्रोब ही ग्राउंड रसिस्टन्स मोजण्याची एक पद्धत आहे

३. अनेक सेन्सिटिव्ह इलेट्रॉनिक्स उपकरणांसाठी अर्थींग परफेक्ट हवे. खास करून पेट्रोल पंपवर का याची मला कल्पना नाही. सिझन प्रमाणे (जमिनीत पाणी आणि क्षार कमी जास्त होणे) अर्थ रसिस्टन्स बदलत रहाते. त्यामुळे अर्थ पिट हे मेंटेन करावे लागते नेहमी. (पाणी, क्षार घालणे, ठराविक कालाने उपसून मेंटेनन्स करणे, इलेक्ट्रोड बदलणे वगैरे). अर्थ रसीटन्स मोजून त्याची नोंद करून ठेवणे हे या मेंटेनन्समध्ये येते.

Pages