... नाते...

Submitted by Lalitasabnis09 on 1 July, 2020 - 01:54

... नाते...

धुंद धुंद हा
वारा जसा
स्वप्नात घाली
पिंगा जसा

बहरून आले
गीत माझे
सांगू कशी मी
तुला सख्या रे

कोमल हळुवार
नाते तुझे रे
स्मरते मनात
धन्या तुला रे

दोघे कसे हे
वेगळी रूपे
असे मनाचे
एकच नाते

हृदय हृदयाचा
एकच धागा
हृदयात नित्य
तूच स्मरावा

Group content visibility: 
Use group defaults