Submitted by प्रितु_१४ on 29 June, 2020 - 15:14
वेगळ्या वाटा
प्रितु_१४
निश्चय जाहला मनी
न सांगते ऐका त्याची कहाणी
राहिला न तो माझा राजा
न राहिले मी त्याची राणी
लग्नानंतरची दोनच वर्षे
नुकतीच कुठे सरली होती
आयुष्यात त्याच्या मला
जागा कुठे उरली होती
ऑफिसातून निघताना घरी
सोबत असे त्याच्या एक परी
हातामध्ये गुंफती हात कधी
तर असे कधी तो खांद्यावरी
दोघांमधले वाढते नाते
करी निर्माण घरी तणाव
सर्व काही माहीत असूनही
चाले ह्याचा बेबनाव
एकेदिवशी ठरवून दोघांना
रंगेहाथ पकडले
नाही म्हणे तुझ्यात रस आता
म्हणून माझ्यावरच उखडले
झाला निर्णय ठाम मनाशी
लटकून जावे आता फाशी
चित्र आले ते डोळ्यासमोर
जे स्वप्न बाळगले होते उराशी
क्षणार्धात उमगले मला
मग परिस्थितीचे भान
जगायचे आयुष्य आता
वापरूनी आपले ज्ञान
जाळ्यात त्याच्या त्यालाच कोंडून
झालेय मी मुक्त आता
एकत्र असलो जरी आम्ही
असतील आमच्या वेगळ्या वाटा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बापरे... पहिली कविता
बापरे... पहिली कविता शोडषवर्षीय कुमारी सारखी... आणि आता मात्र बरच काही भोगलेल्या गृहिणी सारखी
धन्यवाद प्रगल्भ. दुसरी देखील
अप्रतिम....... अशीच लिहीत रहा.... पुढील लेखनास शुभेच्छा
धन्यवाद प्रगल्भ धन्यवाद तुषार
धन्यवाद प्रगल्भ, माझी दुसरी कविता देखील काहीशी अशीच आहे, "तुझा दिवस कुठे अडला आहे" नक्की वाचा
धन्यवाद तुषार
धन्यवाद तुषार
ताई तुम्हाला अभिप्राय दिला
ताई तुम्हाला अभिप्राय दिला आहे. बहुतेक तुमच्या ई-मेल वर आला असेल. मायबोली थ्रु, चेक करा एकद. बराच मोठा झाला लिहिता लिहीता. म्हणून मेल केले.
तुम्हाला माझा मेल आयडी कुठे
प्रगल्भ, तुमचा रिप्लाय वाचला. मुळात कोणतीही कविता ही त्या कवीचा अनुभव असणे असे जे आपले मत आहे ते प्रथम बदलावे. आणि सदर मंच हा प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार कविता सादर करण्याकरिता आहेत. ज्यांना आवडत नसतील त्यांनी त्या वाचू नयेत
आप्रतिम
आप्रतिम
धन्यवाद विनया
धन्यवाद विनय