अभ्यास

Submitted by दवबिंदू on 28 June, 2020 - 07:57

अभ्यास

दोन उत्तरं लिहून झाली.
पेनातली संपली शाई!

उभी-आडवी रेघ आखली.
पेन्सिलीची टोक तुटली!

धडा घेतला वाचायला.
तिसऱ्या ओळीत शब्द अडला!

दोन गणितं सोडवली.
वहीची पानं संपली!

ऑनलाईन वर्ग भरला.
नेटवर्कचा संपर्क तुटला!

खूप झाला अभ्यास, बाळा!
आता खेळायला पळा!

- दवबिंदू

Group content visibility: 
Use group defaults