माझ्यातच असतो मी

Submitted by Amol shivaji Rasal on 28 June, 2020 - 02:32

कधी एकटा कधी वेगळा जगण्याच्या गर्दीत असतो मी
फरक मला ना पडतो तयांचा माझ्या तंद्रीत असतो मी..

कत्येक स्वप्ने विस्कटलेली कितीतरी बेचिराख झाली..
कित्येक दुःखे कवटाळून ही त्यांना परतीत असतो मी..

लाचखोर जग झाले आहे पण मला भावले ना कोणी
कित्येकानी पोशाख बदलले माझ्या वर्दीत असतो मी..

आजारांना ना घाबरतो आणि कोरोनाशी लढतोही
डोके थोडे दुखते माझे अन माझ्या सर्दीत असतो मी..

कित्येकांची चव बदलली कित्येकांचे ध्येय बदलले
पण ध्यासाला कवटाळून आहे माझा गंधित असतो मी..

चेहऱ्यांचे हे जग दिवाने ह्रदय पाहतो ना कोणी
मृगजळाच्या दुनियेत या माझ्या सुरतीत असतो मी..

सत्तेसाठी रडरड आहे सिंहासनाचा लोभ इथे
पण माझे मस्तक स्थिर आहे अन माझ्या खुर्चीत असतो मी..

दगडांना का पुजावे अन मानवतेची का विटंबना
ईश्वर अल्लाह मीच असेन तर माझ्या मूर्तीत असतो मी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users